काश्मीरमध्ये पाकिस्तानचे झेंडे दाखविण्याच्या प्रकरणावरून केंद्र सरकारच्या भूमिकेवर विहिंपचे अध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांनी जोरदार टीका केली आहे. अशा देशद्रोह्य़ांवर गोळ्या झाडाव्यात, असा सल्ला त्यांनी दिला.
भाजप सरकारने या प्रकरणी सौम्य भूमिका घेतल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. ती बदलून आक्रमकपणा दाखवल्यास असे प्रकार वाढणार नाहीत. मवा़ळ भूमिका सरकारने त्वरित सोडावी व पाकिस्तानचे झेंडे फडकविणाऱ्यांवर छातीत गोळ्या घालाव्यात असा सल्ला त्यांनी या वेळी दिला. जम्मू व काश्मीरमधील सध्याच्या परिस्थितीबाबत तोगडियांना प्रश्न विचारण्यात आला होता. पाकिस्तानचे ध्वज फडकावणे ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे आता कठोर कारवाई करण्याची वेळ आली असल्याचा सल्लाही तोगडियांनी केंद्राला दिला.