scorecardresearch

किंटसुगी : प्रेमभंगातून सावरण्याठी सुवर्ण नियम!

प्रेमभंगामुळे तरुण – तरुणींमध्ये अनेक सकारात्मक आणि नकारात्मक भावनांचा गोंधळ निर्माण होतो. याचे कारण म्हणजे आपण आपल्या जोडीदाराबरोबर घालवलेले क्षण, शेअर केलेल्या आवडी निवडी, म्युच्युअल फ्रेंन्ड्स. अशी गुंतवणूक त्रासाचे कारण बनते.

Break up
ब्रेकअपच्या दुःखातून कसं सावरायचं? (फोटो – FreePik)

डॉ. रश्मी जोशी शेट्टी

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की किंटसुगी म्हणजे काय? काय अर्थ असेल याचा? तर जापनीज संस्कृतीत ब्रोकन पॉट्स म्हणजेच तुटलेल्या भांड्याला सोन्याच्या लेपाने जोडून ते अतिशय सुंदर बनवले जाते . आयुष्याचा सार सांगणारी ही कला आपल्याला आपल्यातील कमीपणा आणि अपूर्णतः स्विकारायला आणि स्वतःवर काम करायला शिकवते . Broken pot जसा gold dust ने सुबक होतो तसंच तुटलेलं हृदयही काही गोल्डन रुल्स (सुवर्ण नियम) फॅालो केल्यावर स्वस्थ होते.

elders saved the child slife Varanasi Viral Video
VIDEO: पावसाच्या पाण्यात विजेचा धक्का बसल्याने तडफडत होता चिमुकला, देवदूत बनून आलेल्या वृद्धांनी वाचवले प्राण
Pankaja Munde
“माझ्यावर निर्णय घ्यायची वेळ…”, पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर भाजपाची प्रतिक्रिया; म्हणाले…
Anil Parab Supreme Court Rahul Narwekar
“सर्वोच्च न्यायालयाच्या खालचं विधानसभा अध्यक्षांचं न्यायालय प्रत्येक आमदाराची…”, अनिल परबांचं मोठं विधान
Marathi Woman Trupti Devrukhkar Shared video
धक्कादायक! मराठी महिलेला मुंबईत घर नाकारलं, मनसेने इंगा दाखवल्यानंतर माफी, व्हायरल व्हिडीओवर संताप व्यक्त

आजकालच्या तरुणांमध्ये ब्रेकअप्सचे प्रमाण वाढतानाचे आपण बघतोय. ब्रेकअप ही अवस्था कुठल्याही जिव्हाळ्याच्या व्यक्तीबरोबर संबंध सुटल्यावर निर्माण होते. ह्या अवस्थेचे काही टप्पे असतात. त्यात पहिला टप्पा म्हणजे असमाधानी (Dissatisfaction) किंवा असंतुष्टपणाची भावना नात्यांमध्ये असलेल्या व्यक्तींना सतावते. दुसऱ्या टप्प्यात ते त्या भावनेचा खुलासा करतात. त्यानंतर त्यावर बोलणी होते आणि त्यानंतर त्यावर संघर्ष निराकरण आणि परीवर्तनाचा प्रयत्न आपापल्या परीने केला जातो. आणि यात अपयश आल्यास प्रेमभंग होतो.

हा आयुष्यरूपी शाळेचा टर्निंग पॉइंट असतो. प्रेमभंगामुळे तरुण – तरुणींमध्ये अनेक सकारात्मक आणि नकारात्मक भावनांचा गोंधळ निर्माण होतो. याचे कारण म्हणजे आपण आपल्या जोडीदाराबरोबर घालवलेले क्षण, शेअर केलेल्या आवडी निवडी, म्युच्युअल फ्रेंन्ड्स. अशी गुंतवणूक त्रासाचे कारण बनते. बऱ्याच जणांना ताण तणाव वाढून त्यांच्यात Anxiety, Depression येऊन स्वतःला इजा पोहोचून प्रवृत्ती वाढून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले जाते. आत्मविश्वास कमी झाल्याने अशा समस्या उद्भवतात. अंमली पदार्थांचे सेवन, शारीरीक आणि मानसिक स्वास्थ्य ढासळणे, वजन कमी होणे अशी अनेक लक्षणे आपल्याला या अवस्थेत दिसतात. पण आजच्या सुपरफास्ट डेटिंगच्या काळात असे हताश राहाणे योग्य नाही. प्रेम ही एक भावना असून ती जशी जन्माला येते, वाढते, लोप पावते तसाच तिचा पूर्नजन्म होतो हे लक्षात घेणे आवश्यक आहे.

हेही वाचा >> Mental Health Special: मनावरचा पहारेकरी!

ब्रेकअप के बाद …

प्रेमभंगानंतर पार्टनरचा राग येणे, मनात दुःख वाटणे, रडायला येणे, इर्ष्या निर्माण होणे हे स्वाभाविक आहे. त्या भावनांना व्यक्त करणे आणि मोकळे होणे महत्वाचे आहे. त्यातच एक्सला वारंवार फोन किंवा मेसेज न करणे, तो किंवा ती तुमच्यासोबत नाही हे सत्य स्विकारून आयुष्यात पुढे जाणे आणि एक्स ला तशी संधी देणे समजदारपणाचे आहे. एकटे न राहता कुटुंबिय आणि जवळच्या मित्र मैत्रिणींबरोबर वेळ घालवल्यावर मन शांत राहण्यास अशावेळी मदत होते. करिअरवर लक्ष केंद्रित करण्याची ही योग्य वेळ असते. याबरोबरच स्वतःला दोष देण टाळा. स्वभाव वेगळे असल्याने आपण वेगळे झालो हे लक्षात घ्या. तुमच्या चुकांमधून शिका आणि त्या परत होणार नाहीत याची काळजी घ्या. दररोज व्यायाम करायची सवय लावा. व्यायामामुळे Endorphins सेक्रेट होऊन मन टवटवीत राहाते. आहारात सकस गोष्टींचा समावेश करा. स्वतःला स्वयंपाक, नृत्य, गायन अशा गोष्टीत रमवा. काहीतरी नवीन कला शिकायला घ्या. ब्रेकअप साजरे करा, स्वतःला काहीतरी गिफ्ट द्या . “बरं झालं “ असं सांगून स्वतःकडे लक्ष द्या . गरज पडल्यास “ देवदास” सारखं न जगता मानसोपचारतज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्या! दररोज आरशात बघून गाणं गा, “तारीफ करू क्या उसकी, जिसने मुझे बनाया.”

(लेखिका मानसोपचारतज्ज्ञ आहेत.)

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 15-09-2023 at 20:15 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×