Weight According Height: देशात लठ्ठपणाने ग्रस्त लोकांची संख्या झपाट्याने वाढत आहे. वाढत्या वजनामुळे अनेकजण त्रस्त आहेत. लठ्ठपणा कमी करण्यासाठी निरोगी जीवनशैली, सकस आहार आणि नियमित व्यायाम अत्यंत आवश्यक आहे. पुरुषांपेक्षा महिलांना वाढत्या वजनाची चिंता असते. वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी महिला वेगवेगळे पर्याय निवडतात, तरीही त्यांचे वजन नियंत्रित होत नाही. महिलांना कंबर, हिप्स आणि पोटाची चरबी कमी करण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो. विज्ञानानुसार महिला आणि पुरुषांमधील अनुवांशिक आणि बायोलॉजिकल फरकांमुळे महिलांना वजन कमी करण्यात अडचणी येतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अनेक वेळा असंही घडतं की स्त्रिया वजन कमी करण्यासाठी एवढा प्रयत्न करतात की त्यांचे वजन किती कमी झाले आहे हे त्यांना कळतही नाही. बर्‍याच वेळा स्त्रिया हेवी वर्कआउट आणि डाएट कंट्रोलमुळे खूप वजन कमी करतात. पण त्यांना त्यांच्या उंची आणि वयानुसार वजन किती असावे हे माहीत नसते.

हेल्थ लाईनच्या बातमीनुसार, महिलांचे वजन त्यांच्या उंची आणि वयानुसार असले पाहिजे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या तक्त्यानुसार वयानुसार आणि उंचीनुसार वजन असावे. सरकारने जारी केलेल्या तक्त्याच्या मदतीने महिला त्यांच्या उंचीनुसार त्यांचे वजन नियंत्रित करू शकतात.

( हे ही वाचा: तुमच्या वयानुसार तुमची Blood Sugar किती हवी? जाणून घ्या ‘हा’ सोपा तक्ता)

महिलांचे सरासरी वजन किती असावे? What is the average weight for women?

महिलांच्या उंचीनुसार वजन किती असावे

उंची सरासरी वजन
४ फूट १० इंच ४१ ते ५२ किलो दरम्यान असावे
५ फूट ४४ ते ५७.७ किलो दरम्यान असावे
५ फूट २ इंच ४९ ते ६३ किलो दरम्यान असावे
५ फूट ४ इंच ४९ ते ६३ किलो दरम्यान असावे
५ फूट ६ इंच ५३ ते ६७ किलो दरम्यान असावे
५ फूट ८ इंच ५६ ते ७१ किलो दरम्यान असावे
५ फूट १० इंच ५९ ते ७५ किलो दरम्यान असावे
६ फूट ६३ ते ८० किलो दरम्यान असावे
मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Know the ideal weight as per height chart for female gps
First published on: 20-12-2022 at 15:38 IST