उत्तराखंडमधील जंगलांचा फार मोठा भाग गिळंकृत करणारी प्रचंड आग आता नियंत्रणात असल्याचे सरकारने सोमवारी सांगितले.

ताज्या माहितीनुसार, आग आटोक्यात आली असून आता परिस्थिती नियंत्रणात आहे, असे केंद्रीय गृह राज्यमंत्री किरण रिजिजू यांनी पत्रकारांना सांगितले. आगीचे कारण शोधण्यासाठी व नुकसानीचा आढावा घेण्यासाठी तज्ज्ञांचे एक पथक आधीच उत्तराखंडला पोहोचले असल्याचे ते म्हणाले. आवश्यकता असल्यास या पर्वतीय राज्याच्या सरकारला आग विझविण्यात मदत करण्यासाठी केंद्र सरकार आणखी सुरक्षा दले पाठवील, असे रिजिजू म्हणाले. फार मोठय़ा प्रमाणावर लागलेली ही आग विझविण्याकरिता ६ हजारांहून अधिक कर्मचारी व तीन हेलिकॉप्टर्स आगग्रस्त भागात तैनात करण्यात आली आहेत.