भारतासह जगभरात टाटा समूह एक परोपकारी समूह म्हणून ओळखला जातो. भारतीयांनाही टाटांबद्दल प्रचंड अभिमान आहे. आज आपण एका अशा महिलेबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या टाटा समूहाच्या पहिल्या महिला संचालक होत्या. त्यांचं नाव होतं लेडी नवाज बाई टाटा. त्यांचा जन्म २३ सप्टेंबर १८७७ रोजी झाला.

सर रतन टाटा यांच्याशी लग्न झाले होते

१८९० च्या उत्तरार्धात नवाजबाई टाटा यांचा विवाह सर रतन टाटा (जमशेद जी एन टाटा यांचा धाकटा मुलगा) यांच्याशी झाला. लेडी नवाजबाई टाटा यांची १९२४ मध्ये टाटा सन्सच्या संचालकपदी नियुक्ती झाली. २० ऑगस्ट १९६५ रोजी मृत्यू होईपर्यंत त्या या पदावर होत्या. टाटा सन्सच्या संचालकपदी नियुक्त झालेल्या त्या पहिल्या महिला होत्या.

हेही वाचाः बँकेने चुकून कॅब ड्रायव्हरच्या खात्यात पाठवले ९००० कोटी रुपये, आता एमडीने दिला राजीनामा अन् नंतर झालं असं काही…

दानधर्माऐवजी गरिबांना प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करून दिला

नवाजबाई टाटा यांचा सर्वात मोठा गुण म्हणजे त्यांनी दानधर्म करण्याऐवजी गरीब आणि गरजू महिलांना प्रशिक्षण दिले. त्यानंतर त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या. याच उद्देशाने १९२८ साली सर रतन टाटा इन्स्टिट्यूटच्या स्थापनेत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. गरिबांना प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हा त्यांचा उद्देश होता. त्यांच्या पुढाकाराने महिला स्वावलंबी झाल्या आणि त्यांना रोजगारही मिळाला.

हेही वाचाः आज बदलली नाही, तर २ हजार रुपयांची नोट जाणार रद्दीत; RBI ने स्पष्टच सांगितलं

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नवाजबाई ललित कलेच्या जाणकार होत्या

सर रतन टाटा आणि लेडी नवाजबाई टाटा हे ललित कलेचे जाणकार होते. त्यांनी जगभर केलेल्या प्रवासातून जेड, चित्रे आणि इतर कलाकृतींचा मौल्यवान संग्रह गोळा केला. सर रतन टाटा यांच्या निधनानंतर लेडी नवाजबाई टाटा यांनी त्यांच्या संपत्तीची त्यांच्या शेवटच्या दिवसांपर्यंत काळजी घेतली.