प्रयत्नाअंती परमेश्वर ही म्हण आपण ऐकलीच असेल. जो प्रयत्न करतो त्याला देव एक ना एक दिवस यश नक्कीच देतो. तेलंगणातील रहिवासी उमा हराथी हिला ही म्हण तंतोतंत लागू होते. यूपीएससी परीक्षेत चार वेळा अपयश मिळूनही तिने आपले प्रयत्न सोडले नाही. अखेर कठोर परिश्रम व जिद्दीच्या जोरावर तिने आपलं आय़एस बनण्याचं स्वप्न पूर्ण केलचं.

हेही वाचा- साक्षी मलिक, या पुरूषप्रधानतेला तूच धोबीपछाड देऊ शकत नाहीस, तर आम्ही कुणाकडे बघायचं?

यूपीएससी ही भारतातील सगळ्यात कठीण परीक्षा मानली जातो. दरवर्षी लाखोच्या संख्येने विद्यार्थी ही परीक्षा देतात. मात्र, मोजकेच विद्यार्थी या परीक्षेत पास होतात. काही विद्यार्थी अनेकदा प्रयत्न करुनही या परीक्षेत पास होत नाहीत. अखेर हार मानत आयएसएस बनण्याचे आपलं स्वप्न मध्येच सोडतात. पण काही विद्यार्थी असे असतात अनेकदा अपयशाचा सामना करुनही आपल्या स्वप्नांचा पाठलाग सोडत नाहीत. आज आपण अशाच एका महिला अधिकारी बद्दल जाणून घेणार आहोत. जिचे एक-दोन नाही तर तब्बल चार वेळा यूपीएससी परीक्षा पास कऱण्याचं भंगलं होतं. पण आपल्या जिद्दीच्या जोरावर तिने पाचव्या वेळेस आयएएश बनण्याचं स्वप्न पूर्ण केलं आहे. उमा हरथी असे त्या आयएएस महिला अधिकारीचे नाव आहे.

हेही वाचा- कोचिंग शिवाय झाली IAS अधिकारी, सलोनी वर्माची ‘ही’ रणनीती विद्यार्थ्यांसाठी ठरेल फायदेशीर

उमा हरथी तेलंगणातील नलगोंडा जिल्ह्यातील रहिवासी आहे. नलगोंडा जिल्ह्यातूनच उमाने आपले शालेय शिक्षण पूर्ण केलं आहे. शालेय शिक्षणानंतर उमाने हैदराबाद येथील IIT मधून सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी (B.Tech) पदवी घेतली. उमाचे वडील एन व्यंकटेश्वरलू हे नारायणपेट जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आहेत. लहानपणापासूनच उमाने आयएएस बनण्याचे स्वप्न उराशी बाळगलं होतं.

हेही वाचा- आईचे दागिने विकून घेतली पुस्तकं, NEET परीक्षा क्रॅक करणाऱ्या रितिका पालच्या संघर्षाची कहाणी वाचाच!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इंजिनिअरिंगची पदवी घेतल्यानंतर उमाने यूपीएससी परीक्षेच्या तयारीस सुरुवात केली. परीक्षेचा प्रवास उमासाठी फारसा सोपा नव्हता. ही परीक्षा पास करण्यासाठी उमाला अनेक संकटांचा सामना करावा लागला. एक-दोन नाही तर तब्बल चार प्रयत्न करुनही उमाला यूपीएससी परीक्षेत यश मिळाले नाही. पण सतत मिळणाऱ्या अपयशामुळे उमा खचली नाही. तिने आणखी जोराने परीक्षेच्या तयारीस सुरुवात केली. अखेर उमाच्या प्रयत्नांना यश मिळालं आणि २०२२ साली पाचव्यांदा दिलेल्या यूपीएससी परीक्षेत उमाने संपूर्ण भारतात तिसरा क्रमांक पटकवला.