दरवेळी आपल्या युजर्ससाठी वेगवेगळे फीचर आणणाऱ्या व्हॉट्सअॅपने या महिन्यात ‘लाईव्ह लोकेशन शेअरिंग’ हे नवं फीचर आणलं आहे. त्यामुळे युजर्स आपलं लाईव्ह लोकेशन मित्र मैत्रिणींना पाठवू शकतात. व्हॉट्स अॅपवर खूप पूर्वीच लोकेशन शेअरिंगचा पर्याय देण्यात आला होता. आता व्हॉट्स अॅपने त्यात भर म्हणून आणखी एक अपग्रेडड फीचर आणलं आहे.

महिलांच्या सुरक्षेच्यादृष्टीने या फिचरचा खूप फायदा होऊ शकतो. कारण महिला आपल्या कुटुंबियांना आपलं लाईव्ह लोकेशन शेअर करू शकतात. त्यामुळे कुटुंबियांना त्या सुरक्षित आहेत की नाही, हेदेखील समजण्यास मदत होईल. यामुळे त्यांना ट्रॅक करणं सोप्पं जाईल. युजर्स आपल्या चॅट लिस्टमध्ये असलेल्या प्रत्येक युजरला आपलं लाईव्ह लोकेशन शेअर करू शकतात. तसेच सेटिंगमध्ये जाऊन एखाद्या ठराविक व्यक्तीला किंवा ठराविक ग्रुपमध्ये देखील लोकेशन शेअर करू शकतील, असा पर्यायही उपलब्ध आहे. आपलं लाईव्ह लोकेशन किती काळापर्यंत संबधित व्यक्तींना शेअर करायचं हे पूर्णपणे युजर ठरवू शकतो. त्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या सुरक्षेसाठी हे फीचर खूपच फायदेशीर ठरणार आहे. अगदी पिकनिक किंवा शहराच्या बाहेर जाताना देखील सुरक्षेचा उपाय म्हणून या फीचरचा उपयोग होणार आहे.

tax harvesting in marathi
Money Mantra: टॅक्स हार्वेस्टिंग म्हणजे काय? त्याचा वापर कसा कराल? केव्हा टाळाल?
Surat Diamond Bourse
सूरत डायमंड बोर्सकडे हिरे व्यापाऱ्यांची पाठ; अनेकजण पुन्हा मुंबईत परतले, नेमकं कारण काय? जाणून घ्या
Post Office FD Rate and Calculations in Marathi
पोस्टाच्या पाच वर्षांच्या FD मध्ये किती परतावा मिळतो? पोस्ट ऑफिसची मुदत ठेव योजना व नफ्याची आकडेवारी पाहा
chip manufacturing infrastructure
पोस्टाच्या तिकिटाएवढी दिसणारी सेमीकंडक्टर चिप नक्की कशी तयार होते?

याचबरोबर व्हॉट्स अॅप आणखी एक फीचरची चाचणी करत आहे. जर युजरने आपला व्हॉट्स अॅप नंबर बदलला आणि दुसरं अकाऊंट सुरु केलं तर याचे नोटेफिकेशन युजरला आपल्या मित्र- मैत्रिणींना पाठवता येणार आहे. तेव्हा प्रत्येक मित्र मैत्रिणींना वेगवेगळे मेसेज करून फोन क्रमांक बदलल्याची माहिती देण्यापेक्षा युजरचं काम अधिक सुलभ होणार आहे.