ADC पदी नियुक्ती हा युवा अधिकाऱ्यांना मिळणारा सर्वोच्च सन्मान समजला जातो. उत्तम सर्व्हिस रेकॉर्ड आणि कामगिरी असलेल्यांनाच ADC बनण्याची संधी मिळते. नेतृत्व कौशल्य, सर्व्हिस रेकॉर्ड आणि ऑपरेशनल परफॉरमन्स या आधारावर ही नियुक्ती केली जाते. त्यामुळेच अत्यंत कार्यक्षम अधिकाऱ्यांचीच ADC पदी नियुक्ती होते. कामाप्रति निष्ठा, धाडसी वृत्ती, जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर यशस्वी सोळंकी याची निवड झाली आहे. यशस्वी सोळंकी यांचे वडील सरकारी शाळेत शिक्षक तर आई गृहिणी आहे.
लहानपणापासूनच यशस्वी यांना शिक्षणाबरोबरच खेळांतही विशेष आवड होती. त्या उत्तम बॅडमिंटन आणि व्हॉलीबॉलपटू आहेत. यशस्वी या भारतीय नौदलात फ्लाईट लेफ्टनंटपदी कार्यरत आहेत.
संरक्षण क्षेत्रात महिला रोज नवीन भरारी घेत आहेत. अनेक ऐतिहासिक पदांवर स्वकर्तृत्वाने त्या आपला ठसा उमटवत आहेत आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी एक आदर्शही निर्माण करत आहेत. फ्लाईट लेफ्टनंट यशस्वी सोळंकी यांनीही असाच इतिहास रचला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या ADC म्हणून यशस्वी सोळंकी यांची नियुक्ती झाली आहे. ADC म्हणजे सशस्त्र दलांचे सर्वोच्च कमांडरपद.
यशस्वी यांच्या रुपाने भारतीय नौदलातील महिला अधिकाऱ्याला हा सन्मान मिळाला आहे. आतापर्यंत या पदावर फक्त पुरुष अधिकाऱ्यांचीच नियुक्ती होत असे. अगदी महिला राष्ट्रपती असल्या तरीही ADC मात्र पुरुषच असायचे. पण यशस्वी सोलंकी यांच्या नियुक्तीने ही वाटही महिलांसाठी खुली झाली आहे. इतकंच नाही तर राष्ट्रपती भवनातील राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शेजारच्या खोलीत आता त्यांचं वास्तव्य असेल.
ADC म्हणजे नेमकं काय?
ADC म्हणजे Aide- de-Camp. हे एक अत्यंत प्रतिष्ठेचं आणि तितकंच जबाबदारीचं पद आहे. आपल्या देशाचे राष्ट्रपती हे देशाचे प्रथम नागरिक समजले जातात आणि ते तीनही दलांचे सुप्रीम कमांडर असतात. त्यांच्यासाठी पाच ADC ची नियुक्ती होते. यामध्ये तीन आर्मीमधील, एक हवाई दल आणि एक नौदलातील अधिकारी असतात. या अधिकाऱ्यांची निवड स्वत: राष्ट्रपती करतात. ADC हे राष्ट्रपतींचे सगळ्यात जवळचे सैन्य सहाय्यक मानले जातात. राष्ट्रपती आणि लष्करामधील संवाद साधण्याचे काम ADC करतात. राष्ट्रपतींच्या बरोबर सर्व औपचारिक कार्यक्रमांमध्ये ADC त्यांची मदत करतात, ते सतत त्यांच्यासोबतच असतात. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बैठका, परिषद, संमेलन आणि भेटींच्या दरम्यान शिष्टाचार पाळण्याची जबाबदारी ADC ची असते.
राष्ट्रपतींचे दैनंदिन कार्यक्रम (शेड्युल) आणि सुरक्षेसंबंधीच्या कार्यक्रमांमध्येही त्यांची मदत करतात. त्यामुळेच ADC हे शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या फिट असणं आवश्यक असतं. याआधीच्या ADC चा कार्यकाळ पूर्ण होत होता. नवीन नियुक्तीसाठी तीन महिला अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली होती. त्या १५ दिवस राष्ट्रपती भवनात ठेवण्यात होत्या. या दरम्यान त्यांचे मूल्यांकन करण्यात आले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वत: या तिघीजणींचे इंटरव्ह्यू घेतले. शारीरिक तंदुरुस्ती, बुध्दीमत्ता आणि आजूबाजूच्या परिस्थितीची निरीक्षण आणि निर्णयक्षमता या महत्वाच्या मापदंडांवर यशस्वी यांची निवड करण्यात आली. यशस्वी यांची नियुक्ती तीन वर्षांसाठी असेल. ADC ना सतत म्हणजे २४ तास अलर्ट राहावं लागतं. सतत राष्ट्रपतींच्या संपर्कात राहणं, त्यांना वेळोवेळी माहिती देणं या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात.
ADC पदी नियुक्ती हा युवा अधिकाऱ्यांना मिळणारा सर्वोच्च सन्मान समजला जातो. उत्तम सर्व्हिस रेकॉर्ड आणि कामगिरी असलेल्यांनाच ADC बनण्याची संधी मिळते. नेतृत्व कौशल्य, सर्व्हिस रेकॉर्ड आणि ऑपरेशनल परफॉरमन्स या आधारावर ही नियुक्ती केली जाते. त्यामुळेच अत्यंत कार्यक्षम अधिकाऱ्यांचीच ADC पदी नियुक्ती होते. कामाप्रति निष्ठा, धाडसी वृत्ती, जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर यशस्वी सोळंकी याची निवड झाली आहे. यशस्वी सोळंकी यांचे वडील सरकारी शाळेत शिक्षक तर आई गृहिणी आहे. लहानपणापासूनच यशस्वी यांना शिक्षणाबरोबरच खेळांतही विशेष आवड होती. त्या उत्तम बॅडमिंटन आणि व्हॉलीबॉलपटू आहेत. यशस्वी या भारतीय नौदलात फ्लाईट लेफ्टनंटपदी कार्यरत आहेत. दिल्लीच्या लेडी श्रीराम कॉलेजमधून त्यांनी शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी NDA मधून विशेष प्रशिक्षण घेतलं. २०१२ मध्ये शॉर्ट सर्व्हिस कमिशन (SSC) अंतर्गत त्या नौदलाच्या लॉजिस्टिक शाखेत रुजू झाल्या. कडक शिस्तीचं काटेकोरपणे पालन, प्रचंड मेहनत आणि नेतृत्व गुणांच्या आधारावर यशस्वी यांना हा मान मिळाला आहे. अगदी लहानपणापासूनच संरक्षण क्षेत्रात येऊन देशासाठी काहीतरी करण्याचं त्यांचं स्वप्नं होतं. मेहनत आणि गुणवत्तेच्या जोरावर यशस्वी यांनी हे स्वप्नं पूर्ण केलं आहे.
त्यांची नियुक्ती ही त्यांच्या आयुष्यातील सर्वांत महत्त्वाचा टप्पा तर आहेच, पण लष्करातील सर्वोच्च औपचारिक आणि प्रशासकीय जबाबदारीची पदे निभावण्यासाठी महिलांवरील वाढत्या विश्वासाचंही हे प्रतिक आहे. लष्करातील प्रशासन ते युध्दभूमी ते अगदी राष्ट्रपती भवन… महिलांना संधी मिळाली तर त्या प्रत्येक संधीचं सोनं करू शकतात याचं हे उत्तम उदाहरण आहे. सर्वसामान्य परिस्थितीत असूनही देशासाठी काहीतरी करण्याचं स्वप्नं पाहणाऱ्या असंख्य तरुणींसाठी प्रेरणा आहे. जिद्द, प्रामाणिकपणा, कामाप्रति निष्ठा आणि कष्टाची तयारी असेल तर कोणतंही ध्येय अशक्य नाही हेच यशस्वी यांनी दाखवून दिलं आहे.