दोन व्यक्तींमध्ये एखादी तणावपूर्ण घटना घडल्यास तिसरी व्यक्ती व्यक्ती म्हणून जर आपण स्वत:शीच बोललो तर त्यामुळे कोणताही मानसिक ताण न घेता भावानांवर नियंत्रण मिळवता येणे शक्य असल्याचे संशोधनामध्ये आढळले आहे.

खरे तर आपण तिसरी व्यक्ती म्हणून आपण आपल्याशी संवाद साधल्यास इतर व्यक्ती काय विचार करतात, ते किती योग्य व अयोग्य आहेत हे समजण्यास मदत होते.  आपण त्यासाठी मेंदूमध्ये पुरावा म्हणून राहू शकतो, असे अमेरिकेतील  मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटीचे साहाय्यक प्राध्यापक जेसन मोसेर यांनी सांगितले.

लोकांना या अनुभवापासून भावनांचे नियमन करण्यासाठी मदत मिळते. भावनांचे नियंत्रण केल्यामुळे आलेला तणाव दूर होण्यास मदत होते. या संशोधनासाठी संशोधकांनी दोन प्रयोग केले. पहिल्या प्रयोगामध्ये सहभागी झालेल्या लोकांना एक तटस्थ आणि त्रासदायक प्रतिमा पाहण्यास दिली. या वेळी पहिल्या आणि तिसऱ्या व्यक्तीच्या मेंदूमध्ये होणाऱ्या घटनांचे निरीक्षण करण्यात आले. यामध्ये संशोधकांना जास्त फरक दिसून आला नाही.

दुसऱ्या प्रयोगामध्ये सहभागींना भूतकाळातील त्रासदायक अनुभव पहिल्या आणि तिसऱ्या व्यक्तीच्या मदतीने सांगण्यात आला. मात्र यामध्ये सहभागी व्यक्ती स्वत:शीच बोलण्यामुळे त्यांच्या भावनांवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. त्यामुळे संबंधित व्यक्तीचा तणाव दूर होण्यास मदत झाली असे संशोधकांनी सांगितले. ‘सायंटिफिक रिपोर्ट’ या नियतकालिकामध्ये हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आले आहे.