Village Women Fights: तीन पिढ्यांमधील महिलांच्या संघर्षाची कहाणी आज आपण पाहणार आहोत. एका लहानश्या गावातील परिचारिका, शिक्षिका, विद्यार्थी, गृहिणी या आपल्या स्थानी भक्कम पाय रोवून उभ्या राहिल्या आणि एका बलाढ्य कंपनीला आपलं म्हणणं ऐकण्यासाठी भाग पाडलं. त्यांच्या या जिद्दीची ही गोष्ट आहे. तांब्याच्या खाणीच्या शेजारी असलेल्या आपल्या गावाचे पुनर्वसन व्हावे, यासाठी त्यांनी हे आंदोलन पुकारले होते. पूर्व सर्बियातील तांब्याच्या खाणींमुळे शेजारील गावातील जमीन व पाण्याचे प्रदूषण वाढले होते परिणामी नागरिकांच्या खाण्यापिण्याची सुद्धा आबाळ होत होती. लवकरात लवकर गावाचे पुनर्वसन केले जावे अशी मागणी स्थानिकांकडून होत असताना तब्बल २४ हुन अधिक महिलांनी आंदोलनात अग्रस्थान घेतले होते.

भीती व विरोधाच्या समोर पाय रोवून उभं रहा मग बघा..

राऊटर्सच्या वृत्तानुसार, जानेवारीपासून चालू असलेल्या या संघर्षात जेव्हा गावातील पुरुष कामावर जायचे तेव्हा चीनच्या झिजिन मायनिंगद्वारे चालवल्या जाणाऱ्या खाणीत जाण्यापासून ट्र्रक्सना रोखण्यासाठी महिला क्रिवेल्जमधील पुलावरील बॅरिकेड घालून उभ्या राहायच्या.

pune accident
पोर्श अपघातानंतर क्लब मालकांना आली जाग, पुण्यातील उद्योजकाने सांगितली पब्समधील सद्यस्थिती
pune accident case
Pune Porsche Accident : चालकाचा महत्त्वाचा जबाब; म्हणाला, “अल्पवयीन आरोपीच्या वडिलांनी मला…”
women in war
पराकोटीचा छळ, जबरदस्तीने विवाह, बलात्कार, मानवी तस्करी अन्…; महिलांचा युद्धात ‘असा’ जातो बळी
luxury homes demand increasing low demand for affordable housing in anarock survey
आलिशान घरांना मागणी वाढतेय? परवडणाऱ्या घरांना घरघर? ताज्या अहवालात कोणत्या कारणांची चर्चा?
Mahindra XUV 3XO records 50000 bookings
बाकी कंपन्या फक्त पाहतच राहिल्या; महिंद्राच्या ‘या’ नव्या स्वस्त SUV कारला १ तासात ५० हजार मिळाल्या बुकींग, किंमत फक्त…
Maternity leave
पहिल्या दोन लग्नांपासून महिलेला दोन मुलं, तिसऱ्या अपत्यासाठी प्रसूती रजा मिळेल का? उच्च न्यायालयानं केली महत्त्वपूर्ण टिप्पणी!
malaysia development berhad scandal
‘मलेशिअन डेव्हलपमेंट बरहाद’ : घोटाळ्यांचा बाप! (भाग २)
Nagpur Central Jail, Inmates Meet Their Children, Inmates Meet Their Parents, Heartwarming Gathering Program, Nagpur Central Jail Inmates Meet Children, police, inmates, Nagpur news, marathi news,
रुसवे, फुगवे अन गोडवे! कारागृहातील कैद्यांनी घेतली मुलांची गळाभेट

अनेकदा एखाद्या आंदोलनात लढाई, युद्ध करण्यापेक्षा ठाम भूमिका घेणे हेच सर्वात जास्त महत्त्वाचे असते. हीच भूमिका घेतलेल्या महिलांपैकी ७९ वर्षीय स्टाना जोर्गोव्हानोविक यांनी बॅरिकेट्सवर उभं राहून सांगितलं होतं की, “आम्ही आमच्या गावाचे आणि घराचे रक्षण करत आहोत जिथे आमचा जन्म झाला आहे. मला आमच्या सुंदर गावाबद्दल खूप वाईट वाटते, मला खात्री नाही की मी या हालचालीतून वाचू शकेन पण आम्ही प्रयत्न करणार आहोत.”

तर प्राथमिक शाळेतील शिक्षिका मिलोसावा फुफानोविक, यांनी म्हटले की, “मला क्रिवेल्जचे नवीन गाव हवे आहे. मला जमिनीचा तुकडा, एक चर्च आणि स्मशानभूमी हवी आहे, जरी सर्व लोकांनी बॅरिकेट सोडले तरी मी शेवटपर्यंत उभी राहीन”

या संघर्षात सहभागी काही महिलांनी सांगितले की, खाणीतून साहित्य आणि कचरा पाठवणारे ट्रक त्यांच्या मुलांना इजा पोहोचवतील अशीही भीती होती. पण त्याच वेळी कंपनीच्या मनमानी कारभारामुळे भाज्या पिकवणं बंद झालं होतं, आबाळ होत होती, शेवटी भीती बाजूला सारून आम्ही आमचा आवाज कंपनीपर्यंत पोहोचवण्याचा निर्णय घेतला.

हाकेला साद मिळाली, ठरलं काय?

दरम्यान, महिलांच्या या ठाम भूमिकेमुळे आता अखेरीस, झिजिनची उपकंपनी, सर्बिया झिजिन कॉपरने या गावातील समस्या मान्य करून समुदायाचे स्थलांतर करण्यास सहमती दर्शविली आहे. तसेच या आठवड्यात, झिजिनने गावातून मोठे ट्रक घेऊन जाणे थांबवण्याची मागणी सुद्धा मान्य केली आहे. परिणामी कंपनीला काही काम पूर्ण करू देण्यासाठी रहिवाशांनी तात्पुरती नाकाबंदी उठवली आहे.

काही गावकऱ्यांना कंपनीने आधीच स्थलांतरित केले आहे. पण क्रिवेल्जमधील बहुतांश उर्वरित लोकसंख्या व्लाच- ऑर्थोडॉक्स ख्रिश्चन आहे ज्यांनी शतकानुशतके स्वतःची भाषा आणि चालीरीती जपल्या आहेत व आता सुद्धा त्यांना एक गट म्हणून पुढे जायचे आहे. २०२५ पर्यंत पारदर्शक व निष्पक्ष पद्धतीने या उर्वरित लोकसंख्येचे पुनवर्सन सुद्धा पूर्ण होईल असा विश्वास झिनीजने वर्तवला आहे.

हे ही वाचा<< किरण रावने पहिल्यांदाच सांगितली आमिर खानसह घटस्फोट घेतानाची मनस्थिती; म्हणाली, “लग्नसंस्थेचे नियम..”

दुसरीकडे या प्रकरणी, कंपनीने रॉयटर्सला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “आम्ही क्रिवेल्जचे नुकसान कमी करण्यासाठी पर्यावरण संरक्षक उपायांमध्ये १०० दशलक्ष डॉलरपेक्षा जास्त गुंतवणूक केली आहे. या एकत्रित प्रयत्नांमुळे क्रिवेल्ज गावाचे पर्यावरण सुधारण्यास थेट हातभार लागणार आहे.