भारताची ‘रनमशीन’ असलेला विराट कोहली आणि बॉलीवूडमध्ये प्रत्येक सिनेमागणिक अभिनेत्री म्हणून ठसा उमटवणारी अनुष्का शर्मा यांची प्रेमकहाणी चांगलीच बहरत असताना आता दोघेही विवाह बंधनात अडकण्याच्या विचारात असल्याची चर्चा आहे. विविध संकेतस्थळांवर यासंबधातील वृत्त प्रसिद्ध झाले आहे.
दोनच दिवसांपूर्वी विराटने ‘एनएच १०’ पाहून प्रेयसी अनुष्का शर्माच्या अभिनयाचे कौतुक केले होते. ट्विटवरवरुन अनुष्काला विराटने शुभेच्छा देखील दिल्या.
विराट-अनुष्काचे सिडनीत ‘प्यार करेंगे खुल्लम खुल्ला’! 

एका श्ॉम्पूच्या जाहिरात चित्रीकरणापासून ओळख झालेली दिल्लीकरांची ही जोडी गेल्या वर्षभरात चांगलीच बहरली.
अनुष्का शर्मा विराट कोहलीची पत्नी! – ऑस्ट्रेलियन समालोचकाची गल्लत 
टीम इंडियाच्या सामन्यांवेळी विराटला प्रोत्साहन देण्यासाठी अनुष्काने अनेकवेळा स्टेडियमवर हजेरी लावली. तर, ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा समाचार घेत शतक पूर्ण करणाऱ्या विराटने अनुष्काच्या दिशेने ‘फ्लाइंग किस’ दिला आणि एरव्ही बिनधास्त असणारी अनुष्काही लाजली. या ‘फ्लाइंग किस’सह छुप्या प्रेमप्रकरणापेक्षा ‘प्रेम करुया खुल्लमखुल्ला’ हा मार्ग गेल्या काही महिन्यांत या जोडीने स्वीकारलेला दिसतो. आता यंदाच्या डिसेंबरमध्ये आणखी एक पाऊल पुढे टाकत विराट-अनुष्का लग्नाच्या बंधनात अडकण्याची शक्यता आहे.