जगातील सर्वात मोठे खासगी निवासस्थान म्हटलं की तुमच्या डोळ्यासमोर एकतर बकिंगहॅम पॅलेस, ब्रिटनचं राजघराणं किंवा मुंबईतील मुकेश अंबानी यांचं घर आलं असेल. मात्र, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, जगातील सर्वात मोठे खासगी निवासस्थान गुजरात येथे आहे. लक्ष्मी विलास पॅलेस हे जगातील सर्वात मोठे खासगी घर आहे. हे पॅलेस इतके आलिशान आणि भव्य आहे की त्याच्या समोर तुम्ही सर्व काही विसरून जाल. हे निवासस्थान तब्बल ७०० एकर परिसरात पसरले आहे. हे गायकवाड घराण्याचे महाराजा सयाजीराव गायकवाड तिसरे यांनी १८९० मध्ये बांधले होते. आज हे घर पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे. दरम्यान, या निवासस्थानात राहणारी महिला राधिकाराजे गायकवाड यांच्याबाद्दल आज आपण जाणून घेऊया.

लक्ष्मी विलास पॅलेसबद्दल बोलायचे तर ते सुमारे ७०० एकरमध्ये पसरलेले आहे. त्यात बाग आणि इतर लक्झरी सुविधांचा समावेश आहे. एक छोटंसं गाव इथे सहज वसवता येईल. या पॅलेसला स्वतःचा गोल्फ कोर्स आहे. बडोद्यातील स्थानिक आजही राजघराण्याला मान देतात. पूर्वीच्या राजघराण्याचे नेतृत्व सध्या समरजितसिंह गायकवाड आणि त्यांच्या पत्नी राधिकाराजे गायकवाड यांच्याकडे आहे.

हाऊसिंग डॉट कॉमच्या रिपोर्टनुसार, लक्ष्मी विलास पॅलेस ३,०४,९२,००० चौरस फूट क्षेत्रफळात पसरलेला आहे, तर बकिंगहॅम पॅलेस ८,२८,८२१ स्क्वेअर फूटमध्ये पसरलेला आहे. तर जगातील सर्वात महागडे मुकेश अंबानी यांचे आलिशान मुंबईतील घर अँटिलिया ४८,७८० चौरस फूट क्षेत्रफळात पसरलेले आहे.

लक्ष्मी विलास पॅलेसमध्ये १७० हून अधिक खोल्या आहेत. हे महाराजा सयाजीराव गायकवाड तिसरे यांनी १८९० मध्ये बांधले होते. हे पॅलेस बांधले गेले त्यावेळी लक्ष्मी विलास पॅलेसची किंमत सुमारे ब्रिटीश पाउंडनुसार १८०,००० इतकी होती.

हेही वाचा >> कोणताही क्लास न लावता मारली बाजी; IAS सरजना यांचा प्रेरणादायी प्रवास, विद्यार्थ्यांना दिल्या खास टिप्स

भारतात अजूनही अनेक शाही परिवार असे आहेत, जे शाही थाटात जीवन जगतात. राजघराण्यातील लोकांचा थाट पाहून लोक थक्क होतात. मात्र, बडोद्याच्या महाराणी राधिकाराजे गायकवाड यांची कहाणी फार वेगळी आहे. वांकानेरच्या शाही परिवारात जन्माला आलेल्या राधिकाराजे यांनी बडोद्याच्या महाराजांसोबत लग्न केलं. राधिकाराजे गायकवाड यांनी दिल्ली विद्यापीठाच्या लेडी श्रीराम कॉलेजमधून भारतीय इतिहासात पदव्युत्तर पदवी घेतली आहे. २००२ मध्ये महाराजा समरजितसिंह गायकवाड यांच्याशी लग्न करण्यापूर्वी राधिकाराजे गायकवाड पत्रकार म्हणून काम करत होत्या. २०१२ मध्ये लक्ष्मी विलास पॅलेस येथे पारंपरिक समारंभात समरजितसिंह गायकवाड यांना बडोद्याचा मुकुट देण्यात आला.