Success Story of Pinki Haryan : आई-वडिलाबंरोबर रस्त्यावर भीक मागणाऱ्या आणि कचऱ्याच्या ढिगाऱ्यात अन्न शोधणाऱ्या पिंकी हरयाण आता भारतामध्ये मेडिकल प्रॅक्टिस करण्यास पात्र ठरावी म्हणून परीक्षा देणार आहे. तिचा इथवरचा प्रवास अत्यंत खडतर आणि सर्वांना प्रेरणादायी राहील असा ठरला आहे. एनडीटीव्हीने या पिंकी हरियाणविषयी सविस्तर वृत्त दिलं आहे.

२००४ मध्ये लोबसांग जामयांग हे एक तिबेटी निर्वासित भिक्षू आहेत. त्यांनी पिंकी हरियाणला भीक मागताना पाहिले. त्यामुळे त्यांनी त्यांच्या मुलीला शिक्षण देण्यासाठी आग्रह केला. पालकांना मुलीच्या शिक्षणाची गरज पटवून देणं जरा कठीणच काम होतं. पण लोबसांग जामयांग यांनी पालकांचं मन परिवर्तन केलं आणि पिंकीच्या शिक्षणाचा मार्ग मोकळा झाला.

पिंकीला धर्मशाला येथील दयानंद पब्लिक स्कूलमध्ये प्रवेश मिळाला. चॅरिटेबल ट्रस्टने २००३ साली स्थापन केलेल्या निराधार मुलांसाठीच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या पहिल्यात तुकडीत पिंकी होती. उमंग फाऊंडेशनचे अध्यक्ष अजय श्रीवास्तव म्हणाले, गेल्या १९ वर्षांपासून मी जमयांग यांच्या संपर्कात आहे. या गरिबीतून बाहेर येण्यासाठी शिक्षण हा एकमेव उपाय असल्याचं पिंकीच्या आईवडिलांना उशिराने कळलं.

हेही वाचा >> घरोघरी जाऊन क्लासेस घेऊन सुरू केला स्वतःचा स्टार्टअप; जाणून घ्या एका खेडेगावातल्या पहिल्या-वहिल्या उच्चशिक्षित तरुणीविषयी

पिंकीने वरिष्ठ माध्यमिक परीक्षा उत्तीर्ण केली आणि राष्ट्रीय पात्रतासह प्रवेश परीक्षा देखील उत्तीर्ण केली. याबाबत श्रीवास्तव म्हणाले, NEET ही पदवीपूर्व वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अखिल भारतीय प्रवेश परीक्षा आहे. मात्र, या परीक्षेच्या भरमसाठ शुल्कामुळे तिला खासगी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळाला नाही. त्यामुळे तिने युनायडेट किंगडममधील टोंग लेन चॅरिटेबल ट्रस्टच्या मदतीने २०१८ मध्ये चीनमधील वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवला. तिथून तिने एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले असून ती आता भारतात परतली आहे.

गरिबी सर्वांत मोठा संघर्ष

“लहानपणापासून गरिबी हा सर्वात मोठा संघर्ष होता. माझ्या कुटुंबाला दुःखात पाहणे वेदनादायक होते. मी शाळेत प्रवेश केल्यावर, मला जीवनात यशस्वी होण्याची महत्त्वाकांक्षा होती”, असं पिंकीने पीटीआयला सांगितले. “लहानपणी, मी झोपडपट्टीत राहत होते, त्यामुळे माझी पार्श्वभूमी हीच माझी सर्वात मोठी प्रेरणा होती. मला चांगल्या आणि आर्थिकदृष्ट्या स्थिर जीवनाची इच्छा होती”, असं ती पुढे म्हणाली. बालपणीच्या आठवणी सांगताना पिंकी म्हणाली की, चार वर्षांची असताना तिच्या शाळेत प्रवेशाच्या मुलाखतीदरम्यान तिने डॉक्टर बनण्याची तिची महत्त्वाकांक्षा व्यक्त केली.

“त्या वेळी, डॉक्टर काय काम करतात याची मला कल्पना नव्हती, परंतु मला नेहमी माझ्या समुदायाला मदत करायची होती”, असं पिंकी म्हणाली. पिंकी सध्या भारतात वैद्यकशास्त्राचा सराव करण्यास पात्र होण्यासाठी परदेशी वैद्यकीय पदवी परीक्षेची (FMGE) तयारी करत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पिंकीच्या भावा-बहिणीनेही घेतली प्रेरणा

पिंकीचा भाऊ आणि बहिणीनेही तिच्याकडून प्रेरणा घेऊन उच्च शिक्षणाची आशा बाळगली आहे. “जामयांग यांच्याकडे निराधार आणि गरीब मुलांना मदत करण्याचा दृष्टीकोन होता. मी शाळेत असताना माझ्याकडे असलेली ती सर्वात मोठी सपोर्ट सिस्टीम होती. माझ्यावरचा त्यांचा विश्वास ही चांगली कामगिरी करण्यासाठी मोठी प्रेरणा होती”, असं म्हणत पिंकीने जामयांग यांच्याप्रति कृतज्ञता भाव व्यक्त केला.