UPSC Success Story : जर भारतातील सर्वात कठीण परीक्षांबद्दल बोलायचं झालं तर आपल्याला लगेच UPSC, IIT किंवा CAT या परिक्षा आठवतात. मात्र एका तरुणीनं या तिन्ही परीक्षा उत्तीर्ण केल्या आहेत. एवढंच नाहीतर यूपीएससीच्या स्वप्नासाठी तिनं लंडनमधली नोकरी सोडली अन् ती भारतात आली. दरवर्षी सुमारे १० लाख लोक केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेला बसतात. त्यापैकी काही निवडक उमेदवारच पहिल्या प्रयत्नात UPSC उत्तीर्ण होतात. यावरुन ही परीक्षा किती कठीण आहे, याचा अंदाज येऊ शकतो. अशा निवडक विद्यार्थ्यांमध्ये हरियाणातील रेवाडी येथील आयएएस अधिकारी दिव्या मित्तल यांचा समावेश आहे.

दिव्या मित्तल या सध्या IAS अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. दिव्या मित्तल यांनी कोचिंगशिवाय पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी उत्तीर्ण केली आणि त्या आयपीएस झाल्या. त्यानंतर, त्यांच्या दुसऱ्या प्रयत्नात, त्यांनी २०१२ मध्ये UPSC CSE मध्ये ६८ वी रँक मिळवली आणि शेवटी त्या IAS अधिकारी झाल्या. यापूर्वी उत्तर प्रदेशातील मिर्झापूरचे जिल्हा दंडाधिकारी म्हणून त्या कार्यरत होत्या. त्यांचे पती गगनदीप सिंग यांनीही UPSC उत्तीर्ण केली असून ते भारत सरकारच्या सेवेत कानपूर येथे IAS म्हणून कार्यरत आहेत.

BSP turned Congress leader Kunwar Danish Ali
पंतप्रधान मोदींचा हल्ला दानिश अलींसाठी कौतुकाचा विषय, काय म्हणाले अली?
केजरीवाल तुरुंगात काय खातात? ईडीच्या आरोपानंतर वकिलांनी न्यायालयात दिला ४८ जेवणांचा तपशील; इन्सुलिनबाबत न्यायमूर्ती म्हणाले…
jitendra awhad marathi news, lucky compound building collapse marathi news
“लकी कंपाऊंड दुर्घटनेनंतरही अधिकाऱ्यांनी शिकायला हवे होते, पण…”, आमदार जितेंद्र आव्हाड यांची पालिका अधिकाऱ्यांवर टीका
rbi should give top priority to development says pm narendra modi
विकासाला रिझर्व्ह बँकेने सर्वोच्च प्राधान्य द्यावे; व्याजदर कपातीसारख्या उपायांवर लक्ष देण्याची पंतप्रधानांची हाक 

यशाचा गुप्त मंत्र

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT), इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM) आणि UPSC सारख्या प्रतिष्ठित संस्थांसाठी प्रवेश परीक्षा यशस्वीपणे पास करण्याचा त्यांचा यशाचा गुप्त मंत्र आणि रणनीती दिव्या यांनी ट्विटरवर सांगितली होती. दिव्या मित्तल सांगतात, शैक्षणिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी स्वत:च्या ध्येयाकडे लक्ष केंद्रित केलं होतं, तसेच दृढनिश्चयाच्या महत्त्वावर जोर दिला. तसेच मोबाईलचा वापर कमी करावा नाहितर अनेकदा लक्ष विचलित होऊ शकते. असा सल्ला त्यांनी दिला. मित्तल यांनी आयआयटी, आयआयएम आणि यूपीएससी परीक्षांच्या तयारीला प्राधान्य देण्याची शिफारस केली. तसेच एकाग्रता वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांना ध्यान करण्याचाही सल्ला दिला.

हेही वाचा >> अवघे ३०० रुपये घेऊन घर सोडलेली मुलगी झाली अब्जाधीश; वाचा चिनू कालाचा संघर्षमय प्रवास

सकाळी अभ्यास करा

मोठ्या आवाजाचा गजर लावून, फोन किंवा घड्याळ तुमच्यापासून दूर ठेवा. कारण जेव्हा तुम्ही गजर बंद करण्यासाठी अंथरुणातून एकदा उठला की तुझी झोप मोड होईल. तुम्ही पुन्हा झोपण्याचा किंवा अभ्यास न करण्याचा निर्णय घेणार नाही. सकाळी सकाळी लवकर अभ्यास करणे चांगले असते विशेषत: यावेळी लक्ष केंद्रित करता येते.

लक्ष केंद्रित करण्यासाठी प्रत्येक सत्रानंतर १५ मिनिटांचा ब्रेक घ्या

अभ्यासादरम्यान ९० मिनिट/ २ तास लक्ष केंद्रित करण्यासाठी सत्र ठरवा आणि प्रत्येक सत्रानंतर १५ मिनिटांचा ब्रेक घ्या. एकावेळी तुम्ही जास्त काळ लक्ष केंद्रित करू शकत नाही. त्यामुळे प्रत्येक सेशनसाठी तुम्हाला जोपर्यंत अलार्म वाजत नाही तोपर्यंत अभ्यासाशिवाय दुसरे काहीही करू नका

मित्तल यांनी पुढे सांगितले की इच्छुकांनी मैदानी व्यायाम, शक्यतो २० मिनिटे चालणे आणि उद्यानात वेळ घालवून निसर्गाशी संपर्क साधला पाहिजे. यूपीएससी ही परीक्षा कठीण असली तरी प्रयत्न करत राहणं गरजेचं असते. एकदा अपयश आलं म्हणून खचून जाऊ नका. असंही त्या शेवटी म्हणाल्या.