डॉ. सारिका सातव
हिवाळा ऋतूमधील सर्वसाधारण आहाराबद्दल या लेखात आपण जाणून घेऊ. कर्बोदके, प्रथिने, चरबीयुक्त पदार्थ, खनिज पदार्थ, जीवनसत्त्व, पाणी इत्यादी आहाराचे प्रमुख घटक असतात. ऋतुमानानुसार त्यातील वेगवेगळे पदार्थ आहारात घेणे गरजेचे असते. तरच आवश्यक ते पदार्थ शरीरात चांगल्या प्रकारे शोषले जातात. आहारात वैविध्य ठेवणे महत्त्वाचे आहे. वैविध्य असल्यास सगळ्या पदार्थामधील सगळे गुणधर्म मिळू शकतात.

आणखी वाचा : उपयुक्त : ‘फॅशन सर्च’मध्ये ‘ट्रेण्डिंग’ असलेले ‘को-ऑर्डस्’ आहेत तरी काय?

Breakfast Recipe
Breakfast Recipe : उन्हाळ्यात शरीराला थंड ठेवण्यासाठी बनवा मुगडाळीचा पौष्टिक नाश्ता, जाणून घ्या ही हटके रेसिपी
mini paneer sabudana vada recipe
Recipe : तेलात न तळता बनवा साबुदाण्याचे कुरकुरीत ‘प्रोटीनयुक्त’ मिनी वडे! बनवताना घाला फक्त ‘हा’ पदार्थ
Can adding salt to drinking water help prevent dehydration this summer
उन्हाळ्यात पाण्यात चिमूटभर मीठ टाकून प्यावे का? डॉक्टर काय सांगतात वाचा….
kairi curry recipe in marathi
Recipe : हिरव्यागार कैऱ्यांचे आंबटगोड सार; कसे बनवायचे पाहा कृती अन् प्रमाण

कर्बोदके – सर्व धान्ये, भात, बटाटे, साखर इत्यादी पदार्थांमधून कर्बोदके जास्त प्रमाणात मिळतात. हिवाळ्यामध्ये नाचणी, बाजरी, गहू, आदी धान्यांचा वापर जास्त करावा. ज्वारी कमी प्रमाणात वापरावी. हातसडीचा तांदूळ वापरावा. ओट्स, व्हीटफ्लेक्स खाण्यास हरकत नाही.

आणखी वाचा : दिवाळीसाठी ग्रीटिंग कार्ड मिळाले नाही म्हणून तिने…; लॉकडाउनमधील गैरसोयीतून सुचलेल्या कल्पनेने काय केले पाहा

प्रथिने – सर्व डाळी, कडधान्ये भरपूर प्रमाणात
खाऊ शकता. मोड आलेली कडधान्ये जास्त प्रमाणात खावीत. या ऋतूत पचनशक्ती चांगली असल्याने मोड आलेली जी कडधान्ये कच्ची खाऊ शकतो, ती कच्चीच खावीत. इतर वाफवून घ्यावीत. पचनाची तक्रार असणाऱ्यांनी मूग, मसूर जास्त प्रमाणात खावे.

आणखी वाचा : सतत सॉफ्ट पॉर्न पाहणाऱ्यांच्या दृष्टीने बलात्कार साधा गुन्हा?

दूध आणि दुधाचे पदार्थ – हा प्रथिनांचा उत्तम स्रोत आहे. कृश व्यक्तींनी व लहान मुलांनी सायीसकट दूध घ्यायला हरकत नाही. मधुमेह, हृदयविकार असलेल्यांनी दूध साय काढून वापरावे. या ऋतूमध्ये नेहमी गरम दूध घ्यावे. दुधाचे इतर पदार्थ, जसे की दही, ताकही ताजे असावे. चिकन, मटण, मासे, अंडी हाही प्रथिनांचा उत्तम स्रोत आहे. पचनशक्ती चांगली असल्याने मांसाहार आठवड्यातून २-३ वेळा करण्यास हरकत नाही.

आणखी वाचा : हिवाळा आला, आहाराची वेळ पाळा

स्निग्ध पदार्थ – दिवाळीत स्निग्ध पदार्थ खा, पण नियंत्रणात. तेल, तूप, साय, लोणी, शेंगदाणे, तीळ, खसखस, सुकामेवा इत्यादी अनेक पदार्थ चरबीयुक्त किंवा स्निग्ध पदार्थामध्ये येतात. स्निग्ध पदार्थ पचवण्यासाठी पचनशक्ती चांगली लागते. ती पचनशक्ती हिवाळ्यामध्ये चांगली असते. असे असले तरी स्निग्ध पदार्थामध्ये ऊर्जा जास्त प्रमाणात असते. १ ग्रॅम कर्बोदके आणि प्रथिने पचनानंतर ४ कॅलरी ऊर्जा देतात. तर १ ग्रॅम फॅट्स म्हणजे स्निग्ध पदार्थाच्या पचनानंतर ९ कॅलरी ऊर्जा मिळते. म्हणजेच कमी प्रमाणात स्निग्ध पदार्थाच्या सेवनानंतरही जास्त प्रमाणात ऊर्जा मिळते. म्हणून स्निग्ध पदार्थ जरा बेतानेच खाल्लेले बरे. कारण ही ऊर्जा खर्च न होता साठत गेली, तर स्थूलता, हृदयरोग, मधुमेह इत्यादी अनेक व्याधींना निमंत्रण मिळते म्हणून फक्त हिवाळा आहे म्हणून जास्त प्रमाणात स्निग्ध पदार्थ घेणे चांगले नाही. ते प्रमाणात घ्यावेत आणि त्याबरोबरच त्या प्रमाणात शारीरिक हालचाली, व्यायामही हवा.

आणखी वाचा : दिवाळीला का करतात अभ्यंगस्नान? त्याचे शास्त्रीय महत्त्व काय ?

भाज्यांमध्ये तेलाचे प्रमाण कमी ठेवावे. तूप, जेवणाबरोबर, त्याच प्रमाणात नाश्त्याबरोबर घेण्यास हरकत नाही, परंतु प्रमाणात असावे. ताजे लोणीसुद्धा खाण्यास हरकत नाही. साय, डालडा हे पदार्थ शक्यतो वापरू नयेत. मोहरीचे तेल इतर तेलांबरोबर हिवाळ्यात जरूर वापरावे. शेंगदाणा तेल, सूर्यफूल तेल, ऑलिव्ह, राइसब्रान तेल बदलून बदलून वापरावीत. स्निग्ध पदार्थ शरीराला नक्कीच गरजेचे आहेत. हिवाळ्यात ते पचवण्यासाठी पचनशक्तीसुद्धा चांगली असते. पण आपण या गोष्टी किती प्रमाणात खात आहोत यावर त्याचे फायदे-तोटे अवलंबून असतात. व्यायाम चांगल्या प्रकारे केल्यास अतिरिक्त प्रमाणातील चरबी साठून राहाण्याचा धोका नसतो.

आणखी वाचा : मी दीपिका नाही पण… ट्रेन मध्ये दिसलेली ‘ती’, जगातील सर्वात सुंदर महिला!

बदाम, अक्रोड, पिस्ता आदी सुकामेवा रोज प्रमाणात खाऊ शकता. शेंगदाणे, तीळ आदी पदार्थांमधूनसुद्धा चांगल्या प्रकारचे फॅट्स मिळतात. ते हिवाळ्यामध्ये अवश्य खावे.

dr.sarikasatav@rediffmail.com