संयमी खेर

‘सोनी लिव’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ९ डिसेंबरपासून माझा नवा वेबशो ‘फाडू -ए लव्ह स्टोरी’ सुरू झालाय. माझी आवडती दिग्दर्शिका अश्विनी अय्यर तिवारीने ही मालिका दिग्दर्शित केली आहे. २०२१च्या लॉकडाऊनमध्ये मी माझ्या नाशिकच्या फार्म हाऊसवर होते आणि अश्विनीचा मला ऑडिशनसाठी फोन आला. माझ्या घरूनच मी फोनवर ऑडिशन दिली आणि ती अश्विनीला आवडली, माझी ‘मंजिरी’ या मराठमोळ्या व्यक्तिरेखेसाठी तिने निवड केली. माझ्या आजवरच्या अनेक भूमिकांमध्ये ही भूमिका माझ्या अत्यंत जवळची आहे. मी खूपशी मंजिरीसारखी आहे. ‘फाडू ए लव्ह स्टोरी’ या शीर्षकावरून मला आठवण झाली ती, वसईच्या श्रद्धा वालकर या तरुणीची, तिच्या ‘लिव्ह-इन’ पार्टनरनं तिची निर्घण हत्या केली आणि सगळ्या देशाला धक्का बसला. प्रेम आंधळं नसावं, असं वाटतं. आगामी काळात तिच्या त्या पार्टनरला कायद्याने शिक्षा मिळेल, पण निरपराध श्रद्धाला तिचे प्राण पुन्हा मिळणार नाहीत. प्रेमात मोठी शक्ती आहे यावर माझा विश्वास आहे, पण सदसद्विवेकबुद्धीला जागून प्रेम करावं, असं मला वाटतं. माझी ही मालिकासुद्धा त्याच विषयावर आहे.

Chess Candidates 2024, World Championship contender, D Gukesh, Gukesh
अनुभवात कमी, रँकिंगमध्ये खाली…तरीही कँडिडेट्स स्पर्धेत गुकेश कसा ठरला विजयी? आनंदप्रमाणे जगज्जेता बनण्याची शक्यता किती?
candidates chess gukesh beat abasov
कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा : गुकेश पुन्हा संयुक्त आघाडीवर; प्रज्ञानंदने नेपोम्नियाशीला बरोबरीत रोखले; कारुआनाकडून विदितचा पराभव
Kangana Ranaut Buys Mercedes
निवडणूकीपूर्वी अभिनेत्री कंगना रणौतने खरेदी केली महागडी लक्झरी कार; किंमत पाहून तुम्हालाही फुटेल घाम
Rohit Sharma Talking about his retirement in the Breakfast with Champions show
रोहित शर्मा कधी म्हणणार क्रिकेटला अलविदा? हिटमॅनने निवृत्तीबाबत केलं मोठं वक्तव्य

आणखी वााचा :

चित्रपट वा मालिकांच्या शूटिंगसाठी मी मुंबईला येते, पण मी राहाते मात्र नाशिकमध्येच. आमचे नाशिकचे फार्म हाऊस म्हणजे ऑरगॅनिक भाजीपाला, फळे, धान्य तर आहेतच शिवाय इथे मी, आई (उत्तरा खेर – माजी मिस इंडिया), बाबा (अद्वैत खेर – प्रसिद्ध फॅशन फोटोग्राफर), माझी मोठी बहीण संस्कृती खेर (मॉडेल, अभिनेत्री) असे आम्ही चौघे मिळून इथे रेस्टॉरंट चालवतो, ते तसं वैशिष्ट्यपूर्ण आहे. ऑथेंटिक टेस्ट आणि काही भारतीय तर काही इंटर काँटिनेंटल डिशेस अशी युनिक फ्युजन रेसिपीज इथे आहेत. हे रेस्टॉरंट चालवणं आम्हा सगळ्यांना आवडतं, फार्मिंग आवडतं, इथे निसर्गाच्या सान्निध्यात राहाणं आम्हा सगळ्यांना प्रिय आहे. आमच्या व्यावसायिक कामानिमित्त आमचा वावर मुंबईत असतो, अन्यथा आम्ही नाशिकला राहाणंच पसंत करतो. माझं आणि संस्कृतीचं शिक्षणही नाशिकला झालं आहे. लॉकडाऊनच्या काळातही शूटिंगचे दिवस सोडलेत तर मी नाशिकलाच होते. त्या काळात अनेक नव्या रेसिपीज शिकले. वेगवेगळे स्ट्यूज करण्यास शिकले. मला स्वयंपाक करताही येतो आणि नव्या डिश शिकण्याची आवडही आहे, त्यामुळे त्यात मस्त मन रमतं.

आणखी वााचा :विवाह समुपदेशन: अस्वस्थ करणारं नवऱ्याचं ‘क्रॉस ड्रेसिंग’

अभिनय हा रक्तातून-परंपरेतून यावा लागतो असं मानलं जातं. मला अभिनयाचा वारसा जुन्या काळात अतिशय प्रसिद्ध असलेली माझी आजी अभिनेत्री उषा किरणकडून मिळाला. १९४८ ते २००९ पर्यंत ती हिंदी, मराठी चित्रपटांमधून सक्रिय होती. तिच्या उमेदीच्या काळात दिलीपकुमार, राज कपूर, देव आनंद, किशोरकुमार यांच्या नायिकेच्या आणि तरीही सशक्त भूमिका तिने केल्या. पुढे ती चरित्र भूमिकांमधून, उत्कृष्ट भूमिकांत दिसली. तिचा अभिनयाचा वारसा मी समर्थपणे चालवेन किंवा नाही ठाऊक नाही, पण प्रयत्न तर तसा आहे. उषाकिरणची लेक म्हणजे अभिनेत्री तन्वी खेर (तन्वी आझमी) माझी आत्या. माझी ही आत्यादेखील एक सहज अभिनेत्री आहे. अशा फिल्मी कुटुंबात माझा जन्म झाला आहे. मला अभिनयाचा वारसा लाभलेला असला तरी आम्ही कुणीच अजिबातच फिल्मी नाही. ग्लॅमरपासून दूर असलेल्या माहोलमध्ये मी वाढले. शिक्षण घेतलं आणि कुणाच्याही मदतीशिवाय आतापर्यंतचा अभिनयाचा प्रवास मी ऑडिशन देऊन केला, अगदी माझा पहिला चित्रपट ‘मिरझिया’पासून. या फिल्मच्या ऑडिशनमध्ये देखील या फिल्मचे दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांना माझ्याविषयी काहीही माहिती नव्हती. असो!

आणखी वााचा : ओठ कोरडे पडलेत? हे वाचा…

(अनिल कपूरचा मुलगा जो ‘मिरझिया’मध्ये को-स्टार होता) मित्र लाभला. माझा पहिलाच सिनेमा अपयशी झाला तरी राकेश मेहरा माझ्या निकटवर्तींयांपैकी एक आहेत. याशिवाय मी अनुराग कश्यपसोबत अनेक ॲक्टिंग वर्कशॉपस् केली आहेत. मला कधीही कसलीही शंका मनात आली तरी या दोघांशी बोलून शंकानिरसन करते. मला अभिनयाच्या क्षेत्रात सात वर्षे झाली असली तरी माझी कुणाशी फार मैत्री नाही, वैर तर कुणाशीच नाही. ‘ओटीटी’ प्लॅटफॉर्मने अभिनयासाठी अनेकविध संधी उपलब्ध करून दिलेल्या असल्या तरी सगळ्याच क्षेत्रात अटीतटीची स्पर्धा असते तशीच ती इथे आहेच, अनेक नामांकित स्टार्स हल्ली ‘ओटीटी’साठी काम करत आहेत, शिवाय दररोज अनेक कलाकार नव्याने इथे दाखल होत आहेत, पण स्पर्धेच्या या जगात माझी स्पर्धक मीच आहे. कुणाशीही माझी स्पर्धा नाही, माझे कुणी स्पर्धक नाहीत, माझी स्पर्धा माझ्याशीच आहे. माझ्या प्रत्येक परफॉर्मन्समध्ये मी शंभर टक्के न्याय दिला पाहिजे, मी अभिनयात कुणाचे अनुकरण करतेय असं कधीही घडता कामा नये. भूमिकेसाठी मी कसून अभ्यास केला पाहिजे, असा माझा प्रयत्न असतो आणि कायम राहील.