मद्यपानामुळे आरोग्यास धोका आहे हे माहित असूनही अनेकजण मद्यपान करतात. अर्थात मद्यपान करणे ही प्रत्येक व्यक्तीची वैयक्तिक निवड आहे मग तो पुरुष असो किंवा महिला. गेल्या दशकभरात भारतात मद्यसेवनात लक्षणीय वाढ झाली आहे. डीएनएच्या वृत्तानुसार, जर्मनीतील TU ड्रेस्डेनच्या २०१९ च्या अभ्यासात असे आढळून आले की,”२०१० ते २०१७ या काळात भारतात मद्यपान करण्याचे प्रमाण ३८ टक्यांनी वाढले आहे जे प्रति वर्ष प्रत्येक प्रोढ व्यक्ती ४.३ ते ५,९ लिटर इतके आहे. या काळात स्थानिक पातळीवर उत्पादित व्हिस्की आणि जिन (gin,) हे मद्याचे प्रमाणही वाढले, ज्यामुळे पुरुष आणि महिला दोघांमध्ये मद्यपानाची आवडी आणि सवयींमध्ये बदल झाला.

हेही वाचा – Preeti Sudan: माजी IAS अधिकारी प्रीती सुदान आहेत तरी कोण? UPSC च्या नव्या अध्यक्षपदी का झाली निवड? संरक्षण मंत्रालयासह अनेक खात्यांचा आहे अनुभव

कोणत्या राज्यात केले जाते सर्वाधिक मद्यपान

राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षण-५ (NFHS-5) २०१९ ते २०२२ पर्यंत शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात मद्यपानाचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आले आहे. राज्यांमध्ये अरूणाचल प्रदेश सर्वात जास्त मद्यपान करणार्‍यांमध्ये आघाडीवर आहे.

अरुणाचल प्रदेशमध्ये सर्वाधिक मद्यपान करतात महिला

अरुणाचल प्रदेशमध्ये पुरुषांचे मद्यपान करण्याचे प्रमाण ५३ टक्के आहे तर महिलांचे मद्यपान करण्याचे प्रमाण २४ टक्के आहे. अरूणाचल प्रदेश नंतर सिक्किमचा क्रमांक लागतो, जिथे १६% महिला मद्यपान करतात.

हेही वाचा – कौतुकास्पद! वयाच्या १६व्या वर्षी जिया राय ठरली इंग्लिश खाडी ओलांडणारी जगातील सर्वात तरुण अन् सर्वात वेगवान पॅरा जलतरणपटू

महिलांमध्ये मद्यपान करण्याचे प्रमाण वाढण्याची कारणे

भारतातील महिलांमध्ये वाढत्या मद्यपानाला अनेक घटक कारणीभूत ठरू शकतात. वाढते आर्थिक स्वावलंबत्व आणि बदलत्या सामाजिक भूमिकांमुळे अधिक महिलांना मद्यपान करण्याची परवानगी मिळाली आहे. याव्यतिरिक्त, अधिक वैविध्यपूर्ण पर्याय आणि स्थानिक ब्रँड्ससह मद्य विक्रीचा बाजार विस्तारल्याने महिलांसाठी मद्यपान करणे अधिक सुलभ झाले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मद्यपानात झालेली ही वाढ आणि मद्यपानाची पद्धत बदलत असल्याने भारतातील विविध क्षेत्रांमध्ये सामाजिक संस्कृतीमध्ये बदल होत आहे आणि मद्ययुक्त पेये मिळण्याबाबत व्यापक बदल दिसून येतो.