युरोपियन फुटबॉल असोसिएशन, अर्थात युएफाने जाहीर केलेल्या ४० खेळाडूंच्या संभाव्य संघात युरोपियन विजेत्या बार्सिलोना क्लबचा दबदबा प्रकर्षांने जाणवला. युएफा चॅम्पियन्स लीग स्पध्रेतील गतविजेत्या बार्सिलोनाच्या आठ खेळाडूंना युएफाच्या संभाव्य संघात स्थान देण्यात आले आहे.

आघाडीपटूंमध्ये लिओनेल मेस्सी, नेयमार व लुईस सुआरेझ या बार्सिलोनाच्या अव्वल खेळाडूंचा समावेश आहे. मध्यरक्षकांमध्ये इव्हान रॅकिटीक व अँड्रेस इनिएस्टा यांनी, तर बचावपटूंमध्ये गेरार्ड पिक्यू, जेरोमे बोआटेंग व डॅनी अ‍ॅल्व्हेस या बार्सिलोनाच्या खेळाडूंनी स्थान पटकावले आहे. रिअल माद्रिदच्या ख्रिस्तियानो रोनाल्डोनेही सलग १२व्यांदा या संघासाठी नामांकन मिळवले आहे. गतवर्षी रोनाल्डोने आठव्यांदा अंतिम अकरा जणांमध्ये स्थान पटकावले होते.