सौंदर्यवती टेनिसपटू मारिया शारापोव्हाने मानांकनाला साजेसा खेळ करत विम्बल्डन टेनिस स्पर्धेत तिसऱ्या फेरीत आगेकूच केली. जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानी असलेल्या अव्वल मानांकित नोव्हाक जोकोव्हिचने शानदार विजयासह तिसरी फेरी गाठली. मिलास राओनिक आणि बरनॉर्ड टॉमिक यांच्यासह महिलांमध्ये समंथा स्टोसूर यांनी तिसऱ्या फेरीत स्थान पटकावले. लिएण्डर पेसचा विजय ही भारतीयांसाठी सुखावणारी गोष्ट होती.
फ्रेंच खुल्या स्पर्धेत झटपट माघारी परतलेल्या शारापोव्हाने ग्रास कोर्टवर जेतेपदाच्या दिशेने दमदार पाऊल टाकले. शारापोव्हाने नेदरलँड्सच्या रिचेल होगेनकॅम्पचा ६-३, ६-१ असा धुव्वा उडवला. पहिला सेटमध्ये रिचेलने शारापोव्हाला थोडीफार लढत देण्याचा प्रयत्न केला, पण पहिला सेट सहज जिंकल्यावर शारापोव्हाने दुसऱ्या सेटमध्ये रिचेलला निष्प्रभ केले.
जबरदस्त फॉर्मात असलेला आणि पुरुष क्रमवारीत अव्वल स्थानावर विराजमान असलेल्या सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिचने दमदार कामगिरी करत विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. महिला एकेरीमध्ये रशियाची मानांकित खेळाडू मारिया शारापोव्हानेही दुसऱ्या फेरीत विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलियाच्या समंथा स्टोसूरने उझ्र्वुला रडवान्सकाला ६-३, ६-४ असे नमवले.
जोकोव्हिचने जारको निइमाइनवर ६-४, ६-२, ६-३ असा सरळ सेटमध्ये पराभव करत तिसऱ्या फेरीत स्थान पटकावले आहे. एक तास आणि ३१ मिनिटे चाललेल्या या सामन्यात जोकोव्हिचचे निर्विवाद वर्चस्व पाहायला मिळाले. जोरकस सव्‍‌र्हिस आणि अप्रतिम परतीच्या फटक्यांच्या जोरावर जोकोव्हिचने निइमाइनला सहजपणे पराभूत केले. निइमाइनविरुद्धच्या सात लढतीतला जोकोव्हिचचा हा सहावा विजय होता.  पुढच्या फेरीत जोकोव्हिचचा मुकाबला बरनॉर्ड टॉमिकशी होणार आहे. पोटरीच्या दुखापतीमुळे जपानच्या केई निशिकोरीने स्पर्धेतून माघार घेतली. ऑस्ट्रेलियाच्या निक कुर्यिगासने
ज्युआन मोनॅकोवर
७-६ (७-५), ६-३, ६-४ असा विजय मिळवत तिसरी फेरी गाठली. मिलास राओनिकने टॉमी हासचा ६-०, ६-२, ६-७
(५-७), ७-६ (७-४) असा पराभव केला. बरनार्ड टॉमिकने पॉल हरबर्टवर ७-६ (७-३), ६-४, ७-६ (७-५) असा विजय मिळवला.