औरंगाबाद शहरातील बेगमपुरा-पहाडसिंगपुरा वॉर्डातील पोटनिवडणुकीत शिवसेनेचे सचिन सूर्यकांत खैरे निवडून आले. त्यांनी प्रतिस्पर्धी अपक्ष उमेदवार अनिल िभगारे यांचा ७२३ मतांनी पराभव केला. काँग्रेसचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर राहिला. सचिन खैरे यांच्या विजयानंतर मनपा मुख्यालयासमोर शिवसनिकांनी फटाक्यांची आतषबाजी केली.

CM Eknath Shinde On Mahavikas Aghadi
“विखे पाटलांची मुळं इतकी खोलवर आहेत, की मविआचं वरून कुणी आलं तरी…”, एकनाथ शिंदेंचा नगरमधून हल्लाबोल!
Lok Sabha Elections Union Minister Jitendra Singh from Udhampur Constituency in Jammu Congress challenge to him
जितेंद्र सिंह यांच्यापुढे एकत्रित विरोधकांचे आव्हान
Vijay Vadettiwar
“शिंदे गटाची अवस्था ‘ना घर का ना घाट का’, त्यांचे निम्मे आमदार…”; विजय वडेट्टीवार यांचा मोठा दावा
aap-leader-aatishi
‘भाजपात या, नाहीतर महिन्याभरात तुरुंगात जा’, ‘आप’च्या नेत्या आतिशी यांचा खळबळजनक आरोप

औरंगाबाद महापालिकेच्या बेगमपुरा-पहाडसिंगपुरा वॉर्ड क्र. १२ च्या पोटनिवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोर लावला होता. शिवसेनेने बालेकिल्ला आपला असल्याचे सिद्ध करून दाखविले. शिवसेनेचे सचिन खैरे यांनी पहिल्या फेरीपासूनच अनिल िभगारे यांच्यावर जोरदार आघाडी घेतली. खैरे यांनी पहिल्या चार फेरीत आघाडी मिळवली. पाचव्या आणि सहाव्या फेरीत ते थोडे मागे पडले होते. सहाव्या फेरीनंतर सचिन खैरे यांनी ७२३ मतांनी विजय मिळविला. खैरे यांना २ हजार ९०३ मते मिळाली. अपक्ष अनिल िभगारे यांना २ हजार १८० मते मिळाली. काँग्रेस उमेदवार संतोष भिंगारे यांना ८२७ मते मिळाली. ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले. ८१ मतदारांनी नकाराधिकाराचा वापर केला. सचिन खैरे यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर ज्येष्ठ नेते प्रदीप जैस्वाल, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, उपजिल्हाप्रमुख नंदकुमार घोडेले, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, उपशहरप्रमुख हिरा सलामपुरे, नगरसेवक ऋषी खैरे यांच्यासह शिवसनिकांनी गुलालाची उधळण करीत जल्लोष केला. निर्णय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी मंजूषा मुथा यांनी काम पाहिले.