शक्तिवर्धक, वातशामक असे अंजीर आहारामध्ये तसेच औषधींमध्येही उपयुक्त आहे. हिंदीमध्ये अंजीर, इंग्रजीमध्ये ‘फिग’ शास्त्रीय भाषेत ‘फायकस कॅरिका’ या नावाने अंजीर ओळखले जाते. अंजीर हे ‘मोरेसी’ कुळातील आहे. हे फळ ताजे व सुके अशा दोन प्रकारात उपलब्ध असून ते उंबराच्या जातीचे आहे.

आणखी वाचा : विवाह समुपदेशन : सासूबाई अतिस्वच्छतेच्या मागे आहेत?

heat wave, heat control action plan,
विश्लेषण : उष्णतेची लाट म्हणजे काय? उष्णता नियंत्रण कृती आराखडा कसा तयार केला जातो?
survival of marine species in danger due to ocean warming
विश्लेषण : महासागर तापल्याने प्रवाळ पडू लागलेत पांढरेफटक… जलसृष्टीचे अस्तित्वच धोक्यात?
How useful was the Green Revolution really
हरितक्रांती खरंच कितपत उपयुक्त ठरली?
How Suryanamaskar and pranayama help to fight allergies
तुम्हाला वारंवार ॲलर्जी होते? सूर्यनमस्कार आणि प्राणायाम ठरतील फायदेशीर

औषधी गुणधर्म-
अंजिराच्या फळामध्ये आर्द्रता, पिष्टमय पदार्थ, प्रथिने, मेद, कार्बोहायड्रेट, कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह, तंतुमय पदार्थ ‘अ’ व ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे सकस आहारासोबतच औषधी द्रव्य म्हणूनही अंजिराचा उपयोग केला जातो. अंजीर स्वतंत्रपणे वा इतर अन्नपदार्थाबरोबर खाल्ल्यास त्याची पौष्टिकता वाढते. ते वाळवून सुके अंजीर ड्रायफ्रुट म्हणून आहारामध्ये वापरले जाते.

आणखी वाचा : इराणला हव्या आहेत सावित्रीबाई!

अंजीर शीत गुणात्मक, मधुर व पचनास जड असते. ते पित्त विकार आणि वात व कफ विकार दूर करते. अंजीर मधुर रसाचे विपाकातही मधुर, शीतवीर्य व सारक असते. ताजे अंजीर हे सुक्या अंजिरापेक्षा जास्त पौष्टिक असते. अंजिराच्या अनेक जाती आहेत. गुलाबी, लाल, काळी, पांढरी, लहान मोठी, तुर्की अशा अनेक जातीमध्ये अंजीर उपलब्ध असते.

आणखी वाचा : झोपू आनंदे- बहुविभाजित झोप

उपयोग –

  • अंजीर पित्त विकार, रक्त विकार, वात व कफ विकार दूर करणारे आहे. ताज्या अंजिरामध्ये पोषक घटक जास्त प्रमाणात असतात, तर सुक्या अंजिरामध्ये अनेक प्रकाराचे उपयोगी क्षार आणि जीवनसत्त्वे असतात.
  • अंजिरात लोह घटक अधिक असतो. यामुळे आमाशय जास्त क्रियाशील बनते; त्यामुळे भूक फार लागते म्हणूनच रक्तक्षय (ॲनिमिया) या आजारामध्ये अंजीर सेवन करावे. अंजिरामुळे रक्ताचे प्रमाण प्राकृत राहण्यास मदत होते.
  • कच्च्या अंजिराची जिरे, मोहरी, कोथिंबीर घालून भाजी करावी. यामुळे शरीरातील ‘अ’ जीवनसत्त्व व लोह यांचे प्रमाण प्राकृत राहते.
  • पिकलेल्या अंजिराचा मुरंबा करून वर्षभर खावा. हा मुरंबा दाहनाशक, पित्तनाशक आणि रक्तवर्धक असतो.
  • अंजिरामध्ये तंतुमय पदार्थ भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे अंजिराच्या रोजच्या सेवनाने मलावस्तंभ नाहीसा होतो आणि शौचास साफ होते.
  • अंजिराच्या नियमित सेवनाने सप्तधातूचे पोषण होऊन शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते व त्यामुळेच क्षयरोगासारखे आजार बरे होऊ शकतात.

आणखी वाचा : Open Letter : तुझा जीव कसा कळवळला नाही? आईचे तुकडे करणाऱ्या रिंपलला खुलं पत्र

  • शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी आणि रक्तशुद्धीसाठी पिकलेल्या अंजिराचे दोन भागात विभाजन करून त्यामध्ये गूळ भरून ठेवावा. पहाटे ब्रह्म मुहूर्तावर चूळ भरून खावे. असे नियमितपणे सेवन केल्यास शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढतेच व उष्णताही कमी होते.
  • नियमितपणे अंजीर खाल्ल्याने आजारपणात शरीराची झालेली हानी लवकर भरून येते. अंजीर खाल्ल्याने, शरीराचा उत्साह वाढून मानसिक थकवाही दूर होतो.
  • मुखपाक या आजारात ओठ, जीभ, तोंड यांना कात्रे पडतात व फोड येतात. अशा वेळी अंजीर खाल्ल्यास या जखमा लवकर भरून येतात. तसेच कच्च्या अंजिराचा चीक या जखमांना लावावा.
  • मूळव्याधीवर अंजीर हे औषधाप्रमाणे कार्य करते. थंड पाण्यामध्ये दोन ते तीन अंजीर रात्री भिजत घालून सकाळी तेच अंजीर खावे. त्यामुळे शौचास साफ होऊन गुद्द्वाराची आग होत नाही. हा प्रयोग सलग महिनाभर केल्यास मूळव्याध हा आजार आटोक्यात आणता येतो.
  • अशक्तपणा खूप जाणवत असेल तर अंजीर, खजूर, बदाम व लोणी एकत्र करून खावे. १५ दिवसातच अशक्तपणा कमी होऊन शरीरास शक्ती प्राप्त होते.
  • अंजीर त्वचेच्या विकारांमध्ये उत्तम कार्य करते. श्वेतकुष्ठामध्ये (पांढरे डाग) अंजिराचा नियमितपणाने आहार सेवन केल्यास फायदा होतो.
  • पायांना जळवातांच्या भेगा पडल्या असतील तर कच्च्या अंजिराचा चीक लावल्यास लवकर भरून येतात.
  • दम्यावरही अंजीर गुणकारी आहे. अंजीर आणि लालसर पांढरी गोरख चिंच समप्रमाणात घेऊन रोज सकाळी एक तोळा खावी. त्यामुळे श्वसन क्रिया सुलभ होत दम्याचा त्रास कमी होतो.
  • अंजिराचा उपयोग गळवांवरदेखील करता येतो. अंजीर चटणीसारखे बारीक वाटून गरम करून त्यांचे पोटीस बनवावे. ते पोटीस शरीरावर आलेल्या गाठीवर किंवा गळवावर बांधावे. दर दोन तासांच्या अंतराने नवे पोटीस करून बांधल्यास वेदना कमी होतात आणि ती अपरिपक्व गाठ परिपक्व होते किंवा गळवा गळू लागते.

सावधानता-
बहुगुणी अंजीर जसे उपयुक्त आहे, तसेच ते पचनालाही जड आहे. म्हणूनच अंजीर अतिप्रमाणात खाल्ल्यास अपचन होऊन अनेक आजार उद्भवू शकतात. म्हणून पचनशक्तीचा अंदाज घेऊन योग्य प्रमाणातच अंजीर खावेत. तसेच कृत्रिमरीत्या रासायनिक पूड वापरून पिकविलेले अंजीर अजिबात खाऊ नयेत.