आपल्या प्रतिमेकडे चाहत्यांनी पाहात राहावे, यासाठी नव्हे तर आपल्या अद्भूत खेळाने चाहत्यांची मने जिंकणारा ही चार वेळा जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटू ठरलेल्या लिओनेल मेस्सीची ओळख. आता फिफा विश्वचषक उंचावण्याचे स्वप्न अधुरे राहिल्यानंतर क्लब फुटबॉलच्या नव्या मोसमासाठी सज्ज होताना मेस्सीने स्वत:चा ‘मेकओव्हर’ केला आहे.
ला लीगा फुटबॉल स्पर्धेच्या मोसमाला काही दिवसांतच सुरुवात होणार आहे, त्या वेळी मेस्सी नव्या अवतारात चाहत्यांसमोर झळकणार आहे. ख्रिस्तियानो रोनाल्डोने फिफा विश्वचषक स्पर्धेदरम्यान नवनवीन केशरचना केल्या होत्या. त्याची नक्कल करण्याचा प्रयत्न मेस्सीने केला असला तरी पण त्याचा हा प्रयत्न फसल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.