Neeru Yadav in UN : गेल्या काही वर्षांत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांचं प्रमाण वाढलं आहे. सरपंच पदापासून आमदारकीसाठी महिला उमेदवारांची संख्या वाढतेय. ग्रामपंचायत आणि नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये महिला आरक्षणांतर्गत काही जागा राखीव ठेवल्या जातात. त्यामुळे महिला लोकप्रतिनिधींची संख्या वाढत जातेय. परंतु, असं असलं तरीही प्रत्येक महिला लोकप्रतिनिधीला त्यांचं कर्तृत्व पदोपदी सिद्ध करावं लागतं. त्यांच्या नावावर निवडणुका लढवल्या जात असल्या तरीही पुरुषप्रधान क्षेत्रात टिकणं फारसं सोपं नसतं, अशी प्रतिक्रिया राजस्थानच्या लांबी अहरी या जिल्ह्याच्या पहिल्या महिला सरपंच निरू यादव (Neeru Yadav) यांनी सांगितलं. दी प्रिंटने घेतलेल्या मुलाखतीत त्या बोलत होत्या.

नीरू यादव (Neeru Yadav) या राजस्थानमधील लांबी अहीर या छोट्या जिल्ह्यातील पहिल्या महिला सरपंच आहेत. ३ मे रोजी त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या कार्यक्रमात त्यांच्या जिल्ह्याचं प्रतिनिधित्वही केलं होतं. भारतातील पंचायती राज संस्थांमधून निवडून आलेल्या इतर दोन महिला प्रतिनिधींसह त्यांना संयुक्त राष्ट्र संघात आमंत्रित करण्यात आलं होतं.

हेही वाचा >> एकेकाळी तालिबानमधून पळून गेली; सलूनमध्ये केलं काम अन् आता ऑलिम्पिकसाठी ठरली पात्र, कोण आहे ही महिला…

नीरू यादव (Neeru Yadav) यांचा सरपंचपदापर्यंतचा मार्ग सोपा नव्हता. पुरुषप्रधान क्षेत्रात स्वतःला सिद्ध करणं कठीण असतं. कुटुंबांचा विरोध पत्करावा लागतो. आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागतं, एवढंच नव्हे तर सुरक्षेच्या समस्याही सोडवाव्या लागतात, असंही त्या म्हणाल्या.

महिला सरपंचांच्या नेतृत्त्वावर विश्वास ठेवला जात नाही

“पुरुष संरपंचांना त्यांच्या कामाबद्दल क्वचितच प्रश्न विचारले जातात. परंतु, महिला सरपंचांना पदोपदी स्वतःला सिद्ध करावं लागतं. प्रत्येक पातळीवर त्यांना त्यांची योग्य सिद्ध करावी लागते. निवडणुकी आमच्या नावावर लढवल्या जाऊ शकतात, पण अनेकदा महिलांच्या कर्तृत्वावर आणि नेतृत्त्वावर विश्वास ठेवला जात नाही. तसंच, पुरुष सहकाऱ्यांइतका त्यांच्यावर विश्वास ठेवला जात नाही”, अशी खंत त्यांनी (Neeru Yadav) व्यक्त केली.

नीरू यादव यांना होती हॉकीची आवड (Neeru Yadav is Hockeywali Sarpanch)

नीरू यादव (Neeru Yadav) यांना हॉकी खेळाची प्रचंड आवड होती. परंतु, पालकांनी त्यांची आवड जोपासू दिली नाही. त्यामुळे गावातील इतर मुली आपल्या आवडीपासून वंचित राहू नयेत याकरता त्यांनी गावात मुलींचा हॉकी संघ स्थापन केला आहे. यामुळे त्यांना हॉकीवाली सरपंच असंही म्हणतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“मी पाहिलं की शेतात आणि संबंधित कामांवर रोजंदारीवर काम करणाऱ्या महिला मजुरांना रोज ८० रुपयांपेक्षा जास्त कमाई होत नाही. मी आमच्या मीटिंगमध्ये योग्य मोबदला प्रस्तावित केला आणि तो आकडा किमान १३०-१५० रुपये रोजंदारीवर वाढवला”, असंही नीरू यादव (Neeru Yadav) म्हणाल्या.