News Flash

कपशप : ब्रॉडला अजूनही सतावतोय वरुण

विश्वचषकासाठीच्या भारतीय संघात वरुण आरोनचा समावेश नाही. मात्र भेदक मारा करणाऱ्या या गोलंदाजांचा धसका अद्यापही इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडच्या मनात आहे.

| March 5, 2015 12:00 pm

विश्वचषकासाठीच्या भारतीय संघात वरुण आरोनचा समावेश नाही. मात्र भेदक मारा करणाऱ्या या गोलंदाजांचा धसका अद्यापही इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडच्या मनात आहे. भारताच्या इंग्लंड दौऱ्यात आरोनचा उसळता चेंडू पूल करताना स्टुअर्ट ब्रॉडच्या हेल्मेटमधून नाकावर आदळला. या प्रकारामुळे ब्रॉडच्या नाकावर शस्त्रक्रिया करावी लागली. ब्रॉडला विश्वचषकात आरोनचा सामना करायचा नाही. मात्र त्या अपघाताच्या आठवणी अद्यापही सतावतात, अशी कबुली ब्रॉडने दिली आहे. तो प्रसंग बाजूला ठेवून संघाच्या विजयात योगदान देण्यासाठी क्रीडा मानसशास्त्रज्ञाची मदत घेत असल्याचेही त्याने सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 5, 2015 12:00 pm

Web Title: broad admits to nightmares over aaron blow
Next Stories
1 संघाची प्रतिष्ठा सांभाळा ; बीसीसीआयचा कोहलीला इशारा
2 विजयाचे रंग कोण उधळणार?
3 चक्रव्यूहात चोकर्स
Just Now!
X