25 September 2017

News Flash

अमरनाथ यात्रेवरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार अबु इस्माईल ठार

सुरक्षा दलाची नौगाममध्ये यशस्वी कारवाई

लोकसत्ता ऑनलाईन, श्रीनगर | Updated: September 14, 2017 5:31 PM

लष्कर-ए-तोयबाचा कमांडर आणि अमरनाथ यात्रेवरील हल्ल्याचा मास्टरमाइंड अबु इस्माईलला सुरक्षा दलाच्या जवानांनी कंठस्नान घातले.

लष्कर-ए-तोयबाचा कमांडर आणि अमरनाथ यात्रेवरील हल्ल्याचा मास्टरमाइंड अबु इस्माईलसह एका दहशतवाद्याला सुरक्षा दलाच्या जवानांनी कंठस्नान घातले आहे. श्रीनगरमधील नौगाममध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत इस्माईल मारला गेल्याचे वृत्त ‘एएनआय’ने दिले आहे.

 

मूळचा पाकिस्तानी असलेला अबु हा अमरनाथ यात्रेकरूंच्या बसवरील हल्ल्याचा मुख्य सूत्रधार असल्याचे समोर आले होते. या दहशतवादी हल्ल्यात सहा महिला भाविकांसह सात जणांचा मृत्यू झाला होता. तर १९ जण जखमी झाले होते. अमरनाथ यात्रेकरूंवरील हल्ल्याचा तो मुख्य सूत्रधार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर इस्माईलच्या शोधासाठी सुरक्षा दलाने विशेष मोहीम हाती घेतली होती. दक्षिण काश्मीरमध्ये त्यासाठी विशेष शोध मोहिम राबवण्यात आली होती.

या वर्षी अनंतनागमध्ये अमरनाथ यात्रेकरूंच्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. लष्कर-ए-तोयबाने हा हल्ला केल्याचे निष्पन्न झाले होते. अबु इस्माईलने या हल्ल्याचा कट रचल्याची माहिती समोर आली होती. गुप्तचर यंत्रणांच्या हाती लागलेल्या सांकेतिक भाषेतील संभाषणाच्या आधारे अबुचा या हल्ल्यात सहभाग असल्याचे स्पष्ट झाले होते. काही दिवसांपासून जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलाच्या कारवाया यशस्वी ठरल्या आहेत. ‘लष्कर’चे अनेक दहशतवादी या कारवायांमध्ये ठार झाले आहेत. त्यात कमांडर बाशिर लष्करी, संघटनेचा काश्मीरमधील टॉप कमांडर अबू दुजानाचाही समावेश आहे. दुजाना मारला गेल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील लष्कर-ए-तोयबाच्या कमांडरची सूत्रे अबु इस्माईलकडे सोपवल्याचे सूत्रांनी सांगितले होते.

First Published on September 14, 2017 5:31 pm

Web Title: amarnath terror attack mastermind abu ismail killed encounter security forces terrorists aarigam nowgam srinagar
 1. S
  Shivram Vaidya
  Sep 14, 2017 at 8:00 pm
  चलो, सुनित चौहान, कुमार केतकर, अरुंधती रॉय, नयनतारा गल, श्रीपाल सबनीस, मणिशंकर अय्यर, राहुल गांधी, सलमान खुर्शीद, अब्दुल्ला खानदान और तमाम ढोंगी धर्मनिरपेक्षता के दलाल, पुरस्कारवापसी टोली, तथाकथित बुद्धीजीवी, ढोंगी विचारवंत, चलो, उठो ! तुम्हारा मातम मनाने का समय आ गया है ! एक और आतंकी अल्लाह को प्यारा हुआ है ! चलो, अपनी राजनीती खेलने के लिये तैय्यार हो जाओ !
  Reply
  1. S
   Shivram Vaidya
   Sep 14, 2017 at 7:14 pm
   चला, सुनित चौहान, कुमार केतकर, अरुंधती रॉय, नयनतारा गल, श्रीपाल सबनीस, मणिशंकर अय्यर, राहुल गांधी, सलमान खुर्शीद, अब्दुल्ला खानदान आणि तमाम ढोंगी धर्मनिरपेक्षतेचे दलाल, पुरस्कारवापसी टोळी, तथाकथित बुद्धीजीवी, ढोंगी विचारवंत चला, उठा ! तुम्हाला या अतिरेक्याच्या मरणाचे मातम मनवायचे असेल तर एकत्र या ! त्याच्या मृत्युचे राजकारण करा ! त्याच्या हत्येच्या जीवावर स्वार्थी राजकारण करा ! त्याचे श्राद्ध घाला, त्याचे दिवसवार करा !
   Reply
   1. A
    Arun
    Sep 14, 2017 at 7:07 pm
    तुमच्या बहुतेक बातम्या ‘एएनआय’ चे मराठी भाषांतर असते. कधी स्वतःहि नवनवीन बातम्या शोधून प्रसिद्ध करीत जा (अग्रलेख सोडून)
    Reply
    1. M
     Manohar V.
     Sep 14, 2017 at 7:02 pm
     पप्पू, सोनिया, लाल्या, शरद यादव, आक्रस्तयाली ममता , comrades, हि बघा मोदी सरकारची आणखीन एक चमकदार कामगिरी. तुमच्या ढोंगी निधर्मीपणा आणि खाबुगिरीपेक्षा , मोदी जी अशी खूप चांगली कामे करत आहेत. तेव्हा त्यांना अशी आणखीन चांगली कामे करुद्यात. जे तुम्हाला गेल्या ६० वर्षात ज े नाही ते मोदी जी २/३ वर्षात करत आहेत म्हणूनच पुढच्या २०१९ च्या निवडणुकात परत आम्ही मोदी जी व भा.ज.प. लाच निवडून देणार.
     Reply
     1. N
      NITIN
      Sep 14, 2017 at 7:02 pm
      आयसिस अतिरेकी वर राम-बाण इलाज !! ढोंगी-सेक्युलर??नेहरू-आंबेडकरने अल्प-संख्य बांधून अतिरेकी सवलती दिल्या!! त्यामुळे गोर-गरीब अल्प-संख्य बांधव धर्मांध शिकवणीला बळी पडत आहेत.. पुढील ७० वर्षे ढोंगी-सेक्युलर??नेहरू-आंबयेडकर सायबांचे जुलुमी कायदे उलटे करा? मुस्लिमना १-पत्नी कायदा लावा आणि हिंदूंना २-शादी लेखी तलाकचे हक्क द्या!! पाक-मध्ये न जात इथे राहिलेल्या मुस्लिम बांधून चीन चा कुटुंब कायदा करा: १-कुटुंब-१-मूल पुढील ७० वर्षे, नंतर २ चालतील!! त्यांची चीन सारखी प्रगती होईल!! आयसिस अतिरेकी आपोआप-च कमी होतील!! मुस्लिम मुलींना शाळेत टेनिस शिकवा सानिया मिर्झा कडून!! त्यांना बीसी कोट्यात आरक्षण द्या, पुढारी बनलेल्या आंबयेडकर जातीला आता आरक्षणाची माती खाण्याची काय गरज??
      Reply
      1. A
       anand
       Sep 14, 2017 at 6:38 pm
       असेच काहीसे दाऊद, टायगर मेमन,लख्वी,सैद ,गिलानी, िक,ओवेसी यांचेही होऊ दे.
       Reply
       1. N
        NITIN
        Sep 14, 2017 at 6:10 pm
        आयसिस अतिरेकी वर राम-बाण इलाज !! ढोंगी-सेक्युलर??नेहरू-आंबेडकरने अल्प-संख्य बांधून अतिरेकी सवलती दिल्या!! त्यामुळे गोर-गरीब अल्प-संख्य बांधव धर्मांध शिकवणीला बळी पडत आहेत.. पुढील ७० वर्षे ढोंगी-सेक्युलर??नेहरू-आंबयेडकर सायबांचे जुलुमी कायदे उलटे करा? मुस्लिमना १-पत्नी कायदा लावा आणि हिंदूंना २-शादी लेखी तलाकचे हक्क द्या!! पाक-मध्ये न जात इथे राहिलेल्या मुस्लिम बांधून चीन चा कुटुंब कायदा करा: १-कुटुंब-१-मूल पुढील ७० वर्षे, नंतर २ चालतील!! त्यांची चीन सारखी प्रगती होईल!! आयसिस अतिरेकी आपोआप-च कमी होतील!! मुस्लिम मुलींना शाळेत टेनिस शिकवा सानिया मिर्झा कडून!! त्यांना बीसी कोट्यात आरक्षण द्या, !!
        Reply
        1. Load More Comments