आयआयटीमधील इंटिग्रेटेड एम.एस्सी आणि इतर महाविद्यालयांतील इंटिग्रेटेड एम.एस्सी यांमधील नेमका फरक काय? कोणता पर्याय अधिक उत्तम आहे आणि का?
    – मीनल अंभारे.
आपल्या देशात आयआयटीचा अभ्यासक्रम हा अधिक प्रगत आणि स्वायत्त असा समजला जातो. जागतिक दर्जाशी सुसंगत अशी आयआयटीतील शिक्षणपद्धती, नावीन्यतेवर भर, अत्याधुनिक प्रयोगशाळा, विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला देण्यात येणारा वाव आणि मिळणाऱ्या संधी यामुळे आयआयटीमधील सर्वच विषयांचे अभ्यासक्रम हे इतर महाविद्यालयांतील अभ्यासक्रमांपेक्षा सरस ठरतात. काही   अपवाद वगळता इतर महाविद्यालयांतील एकात्मिक अभ्यासक्रमांनी अद्याप त्या तोडीचा दर्जा प्राप्त केलेला नाही. एकात्मिक अभ्यासक्रम केल्यानंतर थेट पदव्युत्तर पदवीपर्यंतचे अभ्यासक्रम सलगरीत्या करता येतात शिवाय त्यानंतर पीएच.डीच्या संधी उपलब्ध होतात.

मी बी-फार्मसीच्या दुसऱ्या वर्षांत शिकत आहे. एमपीएससी परीक्षांमार्फत या क्षेत्राशी संबंधित कोणती पदे प्राप्त करता येतील?
    – विशाल सरगर
पदवी प्राप्त केल्यावर राज्य सेवा परीक्षेला बसू शकता. त्याद्वारे विविध राजपत्रित अधिकारी पदासाठी निवड होऊ शकते. एम. फार्म आणि अधिव्याख्यातांसाठी आवश्यक अशी अर्हता प्राप्त केल्यास शासकीय औषधनिर्माण महाविद्यालयांमध्ये प्राध्यापकांची नोकरी मिळू शकते. ही निवडप्रक्रिया राज्य लोकसेवा आयोगामार्फत राबवली जाते.

मी राज्यशास्त्रात बीए केले असून डीएडही केले आहे. मी विनाअनुदानित प्राथमिक शाळेत शिक्षक आहे. मला मोटिव्हेशनल ट्रेनर आणि लाइफकोच म्हणून काम करायचे आहे. याविषयक प्रशिक्षण महाराष्ट्रातील प्रशिक्षण आणि करिअर  संधींची माहिती हवी होती.
    – सचिन िशदे
मोटिव्हेशनल ट्रेनर अथवा लाइफ कोच होण्यासाठी प्रशिक्षण देणारे अधिकृत अभ्यासक्रम शासकीय अथवा खासगी शिक्षणसंस्थांमध्ये उपलब्ध नाहीत. मात्र, काही खासगी संस्था यासंबंधीचे प्रशिक्षण देतात-
* शिक्षागुरू : पत्ता- १२८, बी, फर्स्ट फ्लोअर, ट्रेड सेंटर, साऊथ तुकोगंज,  कांचनबाग जैन मंदिर, हुकूमचंद घंटाघर इंदूर. वेबसाइट- shikshaguru.co.in
* शिवखेरा इन्स्टिटय़ूट ऑफ लीडरशिप अ‍ॅण्ड मॅनेजमेंट : पत्ता- ६, पूर्वी मार्ग-लेफ्ट, वसंत विहार,  न्यू दिल्ली- ११००५७.  वेबसाइट- skilm.in     ईमेल- skilm@shivkhera.com
* झेन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट : पत्ता- एस-६/७, मथुरेश फ्लॅटस, मंजलपूर, वडोदरा- ३९००११.  ईमेल-contact@himanshubuch. com
लाइफकोच वा मोटिव्हेशनल ट्रेनरला वेळेचे व्यवस्थापन, भावभावनांवर नियंत्रण, नातेसंबंध, संवाद कौशल्य, सभाधीटपणा, आत्मविश्वास निर्मिती, सकारात्मक विचारांवर भर, नराश्यभावना दूर सारणे, वाचन कौशल्य, श्रवण कौशल्य, सादरीकरण कौशल्य व तंत्रे, योग्य पेहराव, वर्तणुकीतील दोष दूर करणे, निर्णयक्षमता वाढवणे आदी विषयांवर मार्गदर्शन करणे व सल्लामसलत देणे अपेक्षित असते. हे करिअर करू इच्छिणाऱ्या व्यक्तीला मार्गदर्शक, गुरू आणि तत्त्वचिंतक अशी भूमिका बजवावी लागते. यासाठी स्वत:मध्ये अशा गुणांचा समुच्चय असणे आवश्यक आहे. त्याकरता संबंधित विषयांवरील साहित्याचे भरपूर वाचन, चिंतन आणि मनन आवश्यक आहे. या विषयांवर असंख्य पुस्तके उपलब्ध आहेत. विविध प्रकारच्या व्यवस्थापकीय कौशल्यांचा व तंत्रांचा समावेश व्यवस्थापनच्या अभ्यासक्रमात केलेला असतो. त्याकरता प्रामुख्याने मनुष्यबळ व्यवस्थापन अभ्यासक्रमांचाही उपयोग होऊ शकतो.

 मी अकरावी कला शाखेत शिकत आहे. मला व्यावसायिक ब्युटिशियन म्हणून करिअर करायचे आहे. या संबंधीच्या उपशाखांची माहिती मिळेल का?  बारावीनंतर या अभ्यासक्रमाकडे वळणे योग्य की पदवीनंतर?
    – कादंबरी भावे, अंबरनाथ.
या संस्थांमार्फत पूर्णवेळ तसेच अर्धवेळ  व्यावसायिक पदवी-पदविका अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. त्यासंबंधित माहिती पुढीलप्रमाणे आहे- डिप्लोमा ऑफ ब्युटी थेरपी अ‍ॅण्ड हेअर ड्रेसिंग, स्पेशल कोर्स- बॉडी थेरपी/बॉडी मशिन्स, अरोमा थेरपी, स्पा कोस्रेस (डीप टिश्यूज, थाई रिफ्लेक्सॉलॉजी, आयुर्वेद अभ्यंग, कॉर्पोरेट मसाज, स्पा मॅनेजमेंट, हॉट स्टोन, अरोमा थेरपी, थाई मसाज),  नेल आर्ट कोस्रेस,  बेसिक ब्युटी अ‍ॅण्ड बेसिक हेअर कोर्स,  हेअर कटस्/ रिबॉन्डिग/ कलिरग/ हेअर ट्रिटमेन्ट्स/ स्पेशलाइज्ड स्किन ट्रीटमेंट/ बॉडी मसाज, डिप्लोमा इन हेअर ड्रेसिंग (हेअर सायन्स,  श्ॉम्पुईंग, स्टायिलग, क्लासिक कट, कलिरग अ‍ॅण्ड हायलायटिंग, बार्बिरग, सलून मॅनेजमेंट, क्लायंट केअर),  बेसिक स्किन, फेशिअल्स, मॅनिक्युअर अ‍ॅण्ड पेडिक्युअर, वॅिक्सग, थ्रेिडग, सलून एटिकेट, स्किन थिअरी, इलेक्ट्रॉलॉजी, थिअरी ऑफ मसाज, फेशिअल्स, मास्क अ‍ॅण्ड पॅक्स, मॅनिक्युअर अ‍ॅण्ड पेडिक्युअर, वॅिक्सग अ‍ॅण्ड  थ्रेिडग, सलून मॅनेजमेंट आदी अनेक विषय शिकवले जातात. यातील बहुतेक अभ्यासक्रम अल्प मुदतीचे आहेत आणि त्याची किमान अर्हता दहावी-बारावी आहे.  हे अभ्यासक्रम तुला करता येतील. पदवीनंतरचे काही पदविका अभ्यासक्रम या संस्था चालवतात. या क्षेत्रात करिअर करण्याचा आपला पक्का निर्धार केला असेल तर बारावीनंतरचे अभ्यासक्रम करून करिअरचा श्रीगणेश करू शकाल.  तुम्ही या कलेचा प्रत्यक्ष उपयोग किती प्रभावीरीत्या करू शकता यावर तुमचे यश अवलंबून राहील. दरम्यान मुक्त विद्यापीठाची पदवी घेऊन तुम्ही पदविका अथवा त्याहीपेक्षा प्रगत अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवू शकाल.

मी सध्या बारावी विज्ञान शाखेत शिकत आहे. मला छायाचित्रणात रस आहे. बारावीनंतर करता येतील अशा अभ्यासक्रमांची माहिती मिळेल का?
    – अभिषेक ताजणे
छायाचित्रण विषयक अभ्यासक्रम उपलब्ध असणाऱ्या संस्था पुढीलप्रमाणे-
* जे. जे स्कूल ऑफ आर्टस्-  १ अप्रेंटिस कोर्स इन फोटोग्राफी- कालावधी एक वर्ष (अंशकालीन)  १ बॅचलर ऑफ फाइन आर्टस्. कालावधी- चार वष्रे. या अभ्यासक्रमांतर्गत फोटोग्राफी या विषयात स्पेशलायझेशन करता येते. पत्ता- द रजिस्ट्रार, सर जे जे इन्स्टिटय़ूट ऑफ अ‍ॅप्लाइड आर्ट, डॉ. डी. एन. रोड, फोर्ट, मुंबई-  ४००००१. वेबसाइट- jjiaa. org
* फग्र्युसन महाविद्यालय- बीएस्सी इन फोटोग्राफी अ‍ॅण्ड ऑडिओ व्हिज्युअल प्रॉडक्शन. कालावधी- ३ वष्रे. अर्हता- बारावी.  पत्ता- प्राचार्य, फग्र्युसन महाविद्यालय,  पुणे- ४११००४.        ईमेल-rincipal@fergussion.edu
* सिम्बॉयसिस स्कूल ऑफ फोटोग्राफी- बॅचलर ऑफ आर्टस् इन व्हिज्युअल आर्टस् अ‍ॅण्ड फोटोग्राफी. कालावधी- तीन वष्रे. अर्हता- कोणत्याही शाखेतील बारावी उत्तीर्ण.  पत्ता- सिम्बॉयसिस स्कूल ऑफ फोटोग्राफी,  सिम्बॉयसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सटिी नॉलेज व्हिलेज, पोस्ट लव्हाळे, ता- मुळशी, पुणे- ४१२११५. वेबसाइट- http://www.  ssp. ac. in     ईमेल-enquiry@ssp. ac. in
* भारती विद्यापीठाचे स्कूल ऑफ फोटोग्राफी- डिप्लोमा इन फोटोग्राफी अ‍ॅण्ड डिजिटल इमॅजिन. कालावधी दोन वष्रे. डिप्लोमा कोर्स इन फोटो जर्नालिझम. कालावधी- दोन वष्रे.  पत्ता- भारती विद्यापीठ कॅम्पस, कात्रज डेअरीच्या विरुद्ध दिशेला, पुणे-सातारा रोड, धनकवडी, पुणे- ४११०४६. वेबसाइट-    http://www.  photography.bharatividyapeeth
* नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ फोटोग्राफी-
१ डिप्लोमा इन फॅशन फोटोग्राफी- कालावधी- सहा महिने. १ डिप्लोमा इन टेबलटॉप फोटोग्राफी- कालावधी- पाच महिने. १ डिप्लोमा इन वेिडग अ‍ॅण्ड इव्हेन्ट फोटोग्राफी. कालावधी- सहा महिने. पत्ता- १/२, घामट टेरेस,  दुसरा मजला,  शगून हॉटेलच्या विरुद्ध दिशेला, दादर (पश्चिम) मध्य पूल.
ईमेल-info@focusnip.com वेबसाइट- www. focusnip.com

मी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअिरगच्या तिसऱ्या वर्षांत शिकत आहे. बीई पूर्ण केल्यावर मला प्राध्यापक व्हायचे आहे. त्याकरता एमई करावे लागेल का? प्राध्यापक होण्यासाठी कोणत्या परीक्षा द्याव्या लागतील?   गणित विषयात करिअर करण्यासाठी मला काय करावे लागेल?
    – कादंबरी प्रभू
काही खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये बीई झालेल्या विद्यार्थ्यांना तासिका तत्त्वावर शिकवण्याची संधी मिळू शकते. त्यासाठी अशा महाविद्यालयांच्या जाहिरातींकडे लक्ष ठेवावे लागेल. अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये व्याख्याता/प्राध्यापक म्हणून कायमस्वरूपी नोकरीसाठी एमई/एमटेक अर्हता प्राप्त असणे आवश्यक आहे.  पीएच.डी पूर्ण केलेली असल्यास अधिक उत्तम. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये व्याख्यातापदी नेमणूक एमपीएससी परीक्षांद्वारे केली जाते. वेगवेगळ्या नामवंत खासगी अभियांत्रिकी संस्थांमधील व्याख्यातापदाच्या जाहिराती सातत्याने प्रकाशित होत असतात. त्याकडे लक्ष ठेवावे. आपल्याला गणित विषयात नेमके कोणते करिअर करायचे आहे, हे तुझ्या प्रश्नातून स्पष्ट होत नाही. जर  तुला गणित विषयात लेक्चरशीप करायची असल्यास अधिकृत मुक्त विद्यापीठातून (उदा- इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, विद्यापीठांचे दूरस्थ शिक्षण विभाग) दूरस्थ शिक्षण पद्धतीने गणितातील पदवी/पदव्युत्तर पदवी आधी घ्यावी लागेल.

मी अभियांत्रिकी शेवटच्या वर्षांला शिकत आहे. मला नागरी सेवा परीक्षांची तयारी करायची आहे. याकरता शासनाची एखादी मार्गदर्शक संस्था आहे का?
    – अविनाश पाटील, औरंगाबाद</strong>
नागरी सेवा परीक्षांसाठी मार्गदर्शन करणाऱ्या शासनाच्या संस्था पुढीलप्रमाणे आहेत-
* राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था,  हजारीमल सोमण मार्ग, छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या विरुद्ध दिशेला, मुंबई-४००००१.
वेबसाइट-www.siac.org.in. ईमेल-directorsiac@yahoo. com प्रीआयएएस कोचिंग सेंटर- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद- ४३१००४. वेबसाइट- www. barnuniversity   ईमेल- barnuaur@bornuvsnl. net.in
* डॉ. आंबेडकर कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन सेंटर, राजभवन कॉम्प्लेक्स, बाणेर रोड, गणेशिखड, यशदा, पुणे- ४११००७.
वेबसाइट-www.yashada.org/acec  ईमेल- aceyashadaucivilservices@gmail.com

इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट या प्रतिष्ठित संस्थेची- विशेषत: अहमदाबाद येथील संस्थेविषयी माहिती सांगाल का? या संस्थेत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना आदित्य बिर्ला आणि ओ. पी. जिंदाल शिष्यवृत्ती कशी मिळवता येईल?
    – सायली खोल्लम
इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट ही  राष्ट्रीय स्तरावरील अग्रगण्य व्यवस्थापन  विषयक शिक्षण-प्रशिक्षण देणारी आणि संशोधन करणारी संस्था आहे. केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या अंतर्गत ही संस्था कार्यरत असली तरी या संस्थेस अभ्यासक्रम ठरवणे, पदवी प्रदान करणे, संशोधन प्रकल्प निवडणे, शुल्कनिश्चिती आदींबाबत संपूर्ण स्वायत्तता आहे. आयआयएम संस्थांमध्ये अहमदाबाद येथील संस्था आताच्या घडीला सर्वोत्तम मानली जाते. विद्यार्थ्यांचा ओढा या संस्थेकडे सर्वाधिक असतो. या संस्थेतून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी जगभरात अनेक महत्त्वाच्या पदांवर कार्यरत आहेत. अशी संधी प्रत्येक नव्या बॅचमधील विद्यार्थ्यांना दरवर्षी मिळत असते.
* ओ. पी. जिंदाल शिष्यवृत्ती अंतर्गत एमबीएला प्रवेश मिळालेल्या सवोत्तम १० विद्यार्थ्यांची दुसऱ्या वर्षी शिष्यवृत्तीसाठी निवड होऊ शकते. शिष्यवृत्तीची रक्कम- ८० हजार ते दीड लाख रुपये. अधिक माहिती- http://www.opjems.com/opjems_scholars. aspx
६आदित्य बिर्ला शिष्यवृत्ती ‘आएआयएम’ला प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांस मिळू शकते. ही वार्षकि शिष्यवृत्ती एक लाख ७५ हजार रुपये अशी आहे. विद्यार्थ्यांच्या गुणांवर आधारित गुणवत्ता यादी तयार केली जाते. निबंधलेखनसारख्या प्रक्रियांचा अवलंब करून १६ विद्यार्थ्यांची निवड केली जाते. अधिक माहितीसाठी संकेतस्थळ-   www. adityabirlascholars. net