देशातील सर्वांत कठीण परीक्षांपैकी एक म्हणजे NEET परीक्षा. ही परीक्षा उत्तीर्ण करणे इतके सोपे नाही. दिवस-रात्र अभ्यास करून आणि कठोर परिश्रम घेऊनही अनेक विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण करू शकत नाहीत. NEET परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी अनेक विद्यार्थी महागडे कोचिंग क्लासेसही लावतात. पण, आज आपण अशा एका विद्यार्थिनीबद्दल जाणून घेणार आहोत; जिने कोचिंग क्लासच्या मदतीशिवाय ही NEET परीक्षा उत्तीर्ण केली. रितिका पाल, असे त्या विद्यार्थिनीचे नाव आहे. एवढेच नाही, तर वेळप्रसंगी रितिकाच्या आईने स्वत:चे दागिने विकून लेकीला पुस्तके आणून दिली होती.

हेही वाचा- सोशल मीडियापासून अंतर, रोज सात तास अभ्यास अन्…; अशी केली सृष्टी देशमुखने पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी क्रॅक

कोचिंगसाठी नव्हते पैसे

लहानपणासूनच रितिकाची स्वप्ने मोठी होती, पण ती पूर्ण करण्यासाठी रितिकाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. रितिकाचे कुटुंब आर्थिकदृष्ट्या स्थिर नाही. रितिकाचे पाच जणांचे कुटुंब पूर्व दिल्लीच्या मोलारबंद भागात दोन खोल्यांच्या एका छोट्या घरात राहते. दररोजच्या जगण्यासाठीही रितिकाच्या कुटुंबाला संघर्ष करावा लागतो. अशात NEET परीक्षेच्या कोचिंगसाठी पैसे उभा करणे रितिकाच्या पालकांना अशक्य होतं. शिवाय कोविडच्या काळात रितिकाच्या आभ्यासावरही परिणाम झाला होता.

हेही वाचा- छोट्याशा गावात जन्मलेली सावी ठरली बेस्टसेलर लेखिका; आंतरराष्ट्रीय पुरस्कारांसह पुस्तकाचं अनेक भाषांमध्ये भाषांतर!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुस्तक घेण्यासाठी विकले आईचे दागिने

कोविडपूर्वी रितिका NEET ची तयारी करण्यासाठी तिच्या वर्गमित्रांकडून पुस्तके आणि नोट्स उधार घेत हेती. NEET परीक्षेच्या तयारीसाठी कोचिंग लावणे रितिकाच्या कुटंबाला परवडणारे नव्हते. रितिकाकडे ऑनलाइन क्लासेससाठी स्मार्टफोनही नव्हता. अखेर रितिकाच्या आईने तिच्याजवळ असलेले दागिने विकले आणि त्या पैशातून रितिकासाठी पुस्तके विकत घेतली. या पुस्तकांशिवाय रितिकाने NEET परीक्षा पास करण्यासाठी युट्यूब व सोशल मीडियावरील मोफत ऑनलाइन क्लासेसचीही मदत घेतली.

हेही वाचा- राजकुमारी ते उपमुख्यमंत्री- राजस्थानच्या दिया कुमारी यांचा प्रवास

बारावीत मिळवले ९८ टक्के गुण

रितिकाला बारावीच्या परीक्षेत ९८ टक्के गुण मिळाले होते. NEET परीक्षेत रितिकाने ७२० पैकी ५०० गुणांसह ३०३२ ऑल इंडिया रँक (AIR) मिळवली आहे. लवकरच रितिका डॉक्टर बनून आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करणार आहे.