सेंटर फॉर सायन्स अॅण्ड एन्व्हायर्न्मेंट, नवी दिल्ली द्वारा पर्यावरण संरक्षणविषयक अशा एन्व्हायर्न्मेंटल इम्पॅक्ट अॅण्ड अॅसेसमेंट (ईआयए) विषयक विशेष अभ्यासक्रमाचे खालीलप्रमाणे आयोजन करण्यात आले आहे. अभ्यासक्रमाचे स्वरूप- या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट विषयांमध्ये प्रामुख्याने प्रदूषण नियंत्रण व पर्यावरण संरक्षणविषयक संबंधित आकडेवारी व तपशिलाचे संकलन- विश्लेषण, पर्यावरण विषयाशी संबंधित प्रस्तावित प्रकल्पांचे परिणाम व त्यावरील नियंत्रण, प्रदूषण नियंत्रण विषयातील प्रयत्न, सातत्य व त्याचे अध्ययन, प्रदूषण नियंत्रणविषयक उपाययोजना, प्रदूषण नियंत्रण- पर्यावरण संरक्षण व्यवस्थापन, पर्यावरण संरक्षणाचे सामाजिक लाभ, प्रदूषण नियंत्रणाच्या संदर्भातील जनसुनावणी व त्यावर कार्यवाही इ.चा समावेश करण्यात आला आहे. आवश्यक पात्रता- या अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक पात्रतेच्या जोडीलाच अर्जदारांना प्रकल्प व्यवस्थापन, उत्पादन, पर्यावरण नियंत्रणाच्या संदर्भात काम करणाऱ्या सरकारी संस्था, समाजसेवी संस्था, विषयाशी संबंधित विद्यार्थी, अभ्यास संशोधन अशा प्रकारचा अनुभव असायला हवा. अभ्यासक्रमाचे शुल्क- अभ्यासक्रमाचे शुल्क म्हणून अनुभवी व कार्यरत असणाऱ्यांसाठी १५ हजार, संशोधक वा स्वयंसेवी संस्था क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी १० हजार व विद्यार्थी अर्जदारांनी ७.५ हजार रु. शुल्क भरणे आवश्यक. निवास व्यवस्था- निवड झालेल्या उमेदवारांपैकी गरजूंना निवास व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येईल. अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क- अभ्यासक्रमाच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी सेंटर फॉर सायन्स अॅण्ड एन्व्हायर्न्मेंट, नवी दिल्लीच्या दूरध्वनी क्र. ०११- २९९५५१२४ वर संपर्क साधावा अथवा सेंटरच्या www.cseindia.org या संकेतस्थळाला भेट द्यावी. अर्ज पाठविण्याचा पत्ता व शेवटची तारीख- संपूर्णपणे भरलेले प्रवेश अर्ज सीनिअर रिसर्च असोसिएट, इंडस्ट्री अॅण्ड एन्व्हायर्न्मेंट युनिट, सेंटर फॉर सायन्स अॅण्ड एन्व्हायर्न्मेंट, ४१, तुघलकाबाद इन्स्टिटय़ूशनल एरिया, नवी दिल्ली- ११००६२ या पत्त्यावर २६ जून २०१६ पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवावेत.