‘माझे श्वान माझं कुटुंबच आहेत!’ असं म्हणत तिनं कॉर्गी प्रजातीच्या श्वानांच्या तब्बल १४ पिढ्या कोडकौतुकानं वाढवल्या, असं तिच्याबद्दल आवर्जून सांगितलं जातं. राणी झाल्यानंतरच्या काळात तिनं चांगल्या ३० श्वानांची काळजी घेतली, ती राणी एलिझाबेथ द्वितीय!

राणी एलिझाबेथ द्वितीय यांचा वयाच्या ९६ व्या वर्षी शुक्रवारी मृत्यू झाला. त्यांचं प्राणीप्रेम आणि त्यातही विशेषत: श्वानप्रेम सर्वश्रूत होतं. अगदी जणू ते त्यांचं पहिलं प्रेम असल्यासारखं! एलिझाबेथ यांची सून प्रिन्सेस डायना तर त्यांच्या श्वानांना ‘एलिझाबेथ यांचं मूव्हिंग कार्पेट’ असंच संबोध. कारण एलिझाबेथ जिथे जातील तिथे त्यांच्या मागोमाग त्यांचे श्वानमित्र जात असत. आताही एलिझाबेथ यांच्या पश्चात त्यांचे ४ श्वान आहेत. यातले दोन पेमब्रोक वेल्श कॉर्गी प्रजातीचे, एक डॉर्गी (म्हणजे कॉर्गी आणि डशंड मिश्र प्रजाती) आणि एक कॉकर स्पॅनिएल श्वान आहे. श्वानांच्या या सर्व प्रजाती उंचीला कमी असतात. त्यातही कॉर्गी ही एलिझाबेथ यांची खास सर्वांत आवडती श्वानप्रजाती.
आणखी वाचा : ….अन् तेव्हा ती बाहुलीसारखी नटलेली दिसेल

Nandurbar, Heena Gavit,
नंदुरबारमध्ये डॉ. हिना गावित यांच्यासमोर स्वपक्षीय, मित्रपक्षांच्या नाराजीचे आव्हान
Randeep Hudda Post
सरबजीत सिंग यांच्या मारेकऱ्याची हत्या, रणदीप हुडाने मानले अज्ञात मारेकऱ्यांचे आभार, पोस्ट शेअर करत म्हणाला..
drama review of Himalayachi sawali
‘ती’च्या भोवती..! हिमालयाएवढी खंबीर!
500 Years Later Surya Grahan Collides With Rarest Chaturgrahi Yog
५०० वर्षांनी सूर्य ग्रहणाला अद्भुत दुर्मिळ योग; ८ एप्रिलपासून ‘या’ राशींच्या नशिबात अमाप श्रीमंती, नशीब चमकणार

क्यूट दिसण्याबरोबरच कॉर्गी श्वान अतिशय उत्फुल्ल, ऊर्जेनं भरलेले असतात. त्यांची ही उर्जा, त्यांचं ‘स्पिरिट’ एलिझाबेथ यांना आवडायचं असं म्हणतात. १९३३ मध्ये डूकी हा पाळीव कॉर्गी श्वान एलिझाबेथ यांच्या कुटुंबाचा भाग झाला. तेव्हा एलिझाबेथ फक्त ७ वर्षांच्या होत्या. हा त्यांचा पहिला कॉर्गी श्वान. अकरा वर्षांनंतर- त्यांच्या अठराव्या वाढदिवसाला वडिलांनी त्यांना सूझन ही कॉर्गी श्वान भेट म्हणून दिली. विशेष म्हणजे फिलिप यांच्याशी विवाहबद्ध झाल्यानंतर हनिमूनच्या ठिकाणीही एलिझाबेथ यांनी सूझनला नेलं होतं, अशी माहिती ‘रीडर्स डायजेस्ट’च्या एका लेखात आहे.

१९४९ मध्ये सूझनला दोन पिल्लं झाली आणि एलिझाबेथ यांच्याकडचा कॉर्गी संसार पुढे वाढतच गेला. या कॉर्गींना ‘रॉयल कॉर्गी’ असं संबोधलं जात असे. एलिझाबेथ यांच्याकडच्या शेवटच्या रॉयल कॉर्गीचं नाव होतं विलो. त्या श्वानाचा २०१८ मध्ये कर्करोगामुळे मृत्यू झाला. त्यानंतर कॉर्गी ब्रीडिंग न करण्याचा निर्णय एलिझाबेथ यांनी घेतला, कारण आपल्या निधनानंतर कॉर्गी श्वान मागे राहायला नको, अशी त्यांची इच्छा होती. मात्र पती- प्रिन्स फिलिप यांच्या मृत्यूनंतर पुत्र अँड्ऱ्यू यांनी एलिझाबेथ यांना म्युइक नावाचा कॉर्गी श्वान दिला होता, तो एलिझाबेथ यांच्याकडे राहिला. शिवाय २०२१ मध्ये एलिझाबेथ यांच्या वाढदिवसाला त्यांना मिळालेल्या कॉर्गी श्वानाचं नाव आहे सँडी, राणीच्या कॉर्गी व डशंड मिक्स ब्रीड श्वानाचं नाव कँडी, तर लिसी ही कॉकर स्पॅनिएल श्वान आहे.

आता राणीच्या निधनानंतर त्यांचे श्वान कुणाकडे जाणार असा प्रश्न विचारला जातो आहे. या बाबतीत काही अधिकृत खुलासा आलेला नसला, तरी या श्वानांना नवं, प्रेमळ घर नक्कीच मिळेल असं सांगितलं जातं. इंग्लंडच्या राजघराण्यात श्वानप्रेम आहेच, पण अगदी केवळ एलिझाबेथ यांना प्रिय असलेल्या कॉर्गी श्वानांचंच खास प्रेम असणारी मंडळी नाहीत, असं म्हटलं जातं. असं असूनही कुटुंबीय एलिझाबेथ यांच्या श्वानांना उत्तम सांभाळतील, तसंच एलिझाबेथ यांच्या अवतीभवती काम करणारी माणसंही श्वानप्रेमी असल्यामुळे राजघराण्यात त्यांच्या श्वानांना कुटुंब मिळालं नाहीच, तरी जवळचे, विश्वासू कर्मचारी आहेतच, असं सांगितलं जातं.

एलिझाबेथ यांनी फेब्रुवारी २०२२ मध्ये इंग्लंडची राणी म्हणून ७० वर्षं पूर्ण केली. या ‘प्लॅटिनम ज्युबिली’च्या आनंदोत्सवातही राणीचं श्वानप्रेम झळकलं. मे महिन्यात राजघराण्यानं ‘पीजे- द कॉर्गी’ हा खास इमोजी सादर केला होता. हे चक्क एका कॉर्गी श्वानाचं क्यूट चित्र आहे, ज्यात या श्वानानं मुकुटही घातला आहे. यातला ‘पीजे’ म्हणजे अर्थातच ‘प्लॅटिनम ज्युबिली’. ‘ट्विटर’वर ‘हॅशटॅग प्लॅटिनम ज्युबिली’सारखे काही टॅग्ज देण्यात आले होते, ते वापरल्यावर हा विशिष्ट इमोजी दिसेल आणि राणीच्या या प्रवासाचा आनंद साजरा करताना तो जरूर वापरा, असं आवाहन तेव्हा करण्यात आलं होतं.