श्रीनगरच्या रहिवासी असणाऱ्या तीन चुलत बहिणी चक्क पहिल्याच प्रयत्नामध्ये NEET च्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्या आहेत. ‘तुबा बशीर, रुतबा बशीर आणि अरबिश बशीर अशी या तिघी बहिणींची नावे आहेत. या तिघींनी श्रीनगरमधील इस्लामिया माध्यमिक शाळेत शिक्षण घेतले आहे. माध्यम वर्गातून आणि ते रहात असणाऱ्या बंडखोर समाजामधून आलेल्या या बहिणींनी, योग्य शिक्षण आणि मार्गदर्शनाखाली नीटसारखी स्पर्धा परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण केली आहे. या सर्वांसाठी त्यांना त्यांच्या कुटुंबीयांनीदेखील भरपूर प्रोत्साहन दिले होते.

डॉक्टरी क्षेत्राशी अरबिशच्या कुटुंबीयांचा कोणताही संबंध नसूनदेखील तिला डॉक्टर बनायचे होते. त्यामुळे नीट परीक्षा पास करणे हाच तिच्यासाठी एकमेव पर्याय असल्याचे तिने सांगितले. या सर्वात अवघड स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी अरबिशने कठोर परिश्रम घेतले असल्याचेही तिने एएनआय [ANI] चॅनेलला सांगितल्याचे, डीएनए [DNA] मधील एका लेखावरून समजते.

telangana suicides
तेलंगणात ११वी आणि १२वीचा निकाल जाहीर होताच काही तासांतच सात विद्यार्थ्यांची आत्महत्या
point of view All India Entrance Exam presentation
ताणाची उलगड: स्वत:चा दृष्टिकोन बदला
Neha Hiremath Murder Fayaz Karnataka
“त्याला अशी शिक्षा…”, नेहाचा खून करणाऱ्या फयाजच्या वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
Husband Seeks Court Intervention, habeas corpus, Eloped with Facebook Friend, wife escaped with Facebook Friend, high court nagpur,
“बायको परत मिळवून द्या, फेसबुक मित्राबरोबर पळाली…’ नवऱ्याची उच्च न्यायालयात धाव

हेही वाचा : तब्ब्ल ‘१६’ सरकारी नोकऱ्या नाकारून, पहिल्याच फटक्यात UPSC परीक्षेत उत्तीर्ण होणारी ‘ही’ IPS अधिकारी कोण? जाणून घ्या…

“मला आज प्रचंड आनंद होत आहे, खरंतर आमच्या कुटुंबामध्ये कुणीही डॉक्टर किंवा वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे नाहीत. मात्र, मला स्वतःला मी एक डॉक्टर व्हावे असे वाटत होते. हा माझा स्वतःचा निर्णय होता. माझ्या या निर्णयाला घरच्यांनीदेखील अगदी सुरुवातीपासूनच मला संपूर्ण पाठिंबा दिला होता. मात्र, या परीक्षेची तयारी करत असताना, ही परीक्षा म्हणजे आपली पहिली आणि शेवटची संधी आहे, असाच विचार करून त्यासाठी प्रचंड अभ्यास केला; मेहेनत केली”, असे अरबिशने ANI ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

या तीन बहिणींनी एकत्र परीक्षा देऊन, एकाचवेळी तिघींनाही त्यात यश मिळाले असल्याने, तुबा बशीरला प्रचंड आनंद झाला होता. त्या बहिणींनी शाळेत एकत्र शिक्षण घेतले आणि आता एकाचवेळी तिघी डॉक्टर होणार असल्यामुळे तुबाला अगदी भरून आले होते. “आम्ही तिघींनी एकाच शाळेत, एकत्र शिक्षण घेतले. तसेच नीटचे सर्व कोचिंगदेखील एकमेकींबरोबरच घेतले, त्यामुळे आम्ही सोबतच एमबीबीएस करून डॉक्टर होऊ असे वाटत आहे; त्यामुळे आम्ही जे ठरवले होते त्याप्रमाणे झाल्याने आम्हाला, खूप छान वाटत आहे”, असे तुबाने ANI ला मुलाखत देताना सांगितले.

हेही वाचा : सामाजिक बंधने झुगारून माउंट एव्हरेस्ट सर करणारी ‘पहिली भारतीय महिला’; पाहा कसा झाला या गिर्यारोहकाचा प्रवास…

पहिल्याच प्रयत्नात नीट ही स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी रुतबाने अकरावीमध्ये असतानाच या स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली होती, असे तिने सांगितले. यासाठी रुतबाच्या घरच्यांनी तिला सर्वप्रकारे मदत केली, असे म्हणत तिने तिच्या कुटुंबियांना श्रेय दिले आहे. तिघी बहिणी मागील वर्षात म्हणजे, २०२३ मध्ये नीट स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण झाल्या होत्या.