गुगलच्या जीबोर्ड किपॅडद्वारे तुम्ही थेट व्हॉट्सअॅपवर जीआयएफ पोस्ट करू शकाल असे वृत्त आहे. अॅंड्रॉइड पोलीसने दिलेल्या वृत्तानुसार व्हॉट्सअॅप सध्या एका नव्या फीचरची चाचणी घेत आहे. ते फीचर विकसित झाल्यानंतर तुम्ही जीबोर्ड या किपॅडद्वारे जीआयएफ टाकू शकणार आहेत. व्हॉट्सअॅप बिटा २.१७.११० या वर्जनवर हे नवे फीचर तुम्हाला वापरता येऊ शकेल. सध्या हे फीचर एपीके मिररवरुन डाऊनलोड करता येईल. अद्याप हे फीचर गुगल प्ले स्टोअरवरुन डाऊनलोड केलेल्या अॅपवर उपलब्ध नाही.

ग्राहकांनी टाकलेल्या दबावानंतर व्हॉट्सअॅपने आपले जुने स्टेटस फीचर परत आणले आहे. जर तुम्ही तुमचा व्हॉट्सअॅप अपडेट केला तर तुम्हाला हे फीचर परत वापरता येईल. व्हॉट्सअॅपचे हे फीचर वापरण्यासाठी व्हॉट्सअॅपवर उजव्या हाताला असलेल्या तीन टिंबांवर क्लिक करावे. त्यानंतर सेटिंग्समध्ये जाऊन प्रोफाइल पिक्चरवर क्लिक करावे. त्यानंतर जुन्या स्टेटसप्रमाणे तुम्ही तेथे तुम्हाला हवे ते टेक्स्ट लिहू शकाल. जुन्या स्टेटसमध्ये असल्याप्रमाणे हे देअर आय एम युजिंग व्हॉट्सअॅप, अव्हेलेबल इत्यादी स्टेटस तुम्हाला वापरता येतील.

व्हॉट्सअॅपने मधल्या काळात बंद केलेले टेक्स्ट स्टेटस परत सुरू केले. मागील महिन्यात व्हॉट्सअॅपने सुरू केलेले नवे स्टेटस त्यांनी लगेच बंद करावे लागले होते. या फीचरला जगभरातून विरोध करण्यात आला होता. नव्या फीचरमुळे आपल्या काँटॅक्टमध्ये असणाऱ्यांसोबत आपल्याला फोटो आणि व्हिडिओ शेअर करता येत होते. व्हॉट्सअॅपच्या या नव्या फीचरमुळे फोटो जीआयएफ, व्हिडिओ शेअर करता येत असत. शेअररिंगच्या २४ तासानंतर त्या इमेजेस किंवा व्हिडिओ डिलीट होतील. अशी सुविधा देण्यात आली होती. परंतु या स्टेटसमुळे व्हॉट्सअॅप हे स्नॅपचॅट सारखे झाले आहे अशी ओरड होऊ लागली होती.