छोट्या पडद्यावरील प्रेक्षकांचा लाडका आणि नेहमीच वादग्रस्त ठरलेला कार्यक्रम म्हणून ‘बिग बॉस’कडे पाहिलं जातं. बिग बॉस हा कार्यक्रम २००६ मध्ये सुरु झाला. या कार्यक्रमावर सुरुवातीला टीका झाली. मात्र त्यानंतर आजतागायत हा कार्यक्रम लोकप्रिय ठरल्याचं पाहायला मिळतंय. बिग बॉसच्या घरात प्रत्येक कानकोपऱ्यात लक्ष ठेवणारी एक नजर कायमच पाहायला मिळते. तिथे बसवलेले कॅमेरे हेच ती नजर असतात. पण आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात कोणी ना कोणी बिग बॉस हा नक्कीच असतो… चकित झालात ना… पण हे खरं आहे.

बिग बॉस मराठी हा कार्यक्रम सुरु झाल्यापासून सातत्याने काही विषय मनात डोकावत आहेत. मी बिग बॉसची डाय हार्ट फॅन.. म्हणजे एखादा भाग जर चुकून मिस झाला तर काय घडलं याबद्दल सर्च करणे, मैत्रिणींना विचारणं इथपासून रात्री झोपताना तो ओटीटीवर पाहण्यापासून सकाळी पुन्हा त्याचे रिपीट टेलिकास्ट पाहण्यापर्यंत सर्व काही नित्यनेमाने पाहाणे. कधीतरी सहज आपणही बिग बॉसमध्ये जावं, तिकडे जाऊन बारीक सारीक गोष्टी समजून घ्याव्या, अशी इच्छा अनेकदा झाली… पण कसलं काय.. आपण सर्वसामान्य माणसं, आपलं कुठं इतकं नशीब, बरं आपले ते हजारो किंवा लाखो फॉलोअर्स पण नाहीत की त्यांनी आपल्याला तिथे बोलवावं… मग मात्र विषयच सोडून दिला.
आणखी वाचा : महिला, शॉपिंग अन् खिशाला ‘फोडणी’

एक दिवस सहज मी आणि ताई घराबाहेर निघालो. त्यावेळी आम्ही आईला कुठे जातोय हे सांगितलं नव्हतं. आम्ही मरीन ड्राईव्हवर छान बसून गप्पा मारल्या आणि घरी निघालो. तिथून लोअर परळला ट्रेनमधून उतरलो; समोर शेजाऱ्याच्या काकू दिसल्या पण आम्ही दोघींनीही जाणीवपूर्वक त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. पण त्यांनी हटकलंच… काय ग? कुठे फिरताय दोघी? आईला-बाबांना माहितीये का? असे अनेक प्रश्न विचारले. त्यावेळी आम्ही त्यांना टोलवाटोलवीची उत्तर देऊन तिथून घरी निघून आलो. पण शेवटी व्हायचा तो गोंधळ झालाच.

घरी पोहोचल्यानंतर दुसऱ्या दिवशी संपूर्ण चाळीत आम्ही दोघीही लोअर परळ स्टेशनला दिसलो याची बातमी पोहोचली होती. बरं, आता ती कोणी सांगितली याबद्दल तुम्हाला काही सांगायला नको…
आणखी वाचा : महिलांच्या नटण्या-मुरडण्यात ‘पुरुषांचा’ अडथळा

या सर्व प्रकारानंतर माझ्या डोक्यात सहज एक गोष्ट सुरु झाली. बिग बॉस हा कार्यक्रम याच संकल्पनेवरुन तर सुरू नसेल ना झालेला? त्यांच्याकडे फक्त वॉशरुमच्या आत सोडलं तर अगदी सर्व ठिकाणी कॅमेरे लावण्यात आले आहेत. हे कॅमेरे २४ तास कार्यक्रमातील सदस्य काय करतात, याचे निरीक्षण करतात. तसंच आपल्याकडे चाळीत जशा आजूबाजूच्या घरात, कट्ट्यावर, भाजीवाल्याच्या गाडीवर किंवा अगदी गच्चीवर जशा बिग बॉस असतात, त्या प्रत्येक घरातल्या मुलीबद्दल किंवा मुलाबद्दलच्या गोष्टी सहज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवतात तेही अगदी मीठ, मसाला आणि तडका देऊन…

जर उद्या एखादी बिल्डींगमधील मुलगी एखाद्या मुलाबरोबर बाहेर फिरताना दिसली, तर ती त्याच्याबरोबर फिरते, कसं चालतं त्यांच्या घरात, काय शिस्तच शिकवली नाही, आमच्या काळात असं नव्हतं इथपासून पार अक्कल पाजळली जाते. पण ती मुलगी काही कामानिमित्त त्याच्याबरोबर गेली असेल, काही महत्त्वाचे काम असेल, असा सकारात्मक विचार केलाच जात नाही.
आणखी वाचा : …अन् त्यांची ‘हॅप्पी दिवाली स्माईल’ कधीच कमी होत नाही!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एक मुलगी म्हणून माझ्या आजूबाजूला आजही बिग बॉस असल्यासारखं मला कायमच जाणवत असतं. फक्त सोसायटीमध्ये राहणारे नव्हे तर घरातही हे बिग बॉस पाहायला मिळतात. तुमची आत्या, काका, मामा, मामी, काकू, कधी कधी तर तुमची भावंडही तुमच्या बरोबर ‘बिग बॉस’सारखी वागतात. तुमच्या अनेक सिक्रेट गोष्टी या कुटुंबासमोर उघड्या पडतात आणि त्याचे कारण ठरतं फक्त अन् फक्त ते ‘बिग बॉस’!