संस्कृती आणि कलेसाठी प्रसिद्ध असलेला भारत आजही जगभरातील लोकांना आकर्षित करतो. विविधतेने भरलेल्या या देशात विविध परंपरा प्रसिद्ध आहेत. भारत देशातील प्रत्येक ठिकाणाचा स्वतःचा वेगळा इतिहास आहे, ज्याचे पुरावे आजही तेथे उपस्थित आहेत. त्यामध्ये अनेक स्मारके, इमारती, शिल्पांचा समावेश आहे; तर या सुंदर आणि ऐतिहासिक वास्तूंसाठी भारत जगभर ओळखला जातो. आज आपण या लेखातून भारतीय महिलांनी बांधलेल्या काही ऐतिहासिक स्मारकांबद्दल जाणून घेणार आहोत.

१. विरुपाक्ष मंदिर, पट्टदकल

Chandrapur district six constituencies, Chimur,
चंद्रपूर जिल्ह्यातील सहा मतदारसंघांत केवळ आठ महिला उमेदवार; चिमूर, ब्रम्हपुरीत एकही महिला रिंगणात नाही
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
nagpur total 717 candidates in arena with fadnavis and bawankule
फडणवीस, बावनकुळे, केदार, देशमुखांसह २१७ रिंगणात
leopard trapped Surgana Taluka Avalpada,
आदिवासी महिलेच्या धैर्यामुळे मुलांची सुटका अन बिबट्या बंदिस्त
Pam Kaur appointed as Chief Financial Officer at Hong Kong and Shanghai Banking Corporation
पाम कौर… ‘एचएसबीसी’च्या सीएफओ
Sangli, Miraj, Women Representative Miraj,
सांगली, मिरजेच्या रणांगणात ‘लाडक्या बहिणी’ची चर्चा ! रिंगणातून बाजूला करण्याचे प्रयत्न
woman candidates
उमेदवारी देताना ‘लाडकी बहीण’ नावडती
sangli and miraj vidhan sabha
सांगली, मिरजेच्या रणांगणात ‘लाडक्या बहिणी’ची चर्चा ! रिंगणातून बाजूला करण्याचे प्रयत्न

राणी लोकमहादेवीने तिच्या पतीच्या विक्रमाचा विजय साजरा करण्यासाठी वास्तुशिल्प बांधलं आहे. ही पवित्र रचना तिच्या कलेच्या संरक्षणाचा पुरावा आहे. तिने कांचीच्या पल्लव राजधानीतून कुशल शिल्पकार आणले आणि या वास्तुशिल्पाच्या अद्भुत बांधकामाची देखरेखदेखील केली, जे शतकांनंतरही आज पाहायला विलोभनीय आहे.

२. महाराणी मंदिर, गुलमर्ग

नयनरम्य काश्मीर खोऱ्यात १९१५ मध्ये महाराणी मोहिनीबाई सिसोदिया यांनी हे वास्तुशिल्प बांधले होते. डोगरा (Dogra) घराण्यातील राजा हरी सिंह यांच्या पत्नी या नात्याने या अभयारण्यात हे वास्तुशिल्प चमकते आहे. तसेच निश्चितपणे पर्यटकांनी भेट देण्यासारखं हे एक प्रसिद्ध ठिकाण आहे.

३. राणी की वाव, पाटण

११ व्या शतकात, सोळंकी घराण्यातील राजा भीमदेव पहिला याच्या स्मरणार्थ त्याची पत्नी राणी उदयमती यांनी गावात शिल्पसमृद्ध विहिरीची निर्मिती केली. या पाण्याच्या विहिरी शिल्पकलेचा उत्तम नमुना ठरला आहे. राणी की वाव ही सात मजली खोल विहीर आहे.

४. हुमायूंचा मकबरा, दिल्ली

हमीदा बानू बेगम यांनी मुघल सम्राट हुमायूनच्या स्मरणार्थ ही भव्य समाधी तयार केली होती. पर्शियन वास्तुविशारद मिराक मिर्झा घियास यांनी डिझाइन केलेलं हुमायूंचा मकबरा हमीदा बानू बेगम यांचे पतीवर असणारे नितांत प्रेम आणि आदर दर्शवते.

हेही वाचा…भारताच्या मिसाईल वूमन ‘शीना राणी’ आहेत तरी कोण? ‘मिशन दिव्यास्त्र’ निर्मितीत आहे मोलाचा वाटा

५. मोती मशीद, मध्य प्रदेश

मोती मशीद म्हणजे मोघल वास्तुशैलीचे अनोखे दर्शन घडते. भोपाळच्या दुसऱ्या बेगम सिकंदर बेगम यांनी १८६० मध्ये ही उत्कृष्ट मशीद बांधून इतिहासावर आपली छाप सोडली आहे.

६. फतेहपुरी मशीद, दिल्ली

शाहजहानची प्रिय पत्नी फतेहपुरी बेगम हिने १६५० मध्ये हे वास्तुशिल्प बांधले आहे. ही मशीद दिल्लीतील सर्वात जुनी गल्ली, चांदनी चौकात आहे. ही मशीद लाल दगडांनी बनलेली आहे. फतेहपुरी मशीद ही मुघल स्थापत्यकलेचा एक सुंदर नमुना आहे.

७. दक्षिणेश्वर काली मंदिर, पश्चिम बंगाल

राणी रश्मोनी उद्योगपती, उद्योजक, जमीनदार, परोपकारी होत्या. यांनी नेहमी सामाजिक नियमांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला. बंगालमधील अध्यात्मिक ज्ञान आणि सामाजिक सुधारणेचे प्रतीक असलेल्या दक्षिणेश्वर काली मंदिराच्या बांधकामाच्या त्या संस्थापक होत्या.

८. मिरज किल्ला

स्थापत्यकलेसाठी प्रसिद्ध असलेला मिरज किल्ला १६व्या शतकात गेर्सोपाची राणी चेन्नाभैरदेवी (Queen Chennabhairadevi of Gersoppa in the 16th century) यांनी बनवला होता असे मानले जाते. या राणीचा वारसा या भव्य गडामध्ये टिकून आहे, असे सांगितले जाते.

९. इतिमाद-उद-दौला, आग्रा

ही भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील आग्रा शहरातील एक मुघल समाधी आहे. मुघल सम्राज्ञी नूरजहाँने तिचे वडील मिर्झा घियास बेग यांच्यासाठी हे बांधलं आहे. इतिमाद-उद-दौला पूर्ण करण्यासाठी जवळजवळ सात वर्षे लागली. इतिमाद-उद-दौला नूरजहाँच्या वडिलांबद्दलचे तिचे प्रेम आणि आदर दर्शवते; तर आपण या लेखातून भारतीय महिलांनी बांधलेल्या काही ऐतिहासिक स्मारकांबद्दल जाणून घेतलं.