-डॉ. किशोर अतनूरकर

स्त्रियांना अनेक कामं करण्यासाठी अक्षरशः कंबर ‘कसावी’ लागते. स्त्रियांची कंबर दुखतच नाही, असं फार कमी वेळेस होतं. बऱ्याच स्त्रियांची कंबर अधूनमधून दुखत असतेच, मात्र त्याची तीव्रता कमी-अधिक असते. या कंबरदुखीसाठी त्या कधी डॉक्टरकडे जातात तर कधी सहन करत राहतात.

This is what happens when you chew cloves everyday
रोज एक-दोन लवंग चघळल्या तर शरीरावर काय परिणाम होईल? तज्ज्ञांकडून जाणून घ्या उत्तर…
contraception. Women health,
स्त्री आरोग्य : गर्भनिरोधासाठी ‘सेफ पिरियड’ किती सेफ? 
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो
Insomnia Before Period
महिलांनो, मासिक पाळीदरम्यान चांगली झोप येत नाही? स्त्रीरोगतज्ज्ञांनी सुचविलेल्या ‘या’ ४ गोष्टी करुन पाहा, लागेल शांत झोप

कंबरदुखीचं प्रमाण पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांमध्ये खूप जास्त प्रमाणात आढळतं. असं का होतं? स्त्रियांचे स्नायू आणि लिगामेंट्स (सांध्यांना जोडणारे नैसर्गिक दोर) पुरुषांच्या तुलनेत जरा कमकुवत असतात. या कमकुवत असणाऱ्या स्नायू आणि सांध्यावर अधिकचा ताण येण्याचे प्रसंग येत असतात. गर्भधारणेच्या काळात, बाळंतपणाच्या कळा सोसत असताना कमरेवरील ताण वाढतो. गर्भधारणेच्या काळात, वाढलेलं पोट कमरेला समोर ओढत असतं. म्हणूनच गर्भवतींना उठताना, बसताना, चालताना, अंथरुणावर एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर वळताना त्रास होत असतो. गर्भधारणा, बाळंतपण, बाळाच्या सुरुवातीच्या वयातील संगोपन, याचा पाठीच्या मणक्यांवर आणि कमरेवर विपरीत परिणाम होत असतो. या नैसर्गिक जबाबदारीतून सहसा स्त्रियांची सुटका होत नाही.

आणखी वाचा- पुरुषांपेक्षा स्त्रिया करतात जास्त धूम्रपान; सिगारेटची सवय सुटणं होतं कठीण, अहवालातून धक्कादायक माहिती समोर

गर्भधारणा आणि बाळंतपणाशी संबंधित करणांव्यतिरिक्त स्त्रियांच्या कंबरदुखीची अन्य काही कारणं असतात. गर्भाशय आणि बाजूला असलेल्या गर्भनलिकेत, स्त्री बीजांडकोशात इन्फेक्शन झाल्यास स्त्रियांना कंबरदुखीचा त्रास होऊ शकतो. गर्भाशयात, स्त्री-बीजांडकोशात गाठ किंवा ‘ट्युमर’ असल्यास कंबरदुखीचा त्रास होऊ शकतो. कंबरदुखीच्या अन्य कारणांत, लठ्ठपणा हे एक महत्त्वाचं कारण आहे. वजन कमी केल्यास, विशेषतः पोटाचा घेर कमी केल्यास कंबरदुखी कमी होण्यासाठी खूप मदत होऊ शकते. ऋतुसमाप्तीच्या काळात, कॅल्शियमच्या कमतरतेमुळे, हाडं ठिसूळ होण्याच्या नैसर्गिक प्रक्रियेमुळेदेखील कंबर दुखू शकते.

प्रत्येक मुलीस अथवा स्त्रीला मासिक पाळीच्या एक-दोन दिवस अगोदर कंबरदुखीचा त्रास होतो, पण तो अनेकदा सुसह्य असतो. क्वचित प्रसंगी त्रास सहन न करण्याइतपत होतो. त्यासाठी वेदनाशामक गोळ्या घ्याव्या लागतात. मासिक पाळीत कंबर दुखतच असते, त्यासाठी उगाच गोळ्या कशाला घ्यायच्या असा गैरसमज अनेक स्त्रियांमध्ये असतो. वास्तविक पाहता वेदनाशामक गोळ्या घेण्यास काहीच हरकत नसते.

आपल्या देशातील बहुसंख्य स्त्रियांना घरकाम करावंच लागतं. झाडलोट, घर आवरणं, स्वयंपाक करणं, जेवायला वाढणं वगैरे कामं करताना जी ऊठबस करावी लागते. त्यामुळे असलेल्या कंबरदुखीचा त्रास लवकर कमी होत नाही. ही सगळी कामं करत असताना आपण कमरेवर ‘अत्याचार’ करत आहोत हे स्त्रियांच्या लक्षातच येत नाही.

आणखी वाचा- लिव्ह-इन हे कायद्याने शक्य आहे म्हणजे व्यवहार्य आहेच असे नाही… मध्यप्रदेश उच्च न्यायालयाचे निरीक्षण

ग्रामीण भागातील बऱ्याच स्त्रियांना तर घरकामाव्यतिरिक्त शेतातदेखील कष्टाचं काम करावं लागतं. अशा वेळी काही नियम पाळायला हवेत. अनेक स्त्रिया कंबरेतून वाकून खाली पडलेली वस्तू सहजपणे उचलत असतात. वाकताना अथवा वाकून सरळ होताना कंबरेचे स्नायू काही क्षणांत तीव्रतेने आखडून जातात. खाली पडलेली वस्तू चट्कन वाकून न उचलता, सावकाश खाली बसून मग उचलली पाहिजे. घरकाम करताना, एखादे जड सामान उचलत असताना अशी चूक होऊ शकते, हे स्त्रियांनी लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून पाय गुडघ्यात वाकवून, थोडं खाली बसूनच वस्तू उचलावी.

कंबरदुखीच्या बाबतीत तपासणीनंतर अस्थिरोगांशी अथवा स्त्रीरोगाशी संबंधित कोणतंच कारण नसेल, तरीही कंबर दुखत राहिल्यास, अशा स्त्रियांना व्यायामाची गरज असते. व्यायामाने कंबरेची ताकद वाढते. गर्भधारणेच्या वेळेस सैल झालेल्या या स्नायूत पुन्हा बळकटी आणण्यासाठी कमरेचे ठरावीक व्यायाम करावे लागतात. ते न करताच बहुसंख्य स्त्रिया घरकाम सुरू करतात. आपली कंबर मजबूत ठेवण्यासाठी कमरेचे व्यायाम करावे लागतात हेच मुळात ग्रामीण भागातील स्त्रियांना माहिती नसते. कमरेत ताकदीचं इंजेक्शन घेतलं की कंबरदुखी कमी होते असा त्यांचा गैरसमज असतो. पुनःपुन्हा सांगूनदेखील व्यायाम त्यांच्या दैनंदिनीचा नियमित भाग बनू शकत नाही. शहरात राहणाऱ्या सुशिक्षित स्त्रियांना ते माहिती असतं, त्या तो व्यायाम करतातदेखील, पण व्यायामात सातत्य राखणं त्यांना कठीण जातं. स्त्रियांना घरकामाचं नियोजन नीट करावं लागेल. काही स्त्रिया दिवसभर, बिनाब्रेकचं काम करतात. तसं करण्याचं ते समर्थनदेखील करतात. स्वतःची कंबर टिकून राहिली तर त्यांच्यासाठी ते दीर्घकालीन फायद्याचं असतं, याचं भान त्यांना राहात नाही. दिवसातून एक-दोन वेळेस थोड्या वेळासाठी का होईना आराम करायला मिळावा या पद्धतीने त्यांनी कामाचं नियोजन केलं पाहिजे.

कॅल्शियमची गोळी घेण्याने कंबरेला आधार मिळू शकतो. साय काढलेलं आणि साखर न घातलेलं एक ग्लास (साधारण पाव लिटर) दूध दररोज पिण्याची सवय ठेवल्यास कॅल्शियमची गोळी न घेतली तरी चालते. अनेक स्त्रियांना दूध प्यायला आवडत नाही. त्यांच्यासाठी गोळी बरी. कंबरदुखीसाठी कितीही महाग गोळी घेण्याची स्त्रियांची तयारी असते; पण नियमित व्यायाम करणं त्यांना जमत नाही. डॉक्टरांनादेखील, व्यायामाचं महत्त्व समजावून सांगून त्या नियमित व्यायाम कशा करू शकतील, या बाबतीत चर्चा करायला वेळ नाही अशी परिस्थिती आहे.

( लेखक एम. डी. (स्त्रीरोग आणि प्रसूतिशास्त्र) तसेच पीएच.डी. (समाजशास्त्र) आणि एमएस (काउन्सेलिंग आणि सायकोथेरपी) आहेत.)

atnurkarkishore@gmail.com