मुकेश अंबानी भारतातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखले जातात. मुकेश अंबानी यांचे वडील धीरुभाई अंबानी यांनी रिलायन्स समूहाची स्थापना केली. भारतीय अर्थव्यवस्थेत रिलायन्स समूहाचा मोठा वाटा आहे. धीरुभाई अंबानी यांच्या निधनानंतर रिलायन्स समूहाची जबाबदारी त्यांची दोन मुले मुकेश व अनिल अंबानींकडे गेली. मुकेश व अनिल अंबानींप्रमाणेच त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य नेहमीच चर्चेत असतो. या दोन्ही भावांची संपत्ती प्रत्येकाला माहिती आहे, पण धीरुभाई अंबानी यांची पत्नी व मुकेश व अनिल अंबानी यांची आई कोकिलाबेन यांची संपत्ती किती आहे? याबाबत तुम्हाला माहिती आहे का? नसेल तर आम्ही सांगतो.

हेही वाचा- Navjyot kayr : मिस वर्ल्ड स्पर्धेत न्यूझीलंडचे प्रतिनिधित्व करणारी भारतीय वंशाची महिला आहे तरी कोण?

Who is Landmark Group CEO Renuka Jagtiani
एकेकाळी होती कॅबचालकाची पत्नी, आज अब्जाधीशांच्या यादीत मिळवले स्थान; कोण आहे रेणुका जगतियानी?
Goshta Asamanyanchi Dadasaheb Bhagat
गोष्ट असामान्यांची Video: इन्फोसिसमध्ये ऑफिस बाॅय ते दोन स्टार्टअप्सचा संस्थापक – दादासाहेब भगत
baba kalyani s niece nephew move court over property dispute
भारत फोर्जचे अध्यक्ष बाबा कल्याणी यांच्या कुटुंबीयांत संपत्तीचा वाद; कल्याणी यांच्या भाच्यांकडून दिवाणी न्यायालयात दावा
rohini acharya lalu yadav
लालू प्रसाद यादव यांच्या कन्येची राजकारणात एन्ट्री; कोण आहेत रोहिणी आचार्य?

कोकिलाबेन यांचा जन्म २४ फेब्रुवारी १९३४ रोजी गुजरातमधील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. नुकताच त्यांनी आपला ९० वा वाढदिवस साजरा केला आहे. कोकिलाबेन यांनी १० वीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. वयाच्या २१ व्या वर्षी त्यांचा विवाह धीरुभाई अंबानी यांच्याबरोबर झाला. लग्नानंतर कंपनीच्या सभा व कार्यक्रमांना उपस्थित राहता यावे यासाठी कोकिलाबेन यांना इंग्रजी शिकण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले. रिलायन्स समूहाच्या अनेक कार्यक्रमांना आजही कोकिलाबेन उपस्थित राहतात.

हेही वाचा- Success Story: कायद्याची पदवी, संगीताची आवड…; भेटा कोचिंगशिवाय दुसऱ्या प्रयत्नात IAS होणाऱ्या पल्लवी मिश्राला

कोकिलाबेन अंबानी यांच्या संपत्तीबाबत बोलायचे झाल्यास अद्याप सार्वजनिकरित्या त्यांची संपत्ती उघड करण्यात आलेली नाही. त्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या व्यवसायात थेट सहभाग घेत नाहीत. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार त्यांची एकूण संपत्ती सुमारे १८ हजार कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येते. कोकिलाबेन यांना महागड्या गाड्यांची खूप आवड आहे. त्यांच्याकडे आलिशान गाड्यांचा संग्रह आहे. मर्सिडीज-बेंझ ही त्यांची आवडती कार आहे. कोकिलाबेन यांना निरनिराळ्या ठिकाणांना भेट द्यायाला आवडते. वयाच्या ९० व्या वर्षातही त्या प्रवास करतात. लंडन व स्वित्झर्लंड त्यांची आवडती शहरे आहेत. धीरुभाई अंबानी ह्यात असताना कोकिलाबेन व धीरुभाई वर्षातून दोनदा फिरायला जायचे, कारण दोघांनाही प्रवासाची खूप आवड होती.

हेही वाचा- WPL 2024 : कोण आहे सजीवन सजना? जिच्या एका षटकाराने वेधले सर्व जगाचे लक्ष

कोकिलाबेन व धीरुभाई यांची दोन्ही मुले मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी दोघेही व्यवसाय क्षेत्रात कार्यरत आहेत. मुकेश अंबानी हे रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन आणि सर्वात मोठे शेअरहोल्डर आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली रिलायन्सने दूरसंचार, रिटेल आणि डिजिटल सेवांसह विविध क्षेत्रांत विस्तार केला आहे. जगातील सगळ्यात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत मुकेश अंबानी यांच्या नावाचा समावेश आहे.

हेही वाचा- UPSC: लेक असावी तर अशी! वडील रस्त्यावर पकोडे विकायचे, लेकीनं यूपीएससीत मारली बाजी

तर अनिल अंबानीसुद्धा कौटुंबिक व्यवसायात कार्यरत होते. त्यांनी रिलायन्स समूहाचे अध्यक्ष म्हणून काम केले आहे, ज्यामध्ये टेलिकॉम, पायाभूत सुविधा, ऊर्जा आणि वित्त यांसारख्या क्षेत्रांतील विविध कंपन्यांचा समावेश आहे. व्यावसायिक आव्हाने आणि कायदेशीर विवादांमुळे अनिल अंबानी यांची रिलायन्स समूहातील भूमिका गेल्या काही वर्षांत कमी झाली आहे.