बृहन्महाराष्ट्र प्राच्य विद्या परिषदेचे दहावे अधिवेशन फग्र्युसन महाविद्यालय, पुणे येथे अलीकडेच पार पडले. या अधिवेशनामध्ये इंग्रजी आणि तमिळ मुळाक्षरांच्या नावाचा मागोवा घेणाऱ्या शोधनिबंधाच्या  निमित्ताने  तयार केलेला भाषा आणि लिपी यांच्या विकासक्रमासंबंधीचा अभ्यासलेख-
मध्य-पूर्वेतील इसवीसन पूर्व २८व्या शतकापासून सुमेरियन, अक्काडियन हे लोक क्युनिफॉर्म या लिपी प्रकारात लेखन करीत असत. पुढे इसवी सनापूर्वी १५ व्या शतकानंतर हित्ती लोकांच्या क्युनिफॉर्म प्रकारातील द्विअक्षरी चिन्हांच्या दिसण्यातील सारखेपणामुळे आणि त्यांच्या ‘द्विअक्षरी उच्चारामुळे’ अनेक भाषांतील लिपी-मुळाक्षरांची नावे द्विअक्षरी उदा. तमिळ लिपीमध्ये इम्म, इन्न, इक्क, रोमन लिपीमध्ये एम, एन, के म्हणून रूढ झाली असावी असा सारांश आहे. शीर्षकातील मुद्दा इतिहासातील नंतरच्या कालखंडातील असल्यामुळे स्पष्टता यावी म्हणून आदिम युगापासून सुरुवात केली आहे.
  १- बोलीभाषांची सुरुवात –
अतिशय आदिम काळामध्ये, एक-दीड लाख वर्षांपासून आधुनिक मानवाचे पूर्वज रानटी / शिकारी अवस्थेमध्ये वैयक्तिक वा दोघे जण, युग्म/ युगूल, आणि मग समूह/ टोळी/ तोली करून राहू लागले. साधारणपणे ७० हजार वर्षांपूर्वी ते स्थलांतरसुद्धा करू लागले. सुरुवातीला आपल्या जोडीदारास अंगविक्षेप करून आदिमानव खुणावत असावा. त्याची वाचा अजून स्पष्ट झाली नसावी. हुंकार, नकार असे ध्वनी तो करीत असावा. दृष्टीस आलेले निसर्गातील दिव्यत्व तसेच पंचमहाभूतांचे अक्राळविक्राळ दर्शन, यामुळे त्याला त्यांची भीती वाटत असे. अशा वेळी वा शिकारीमध्ये एकमेकांस बोलावणे, आरोळ्या, हुंकार, नकार, चित्कार अशा पद्धतीने त्याची मूकपणापासून भाषिक प्रगती होऊ लागली. त्या काळी शब्दसंख्या अतिशय सीमित होती.
अगदी नजीकचे हिमयुग संपल्यानंतर या मन्वन्तरात नियमित सृष्टिचक्र पुन्हा सुरू झाले. भरपूर पाण्यामुळे तसेच आद्र्र हवामानामुळे निरनिराळ्या प्रकारचे गवत, वनस्पती वाढू लागल्या. गवत-बियाणे पेरण्याची युक्ती सुचू लागली. त्यातून शेतीतंत्र अवगत झाले. अन्न म्हणजे कंदमुळे, फळ फुले, बिया व पाने गोळा करण्यासाठीची वणवण बंद झाली. मनुष्यसमाज साधारणपणे गेल्या दहा हजार वर्षांपूर्वी पुन्हा स्थिर होऊ लागला. मग टोळीतून नंतर ग्राम, नगरे निर्माण झाली. सामूहिक जीवनपद्धतीमुळे / ग्राम/ नगरांमुळे भीती जाऊन सुरक्षितता आली.
धान्य उत्पादनाची वाढ झाली. निसर्गाची कृपा होऊन अन्न उत्पादन वाढावे तसेच त्याच्या अवकृपेतून वाचावे, रक्षण व्हावे यातून देवता कल्पना सुचू लागल्या. आधी भीतीतून आणि नंतर आराधनेसाठी देवतेच्या मूर्तीची कल्पना आली. देवतेच्या कृपेमुळे वाढलेले धान्य / उत्पादन देवतेचे आहे आणि सामूहिक मालमत्ता आहे म्हणून वेगळे जतन करणे सुरू झाले. त्याकरिता मंदिरे आणि त्यांची कोठारे सुरू झाली.
 १.१- लेखनाची गरज
सर्व वस्तूंचा तपशील (वस्तूचे नाव, संख्या, दाता, दान प्रसंगाचा समय, देवता अशी माहिती किंवा खरेदी-विक्रीचे तपशील) ठेवण्याकरिता सुमेर मातीची प्रतीक-चिन्हे (token) तयार करीत आणि एकत्रितपणे ती प्रतीक-चिन्हे मातीच्या भांडय़ामध्ये सीलबंद करून ठेवीत. मातीच्या सीलबंद भांडय़ात काय आहे हे दाखविण्याकरिता मातीचे भांडे ओले असताना त्याच्या बाह्य़ भागावर ते प्रतीक दाबून त्याची खूण करून ठेवीत. पुढे प्रतीक-चिन्हे बनवून भांडय़ात ठेवण्यापेक्षा मातीच्या फलकावर/ वस्तूवर त्यांच्या खुणा करणे आणि याप्रमाणे मजकूर, अक्षर कोरणे त्यांना जास्त सोपे वाटू लागले. प्राचीन इजिप्त, इराक, सीरिया या भागामध्ये असे प्रथम घडले. त्याचे वास्तुशास्त्रीय पुरावे उत्खननात मिळतात.
त्या कालापासून पुढे खुणा-लेखनाचा प्रवास सुरू झाला. तो कसा झाला हे अभ्यासताना त्यातूनच मला काही नव्या व्युत्पत्ती आणि नव्या कारणमीमांसा मिळाल्या. त्यापैकी काहींचा उल्लेख या निबंधात करणार आहे. म्हणून लेखन-प्रक्रियेच्या इतिहासाचा धावता आढावा –
 २- विकास
पायरी-१ : प्रासंगिक चित्रे- जगातील इतर खंडातील आदिवासींनी, मध्य भारतातील नर्मदा-किनारी, माळवा उजैन भागात, तसेच विन्ध्य आणि सातपुडा पर्वतरांगांमधील आदिवासींनी भीमबेटका आणि इतर ७५० च्या वर संख्या असणाऱ्या शैलाश्रयांमध्ये / गुहांमध्ये २५-३० हजार वर्षांपासून चित्रे काढायला सुरुवात केली. त्यावर पद्मश्री विष्णू श्रीधर वाकणकर, प्रा. सांखालिया, पद्मश्री म. के. ढवळीकर आणि त्यांच्यासह मध्य भारतातील, तसेच डेक्कन कॉलेज पुणे येथील अनेक पुरातत्त्व संशोधक यांनी प्रचंड संशोधन करून हराप्पापूर्व काळापासून (४७०० वर्षांपासून) कायथा, अहाड, माळवा, जोर्वे आदी संस्कृतींचा अभ्यास करून भारतातील धार्मिक कल्पना, पूजा विधी, यज्ञपूजा, लिंगपूजा, पशुपूजा, त्या काळातील शेती-जीवन, कुंभार-काम, कांस्य-तांबे खनिज कर्म याचा विकासक्रम निश्चित केला आहे. भारतातील ही चित्रे शैलीदार, रेखीव, गतिशील असली तरी त्यातून संदेशवहन होत नाही असे वाटते. त्यापेक्षा जास्त स्पष्टता दर्शवणारी चित्रे इराक, सीरिया प्राचीन इजिप्तमध्ये सर्वप्रथम सात हजार वर्षांपासून सुरू झाली. चित्रांद्वारे माहिती भिंतीवर, मातीमध्ये, चर्मावर, स्र्ंस्र्८१४२ (पापिरस)/ पाम पत्रावर, कोरली जाऊ लागली. परंतु त्यातूनही भावना, कल्पना आणि भाषिक मुद्दे म्हणजेच क्रियापदांचे कार्य, काळ, कर्ता, कर्म यांचे दर्शन होत नसे.
पायरी-२ : भावना-चित्रे/ Ideograms – पुढील अवस्थेमध्ये भावना/ कृती चिन्हे, लोगो-चिन्हे आली. उदा. पायाचे रेखाचित्र हे भावनाचित्र दाखवून ‘जाण्याचे’ निदर्शन केले जाई. भावनाचित्र / Ideograms पूर्ण शब्द किंवा पूर्ण विचार दर्शवितो. परंतु त्याचा उच्चार कसा करायचा हे सांगू शकत नाही. उदा. ‘आणि’ हा अर्थ दाखविणारे भावना-चित्र / ideogram, इंग्रजीत ‘&’ पण स्पॅनिशमध्ये ‘८’असे दाखविले जाते. भावना-चित्रातून पुढे क्रियापदे, कर्ता, कर्म असा विकास झाला असावा.
(Ideograms are symbols that represent entire words or concepts, but don’t give a clue as to how the word is pronounced. An example of an is & (pronounced as “AND” in English and “Y” in Spanish, but has the same meaning = “and” in both languages)
पायरी-३ : ध्वनी चित्र फोनोग्राम – वस्तू/ पदार्थ/ प्राणी/ पक्षी/ शरीराचे भाग यांची चित्रे सोपी करून रेखा चित्रे काढली जाऊ लागली व त्या चित्रांच्या नावांचा उच्चार करून अर्थनिष्पत्ती करणारा ध्वनी वापरला जाऊ लागला. यालाच ध्वनिचित्र/ फोनोग्राम म्हणत. त्या काळातील एखाद्या संस्कृतीमध्ये अशी साधारणपणे १०००-२००० चित्रे आवश्यक वाटू लागली. उदा. पद्माकर = पद्म + कर = हातामध्ये कमलाचे चित्र.
(Phonetic alphabets only have symbols that represent sounds, not words.)
पायरी-४ : शल्याबोल syllables- पुढे चित्रांच्या नावामधील फक्त आद्य अक्षराचा उच्चार/ ध्वनी = आबोल शल्य करणे / वेगळा करणे सुरू झाले. (शल्य आ बोल ) ही सोपी चित्रे त्या आद्याक्षरांचा उच्चार दाखवू लागली. अशा प्रकारे चित्रांची संख्या मर्यादित करण्यात आली. याला शल्याबोल म्हणतात. ‘क’ उच्चार/ ध्वनी = कमल चित्र.
पायरी ५ : इथपासून जगातील वेगवेगळ्या संस्कृतींच्या भाषा आणि लिप्यांचा विकास- विस्तार पुढे अनेक टप्प्यांत होऊन त्यांना आजचे आधुनिक रूप प्राप्त झाले. असा हा प्रवास आहे.
आधुनिक रूपाचा पायरी क्रमांक कोणता असेल?
(The evolution of writing cannot be fully appreciated (comprehended, even) in isolation. Its stories are woven deep into the fabric of histories and civilisations, its paths steered by politics, religion, economics, and by innumerable other factors. By John Boardley 1a Caligrapher and Script Expert ILT-2011)
   ३- क्युनिफॉर्म
अक्काडियन, सुमेरियन लोक या पद्धतीमध्ये धातूच्या चाकूने दाबून (क्युनिफॉर्म पद्धतीने) अशी एक किंवा दोन अक्षरांची ू४ल्ल्रऋ१े संयुक्त चिन्हे (पायरी चारचे पूर्वरूप) ओल्या मातीच्या विटांवर खोदून त्या विटा भाजून वेगवेगळा मजकूर लिहू लागले. अशी १०००/ ११०० संयुक्त अक्षरे उत्खननात मिळाली आहेत.
(Cuneiforms are highly stylized ideograms, using a tool that creates little, wedge-like strokes. Some cuneiforms (in the later history of languages that use them) are phonetic.)
सुमेरियन, लोकांनी प्रथम उभ्या ओळीमध्ये अशी चित्रे मातीत कोरली. गोलाकार असे आकार काढण्यामध्ये वेळ जातो म्हणून इसवी सनपूर्व २९ व्या शतकाच्या सुमारास सुमेरियन आरेखकांनी चित्रे काढण्याचा वेळ वाचावा म्हणून या सर्वाची चित्रे सरळ रेषा/ त्यांच्या तुकडय़ांनी दाखवायला सुरुवात केली. इसवी सनपूर्व २२ व्या शतकाच्या दरम्यान चित्रे आडव्या रेषेत काढणे सुरू झाले. याचे कारण स्पष्टपणे दिसत नाही. परंतु या पद्धतीमध्ये वेळ वाचत असावा. (पायरी १ ते पायरी ३)
अशा २० लाखा(!)पेक्षा जास्त विटा उत्खननामध्ये मिळाल्या असून त्यापैकी फक्त ५० हजाराचेच वाचन झाले आहे. त्यापैकी काही संयुक्त अक्षरांचा मागोवा घेऊ. त्या काळातील वापरातील वस्तूंच्या आकारावरून ही संयुक्त अक्षरे चिन्हे/ चित्रे घेतली असावीत. ‘सरळ रेषांच्या खिळ्यांनी’ चित्रे काढल्यामुळे, या मूळ चित्रामधील गोलाकार, वक्रता नष्ट झाल्या. तसेच त्या प्राचीन भाषेचा पूर्ण अंदाज आज येत नसल्यामुळे, त्याचप्रमाणे क्युनिफॉर्ममधील कील/ खिळे बरेच ओबडधोबड वाटत असल्यामुळे, या संयुक्त अक्षरात ‘कोणत्याही मूळ वस्तू’च्या आकाराचा /चित्रांचा भास होत नाहीत. ती केवळ लिपी चिन्हे म्हणूनच उरली. आधुनिक लिपीतज्ज्ञांनी उत्खननामध्ये मिळालेल्या द्विभाषिक/द्विलिपीमधील शिलालेखांच्या तुलनात्मक अभ्यासातून ही क्युनिफॉर्म चिन्हे ‘द्विअक्षरी-शल्याबोल (di syllable)आहेत हे ओळखले. हित्ती आणि मित्तानी या दोन संस्कृतीच्या लोकांचे लिखाण देवनागरी लिपीप्रमाणे ‘डावीकडून उजवीकडे’ आहे तर अक्काडियन, उगरीतिक आणि इतर सेमेटिक भाषेची लेखने उर्दूप्रमाणे ‘उजवीकडून डावीकडे’ आहेत.
 
३.१-हित्ती आणि मित्तानी संस्कृती
हित्ती आणि मित्तानी या दोन संस्कृती इंडो-युरो आर्य लोकांशी संबंधित असल्यामुळे त्यांना ही स्वर-व्यंजन कल्पना म्हणजेच ‘द्विअक्षरी-शल्याबोल  (disyllable) याचे आकलन होते असे दिसते. इ.स.पूर्व १६०० मधील हित्ती-मितानी समुदायाच्या एका युद्धसमेटाच्या शिलालेखात असणारे आर्य/ वैदिक देवता यांचे उल्लेख युरोपियन संशोधकांनी मान्य केले आहे. त्यात आढळणाऱ्या द्विअक्षरी-शल्याबोलांची (disyllable) क्युनिफॉर्म चिन्हे यांचा तक्ता काही लिपी अभ्यासकांनी दिला आहे. (Book: kSumerian Lexiconl, Version 3.0, by John A. Halloran2 and http://en.wikipedia.org/wiki/Hittie Cuniforms)
 तो तक्ता क्रमांक १ ‘हित्ती द्विअक्षरी- शल्याबोलांची (disyllable) क्युनिफॉर्म चिन्हे’ सोबत जोडलेला आहे.

४- हा लेख त्या तक्त्यावर आधारित आहे. तक्त्याचे अवलोकन केले असता असे दिसते की-
४.१- त्या काळातील, ‘आ, ए, इ, उ’ अशी ४ वेगळी चिन्हे स्वर दाखवितात.
४.२- त्याबरोबर तालिकेत महत्त्वाची अशी निरनिराळ्या अक्षरांची वैशिष्टय़पूर्ण (VV=vowel)स्वर आणि (CC=consonant) व्यंजनयुक्त चिन्हे/ रेखाकृती आहेत. (१) पहिला प्रकार स्वरांनी सुरुवात होणारी VC बाबिलोन पद्धतीची VC द्विअक्षरे, closed closed lable आणि (२) दुसरा प्रकार व्यंजनांनी सुरू होणारी  CV इंडो-आर्यन  CV open द्विअक्षरें lable दाखवितो.
(तक्ता ४.२)
आपण पहिल्या प्रकारातील अक्षराची सुरवात अ/आ ने आणि त्यांचा अक्षरांत पूर्ण व्यंजन/ हलंत समजू शकतो. उदा. अल/अल्. आल/ आल्
 त्याचप्रमाणे दुसऱ्या प्रकारातील अक्षरांमध्ये व्यंजन आणि स्वरांचा एकत्रित उच्चार करावा असे मला वाटते. क, का, के, कि, कु म्हणजे ही तालिका पुढीलप्रमाणे दिसेल.
(तक्ता ४.३)
 ५- तक्ता क्रमांक १ पासून ‘रेखाकृतींच्या आकारात साम्यता’ दर्शविणारा तक्ता क्रमांक २ मी तयार केला आहे.
(तक्ता क्र. २)
 ५.१- अवलोकन
 तक्त्यातील काही खुणांचे आकार सारखे दिसतात. ही साम्यता लक्षात ठेवण्यासारखी आहे.-
(्र)     अब=अप, एब=इब=एप=इप, पे=पी=बी, पु=बु, उप=उब
(्र)     दे=दि=ते=ति
(्र्र)    अग=अक, एग=इग=एक=इक, उग=उक
(्र५)    अह=एह=इह=उह
(५)     हे=हि, गे=गी, के=कि, ले=लि, मे=मि,
(५्र)     एम=इम, एर=इर,
(५्र)     ने=नि=न,
(५्र्र)     इन=अन= * (अनुस्वार?),
(्र७)     रे=री=र
(७)     झे=झी

५.२- तक्त्यामध्ये एकाच आकाराचे काही क्युनिफॉर्म पुढील वेगवेगळी व्यंजने दाखवितात.
 ५.३- वेगवेगळी अक्षरे दर्शविणारे क्युनिफॉर्म सारख्याच आकाराचे का असावेत याची कारणमीमांसा अशी करता येईल – विचारांची/ वस्तूंची देवाणघेवाण दोन वेगवेगळ्या भिन्न संस्कृतीच्या समूहामध्ये होत असताना एकाच वस्तूचे नाव दुसऱ्या संस्कृतीमध्ये किंचित वेगळे उच्चारले जाते. त्यामुळे काही दिवसांनी एकाच उच्चाराचे (अक्षर-चित्राचे) दोन साम्य उच्चार तयार होतात. त्या पुढील काळामध्ये एकच अक्षर-चित्र दोन वेगवेगळे उच्चार दाखविण्यास सुरुवात करते.
 ६- त्यांचा सारखा आकार बघून पुढील निष्कर्ष काढता येतील.
निष्कर्ष १ : त्या काळात, बरेच प्राकृत शब्द जवळपास सारखेच उच्चार / ध्वनी उत्पन्न करीत असावेत. उदा.
ई /इ = अे / ए, प=ब, त=द, क=ग.
निष्कर्ष २ : इतिहासकालीन निरनिराळ्या लोकभाषांमध्ये वर्ण-विपर्याय का/ कसे झाले याचे असेही कारण असावे.
निष्कर्ष ३ : अह, इह, एह, उह = अ:, इ:, ए:, उ: = : = विसर्ग म्हणून पुढे आले असावेत.
निष्कर्ष ४ : अ, इ, ई, उ, ऊ या स्वरांची मूळ चित्रे इसवी सनपूर्व १६ व्या शतकातील क्युनिफॉम्र्समध्ये दिसतात.
निष्कर्ष ५ : ए/अे च्या आकारातून निष्कर्ष काढता येतो की ए/अे = अ + इ
निष्कर्ष ६ : य च्या आकारातून निष्कर्ष काढता येतो की य = इ + अ
निष्कर्ष ७ : वरीलपैकी काही अक्षरे सिंधू संस्कृतीमधील काही अक्षरांसारखी, तसेच ब्राह्मी अक्षरांसारखी दिसतात.
निष्कर्ष ८ – प्राचीन तमिळच्या मुळाक्षराची नावे आणि हित्तीमधील द्विअक्षरी शल्याबोल यांचे नाते असावे.
आजच्या तमिळ/ द्रविड लिपीतील अक्षरांना नावे आहेत. उद्. इक्क, इग्ग, इच्, इट्, इप्प, इम्म. इ.स.पूर्व १६०० मधील द्रविड लिपी आज मिळत नाही. परिच्छेद क्रमांक ४ मधील द्विअक्षरी हित्ती क्युनिफॉर्माचे अवलोकन केले असता आणि पुढे दिलेल्या तालिकेमधील स्तंभ २ आणि ३ यांच्या तुलनेने असे वाटते की प्राचीन काळापासूनच तमिळच्या मुळाक्षरांना नावे असावीत. त्यांची नावे व हित्तीमधील द्विअक्षरी शल्याबोल यांचे नाते असावे. ते कसे?
मध्य-पूर्वेतील सेमेटिक असणाऱ्या सुमेर, मेसोपोटेमिया, बाबिलोनच्या जवळ सुसा येथे सेमेटिक नसणाऱ्याी लोकांचे राज्य होते. त्यांची भाषा सामीतिक नाही. यांची लेखनपद्धती डावीकडून उजवीकडे अशी होती.
मद्र, मत्स्य, वस (इलममध्ये बाशा), वत्स (इजिप्तमध्ये वाद्त्स म्हणून ओळखले जाणारे पण पूर्वी भारतातून इजिप्तमध्ये स्थलांतरित झालेले लोक) हे लोक इलम आणि इजिप्तमधून नंतर पुन्हा भारत=शकद्वीपमध्ये आले होते असे वर्णन आहे. यांची भाषा पिशाची, प्राकृत होती. (MVN कृष्णराव: Indus Script Deciphered ६४). हे मध्य आशियातील लोक द्रविड /आदिम तमिळ असावे असे सर्व विदित आहे.
निष्कर्ष ९- एलेमाइट म्हणजेच तमिळ
सेमेटिक लेखनपद्धती उजवीकडून डावीकडे व तमिळ लिपी डावीकडून उजवीकडे अशा भिन्न आहेत. त्यांच्या सरळ-उलट अशा वाचण्यामुळे नवीन शब्द बनू शकतो. उदा. आदिद्रविड/ तमिळ यांच्या राज्याचे तमिळ हे नाव नकाशावर / इतर सामुग्रीवर त्या काळातील लिपीमध्ये म्हणजेच क्युनिफॉर्म लिपीमध्ये फक्त व्यंजनात्मक पद्धतीने ‘kTMLl’ असे लिहिले असेल.  T M L = ITT- IMM- ILL. इट-इम-एल. मध्य पूर्वेतील त्यांचे शेजारी सेमेटिक लोक तेच क्युनिफॉर्म लिपीतील नाव ‘उजवीकडून डावीकडे लिहिलेले आहे’ असे समजून EL-EM-ITl असे वाचतील आणि त्यांना ELEMITE संबोधतील. याप्रमाणे एलेमाइट म्हणजेच तामिळ हा खुलासा होऊ शकतो. ग्रीक लोक यांना इलेमित म्हणत. भारतातील प्राचीन वाङ्मयातील ऐल वंश (=चंद्रवंश, ऐश्वर्यसंपन्न वंश) हा असावा का?
निष्कर्ष १०- रोमन लिपीतील मुळाक्षरांची नावे आणि हित्तीमधील द्विअक्षरी शल्याबोल यांचे नाते असावे.
रोमन लिपीतील मुळाक्षरांची नावे- बी, डी, पी, टी, सी, जी, व्ही / एच, एफ, एल, एम्, एन, एस, एक्स / आय, आर, वाय / जे, के, झेड / यू, डबल- यू, क्यू / ओ अशी आहेत.
परिच्छेद क्रमांक ४ मधील द्विअक्षरी हित्ती क्युनिफॉर्माचे अवलोकन केले असता काही रोमन मुळाक्षरांची नावे आणि हित्तीमधील द्विअक्षरी शल्याबोल यांचे साम्यसुद्धा स्तंभ ४, ५, ६ मध्ये दिसते. याप्रमाणे रोमन मुळाक्षराच्या नावासंबंधी प्रकाश पडतो. रोमन मुळाक्षरांना इतर युरोपियन भाषांमध्ये थोडी वेगळी नावे आहेत. ती स्तंभ ७ मध्ये दिली आहेत.
या अक्षरनामांची पाश्र्वभूमी क्युनिफॉर्म पद्धतीतून आली असावी. कारण अप, इप, एप, उप, प/पा, पइ/पी, पए/पे, पउ/पु अशा आठ प्रकारचे disyllab हित्ती क्युनिफॉर्ममध्ये दिसतात.
(संबंधित तक्ता पुढील पानावर)

७- ऋग्वेदकाळापूर्वी लोकभाषा unexplecit / अव्याकृत / संदिग्ध होत्या.
वरील निबंधात ऊहापोह केला असताना असेच दिसते की त्या काळी म्हणजे इसवी सनपूर्व विसाव्या शतकापूर्वी बोलले, तसेच लिहिले जाणारे शब्द, भाषा बऱ्याच अस्पष्ट होत्या आणि त्यातून बरेच वेळी योग्य अर्थ निष्पत्ती होत नसावी. या संदर्भात पुष्टी करणारा एक पुरावा मला इंटरनेटच्या एका ब्लॉगवर मिळाला. श्री प्रास यांचा तो ब्लॉग इथे सादर करणे उचित ठरेल.
– प्रास म्हणतात की या संदर्भात ते ज्या गोष्टीकडे अंगुलिनिर्देश करतात त्या ठिकाणी यापूर्वी कुणाचं लक्ष गेलेलं आहे अथवा नाही याबद्दल त्यांना व्यक्तिश: काही माहिती नाही. त्यांनी हा विचार मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
यजुर्वेदाच्या तैत्तिरिय संहितेमध्ये एक ऋचा आढळते. ती पुढीलप्रमाणे आहे –
‘‘वाग्वै पुरा अव्याकृता वदन्ते देवो इंद्रमब्रुवान्निमां वाचं व्याकुर्वीति।
तामिंद्रौ मध्यतोऽरवक्रम्य व्याकरोत्तस्मादियं व्याकृतावाग् उद्यते॥’’
सदर ऋचा आपल्याला यजुर्वेदकाळालाही प्राचीन अशी एक गोष्ट सांगतेय. ही गोष्ट अशी – फार प्राचीन काळी देव अखण्ड, अविभक्त, अव्यक्त (अव्याकृत) अशी अनियमित भाषा बोलत असत. ते इंद्राला म्हणाले, ‘ही आमची भाषा अलग – विभक्त कर.’ त्यावर इंद्राने अट घातली की या कामी मला वायूलाही सामील करून घ्यावं लागेल. तेव्हा या कार्यासाठी इंद्र आणि वायू या दोघांना यज्ञात एकाच वेळी सोमरस प्रदान करण्यात आला. इंद्राने वायूच्या साहाय्याने भाषेला मध्ये धरून विभक्त करून नियमित केले, नियमबद्ध केले आणि तेव्हापासून भाषा व्याकृत झाली.
यावरून आपल्याला असं म्हणता येतं की प्राचीन काळी भाषेतील उच्चार अस्पष्ट, अनियमित असावेत. ऱ्हस्व-दीर्घ, श-ष, व-ब, ज-य इत्यादी काहीसे साम्य असणारे वर्ण योग्य पद्धतीने उच्चारले जात नसावेत.
या संदर्भात तैत्तिरिय शाखा संहितेच्या भट्टभास्कर भाष्यामध्ये ‘अव्याकृता’ शब्दाचं विवरण ‘अविभक्तरूपा .. . असं, ‘व्याकुरू’ शब्दाचं विवरण ‘विभक्तरूपा कुरू’ आणि ‘व्याकरोत्’ शब्दाचं विवरण ‘व्याकृतामकरोत्’ असं केलेलं दिसतं. ऋग्वेदाच्या सायणभाष्यामध्ये ‘चत्वारि वाक् परिमिता पदानि’ इत्यादी ऋचेच्या विवरणामध्ये तैत्तिरिय संहितेतील उपरोक्त संदर्भ देऊन ‘अखण्डाया कृत्स्नाया वाचश्चतुर्धा व्याकृतत्त्वात्’ असं स्पष्टीकरण दिलेलं आहे.
म्हणजेच अनियमित शब्दोच्चार, पदांचे अखण्ड उपयोग, कदाचित अर्निबध आणि चुकीचे उच्चारण यामुळे कुणाला कसलाच अर्थबोध होत नसावा. अशा अनवस्था प्रसंगातून मार्ग काढण्यासाठी इंद्राची उपाययोजना करण्यात आली असावी. अशा परिस्थितीत इंद्राने एकूणच वर्णामध्ये फरक कोणता, तो व्यक्त कसा करायचा हे समजावून सांगितलं असावं. त्यासाठी प्रत्येक वर्ण एकमेकांपासून विलग करून त्याचा एकमेकांशी असलेला भेद सांगितला असावा आणि या मार्गाने त्याने (देवांच्या) उच्चारात व्यक्तता, स्पष्टता आणि नियमितता आणली असावी.
पुन्हा प्रश्न असा पडतो की हे कार्य करण्यासाठी इंद्रच का आणि इंद्रालाही या कामासाठी वायूचं साहाय्य का घ्यावं लागलं? या विषयीसुद्धा आपल्या प्राचीन वाङ्मयामध्ये विवेचन केलेलं सापडतं, ते इथे पाहायला काहीच अडचण नसावी.
बोपदेवाने आपल्या ‘कविकल्पदृम’ नावाच्या धातुपाठामध्ये प्रारंभालाच आठ पूर्ववैयाकरणांचा नामोल्लेखासकट जयजयकार केलेला आहे. त्या सर्वामध्ये त्याने इंद्राला प्रथम स्थान दिलेलं आहे. व्याकरणशास्त्राचा प्रमुख ग्रंथ भगवान् पतंजली लिखित ‘महाभाष्या’मध्ये या संदर्भात एक पुराकथा सापडते, जिचा उल्लेख या ठिकाणी अप्रस्तुत ठरणार नाही. ती कथा अशी –
असं ऐकिवात आहे की, बृहस्पतीने इंद्राला एक हजार देवांची वर्षे, प्रत्येक शब्द उच्चारून शब्दशास्त्र सांगितलं, पण शब्द संपले नाहीत. बृहस्पतीसारखा प्रख्यात वक्ता, इंद्रासारखा तीक्ष्ण बुद्धीचा विद्यार्थी आणि एक हजार देववर्षे इतका प्रदीर्घ अध्ययनाचा कालावधी असूनही शब्दाचा अंत सापडला नाही, मग आजकालची काय कथा?
या गोष्टीमध्येही इंद्र हा शब्दशास्त्राचा ज्ञाता म्हणूनच समोर येतो. म्हणूनच मग असेही म्हणता येते की, या अनुषंगानेच तैत्तिरिय संहितोक्त देवभाषेला इंद्राने वर्णाचा स्पष्टोच्चार सांगणारे व्याकरण पढवून देवांची भाषा स्पष्ट केली.
या कामासाठी इंद्राने वायूची मदत का घेतली, तर याविषयी ‘चरकसंहिते’मध्ये ‘सूत्रस्थाना’तील ‘वातकलाकलीय’ अध्यायात संदर्भ सापडतो, ‘‘वायु: .. प्रवर्तको उच्चावचानां … प्रवर्तको वाच:, प्रकृति: स्पर्शशब्दयो:, श्रोत्रस्पर्शनयोर्मूलं,..।’’ म्हणजेच वायू हा वाणीच्या उच्चारणात महत्त्वाचा भाग आहे. वायूशिवाय हे उच्चारण शक्यच होणार नाही. त्याचप्रमाणे वायूच स्पर्श आणि शब्द यांचे मूळ कारण आहे. श्रोत्र आणि स्पर्शज्ञान यांनाही वायूच कारणीभूत आहे. म्हणजेच वायू जसा शब्दोच्चारणाला कारणीभूत होतो, तसाच तो शब्दज्ञानालाही आवश्यक असतो. मग अव्याकृत वाणीला व्याकृत, नियमित करण्यासाठी वायूला साहाय्याला घेण्यावाचून पर्यायच नाही. वाणी उच्चारणासाठी आणि उच्चारित वाणीच्या ग्रहणासाठी वायू आवश्यकच असल्याने इंद्राने वायूच्या साहाय्याची अट घातली आणि शास्त्रीयदृष्टय़ाही ते योग्य असल्याचेच लक्षात येते.
आत्तापर्यंतचा ऊहापोह पाहता यजुर्वेदाच्या तैत्तिरिय संहितेमध्ये उल्लेखलेल्या देवभाषेची अवस्था भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने सांगितलेल्या, ‘‘अव्यक्तादीनि भूतानि’’ या प्राथमिक अव्यक्त अवस्थेला समान अशी समजून घ्यावी लागते. सृष्टीच्या आरंभी जशी सर्व महाभूते अव्यक्त अवस्थेत, एकमेकांमध्ये मिश्रित, वेगवेगळी करता न येणाऱ्या अवस्थेत असली तरी मुळात ती वेगवेगळीच असतात, त्याप्रमाणेच वाणी अथवा भाषेचे स्वरूप आपल्याला मानावे लागते. या स्वरूपातच तैत्तिरिय संहितोक्त देवभाषा होती असं आपल्याला समजून घ्यावं लागतं- म्हणावं लागतं आणि या भाषेलाच इंद्राने व्याकृत केलं हेसुद्धा मानावं लागतं. असं व्याकृत करणं म्हणजेच इंद्राने या देवभाषेला पहिल्यांदा शब्द कसे वापरायचे ते शिकवलं, म्हणजेच ‘शब्दानुशासन’ सांगितलं, अर्थात त्याने भाषेला ‘व्याकरण’ दिलं, शब्द आणि त्यांच्या उच्चारणाचे नियम दिले आणि ‘प्रमाण’भाषेची निर्मिती केली. अशी प्रमाणभाषा जी कुठेही उच्चारली गेली तरी तिच्यामधून निघणारा अर्थ एकच असेल, व्यक्त होणारे विचारही एकच असतील. हीच भाषा आपल्या सर्वाची मूळ भाषा असं म्हणता येतं.

८- भारतातील तत्कालीन लिपी
वर उल्लेख केल्याप्रमाणे भारतीयांचे भाषाशास्त्रीय ज्ञान, त्यांच्या स्वर, व्यंजन, उच्चारण, संधी यांच्या कल्पना, वेदपूर्व /वेदकालीन काळातच निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे व्यंजन +स्वर = अक्षर. (२)अक्षराचा उच्चार करताना व्यंजन आणि स्वराचे एकजीवत्व या कल्पना पूर्ण विकसित झाल्या होत्या असे इतिहासातून दिसते. भारतात इसवी सनपूर्व २० व्या शतकातच सिंधू सरस्वती संस्कृती चांगल्या प्रकारे उन्नत झाली होती. तसा पुरातत्त्वीय पुरावा उपलब्ध आहे.
परंतु अशी कल्पना त्या समकालीन अक्काडियन, सुमेरीयन, सेमेटिक संस्कृतीच्या लोकांना नव्हती. त्यांची अक्षरे अबकड (अबजड) पद्धतीची, व्यंजन आणि स्वरांमधील भेद जाणणारी नव्हती.
९- इतर भाषातील मुळाक्षरांच्या नावाचा खुलासा
९.१- फोनेशियन मुळाक्षरांची नावे- फोनेशियन लोकांनी क्लिष्टपणामुळे क्युनिफॉर्म पद्धतीचा वापर करणे बंद केले असावे. चर्म, तालपत्र अशा सोप्या माध्यमांच्या विकासातून, तसेच शाई, बोरू, लेखणी इ.च्या निर्मितीमुळे पुढे वस्तूच्या सोप्या चित्राद्वारा आद्य-ध्वनी-वर्ण = एका-शल्याबोल ( mono syllables) सुरू झाले. फोनेशियन पद्धतीतील १८-२० चित्रे/ syllable आपल्याला माहीत आहेत. परंतु स्वर आणि व्यंजन असा भेद ते करू शकले नाही आणि म्हणूनच त्यांच्या मुळाक्षरांची नावे अल्फाबेट: A= अल्पू, B= बेठ,  G=गिमेल, D=दलेथ अशी त्यांनी उच्चारली.
 यांची नावेपण भारतीय प्राकृत भाषांच्या जवळची वाटतात हे नमूद केले पाहिजे. उदा. बल असणारा पाळीव प्राणी =बल्य > बलय> बयल> बैल. (पल्वलपङ्क=mud of a ploughing (संस्कृत-संभाषण-शब्दकोशामध्ये हा शब्द आहे). त्यापासून पल्वल(ploughable) असे विशेषण होते.) पल्लति (run> पळ> पोळ (प्राकृत). सेमेटिक संस्कृतीमध्ये त्याला ‘अल् पोल’ असे म्हणतील. अल् पोल> अल्पो> अल्पू (अक्काडियन भाषा). अलेफ/ आलेफ (हिब्रू), बैठक (प्राकृत) = बेठ. वाळवंटामध्ये चालणारा म्हणजेच गमन करणारा (गम, गच्छति) गिमेल, गामा, गँमा. दल =पान, द्विदल बिया/ फुलाची पाकळी उकलते म्हणजेच उघडते. म्हणून दल >दाल. (र चा ल होतो)> दार (प्रा)= दलेथ (Door). कृष्णराव3 यांच्या पुस्तकात असे नमूद केले आहे की, वेदपूर्व कालापासून फोनेशियन लोकांना पणी, शक असे संबोधत व त्यांची भाषा पैशाची प्राकृत होती. याच कारणामुळे वरील बरेच शब्द साधम्र्य दाखवीत असावेत.
     ९.२-ग्रीक मुळाक्षरांची नावे –
फोनेशियन लिपीतील अक्षरांच्या आकारातून युरोपमध्ये सुरुवातीची ग्रीक मोठी (capital) अक्षरे निघाली. तसेच त्यांच्या नावामधून ग्रीक वर्णाची अल्फा, बीटा, गामा, डेल्टा अशी नावे सुरू झाली. परंतु इतर युरोपिअन भाषांमध्ये ही नावे नाहीत. रोमन नावे- बी, डी, पी, टी, सी, जी, व्ही / एच, एफ, एल, एम, एन, एस, एक्स / आय, आर, वाय / जे, के, झेड / यू, डबल-यू, क्यू / ओ अशी आहेत. ती ग्रीक नावांशी तंतोतंत जुळत नाहीत. यापैकी काही नावांचा खुलासा हित्ती क्युनिफॉर्मच्या द्विअक्षरी नावातून होतो असे मला वाटते.
९.३
युरोपिअन मुळाक्षरांची नावे –
रोमन मुळाक्षरांप्रमाणेच इतर युरोपिअन भाषांमध्येसुद्धा मुळाक्षरांना नावे आहेत. ती थोडी वेगळी आहेत. उदा. का, कु. परंतु ही नावेसुद्धा वर उल्लेख केलेल्या हित्ती द्विअक्षराच्या नामोच्चारापासूनच आलेली वाटतात. ग चा उच्चार ज होतो म्हणून Dze, Gi Go, Dze, Ze/Zi. Usually en or syllabic n, but also (once each) ne, n, n, and Lµµe.(फोनेशियन) पेह =ओष्ठ.  Pi, usually ef or syllabic f, but also (once each) fe, ¦e_, ¦, ¦, and LFFe, usually em or syllabic m, but also (once each)me_, m, m, and Lµµe), usually er or syllabic r, but also (once each) re_, rrr, r, r, and Lppe, usually el or syllabic l, but also (once each) le, ll, l, l, and Llle), usually es or syllabic s, but also (once each) se_, sss, s, s, and Lsse, ha, he, ho, hai (संदर्भ The Letter Names of the Latin Alphabet as attested by Ernest Gordon and Raifahar Doremitzwr in various Euro languages.)
 ९.४-ब्राह्मी लिपीची सुरुवात –
भारतामध्ये निश्चितपणे वेदपूर्व/वैदिक सिंधू-सरस्वती संस्कृतीच्या काळी वर्णाच्या चिन्हांचा- काना, मात्रांचा विकास झाला होता. तसेच अक्षर-मालिकेतील स्वर आणि व्यंजनांचे विश्लेषण झाले असावे. म्हणूनच वर्णाना नावे देताना अशाच प्रकारची चित्रे निवडली गेली की ज्यांच्या नावातील पहिले अक्षर अकारांत असेल. उदा. कमल, खड्ग, गवत (गिरी नाही), घर. म्हणूनच भारतीय लिपीतील (monocyllablesyllables) क, ख, ग, घ. या मुळाक्षरांची/ वर्णाची नावे सर्वात सोपी दिसू लागली. सिंधू लिपीतून पुढे प्रथम ब्राह्मी लिपी विकसित झाली आणि त्यातून इतर भारतीय, दक्षिणपूर्व आशियातील लिप्या निर्माण झाल्या.
 ९.५-सेमिटिक लिपींची सुरुवात –
हित्ती क्युनिफॉर्म लेखन पद्धत पुढे बंद पडली, कारण- इराक, सीरिया या मध्य आशियातील भागात काही काळानंतर सीरियामधील उगरीतिक लोकांनी हित्ती लोकांचा पराभव केला आणि त्यामुळे उगरिक लेखांची क्युनिफॉर्म पद्धत प्रचारात आली. या पद्धतीमध्ये खिळ्यांऐवजी सरळ रेषांचा उपयोग होऊ लागला. त्यामुळे क्युनिफॉर्मचे स्वरूप थोडे सोपे झाले. परंतु उगरीतिक लोकांची संस्कृती फोनेशियन अशा प्रकारची असल्यामुळे त्यांनी फोनेशियन अक्षरे/अल्फाबेट प्रचारात आणली आणि त्यांचे सरळ रेषांकित लेखन सुरू केले. त्यातून जुनी पर्शियन, हिब्रू, नाबातन, अरेबिक अशा सामितीक रेखा-लिपी निर्माण झाल्या.
 ९.६- क्युनिफॉर्म लिपी
ही क्लिष्ट असल्यामुळे त्याची जागा पुढे फोनेशियन अल्फाबेट्सनी घेतली आणि क्युनिफॉर्म लिपी बंद झाली. त्यामुळे तीमध्ये असलेली द्विअक्षरी चिन्हे विस्मृतीत गेली. परंतु नंतर आलेल्या इतर लिप्यांतील मुळाक्षरांच्या द्विअक्षरी नावामध्ये मात्र क्युनिफॉर्म या प्राचीन लिपीच्या वैशिष्टय़ांची अंधूक आठवण कायम राहिली आहे.
संदर्भ :
1) Caligrapher and Script Expert ILT 2011: John Boardley
2) Book : Sumerian Lexicon, Version 3.0, by John A. Halloran. And http://en.wikipedia.org/wiki/Hittie Cuniforms
3) Sindhu Script Deciphered, by MVN Krishnarao, Agam Prakashan, Delhi 1982
4) The Letter Names of the Latin Alphabet (University of California Press, 1973, Volume 9 of University of California Publications : Classical Studies, part III: “Summary of the Ancient Evidence” by Arthur Ernest Gordon, page 32
5)http://en.wiktionary.org/wiki/Category_talk:la:Letter_names_of_the_Roman_alphabet by Raifahar Doremitzwr

पुणे येथे झालेले अधिवेशन
बृहन्महाराष्ट्र प्राच्यविद्या परिषदेचे अधिवेशन पुणे येथील प्रसिद्ध भांडारकर प्राच्यविद्या मंदिरातर्फे  दर दोन वर्षांनी निरनिराळ्या शहरात घेतली जाते. यापुढील परिषद अमरावती येथे २०१५ मध्ये घेतली जाईल.
अधिवेशनाला महाराष्ट्रातील तसेच शेजारच्या राज्यातील प्राच्यविद्या संस्था, आयआयटीपासून इतिहास संस्था, भाषा संस्था, वेद संस्था, यांचा या अधिवेशनात समावेश असतो. विविध प्राच्य-विद्याशाखांमधील पंडित, प्राध्यापक, अभ्यासक, पदवी/ पदव्युत्तर/ पीएच.डी.चे विद्यार्थी यांनी लिहिलेले सुमारे २४० ते २५० शोध-निबंध प्रस्तुत करण्यात येतात आणि सुविद्य अभ्यासकांची उपस्थिती ३०० पेक्षा अधिक असते. शोध-निबंध वाचण्याकरिता त्यांची विभागणी खाली दिलेल्या सात विषय विभागांत करण्यात आली असते. या विषयातील विशेषत्व प्राप्त झालेल्या पंडितांची त्यावर विषय-विभाग अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आलेली असते. शोधनिबंधात प्रस्तुत केलेल्या मुद्दय़ांबाबत ते शंकासमाधान करतात.
हे अधिवेशन शोधनिबंध लिहिण्यास एक उत्तम दालन देत असते. प्रत्येक विद्यार्थ्यांला त्याच्या विद्यार्थी जीवनात ही एक अमूल्य संधी असते. त्यातूनच पुढे प्रज्ञावान शोधकर्ते तयार होतात.
या वर्षीच्या निबंधांची काही विशेष शीर्षके अशी आहेत.
(१)    वेद -अवेस्ता- एकूण २२ निबंधांपैकी- वेदांमधील धनपती, यज्ञविधी आणि त्यांची प्रयोजने, वेदपरम्परेतील वाणी विचार वगैरे.
(२)    धर्म आणि नीती तत्त्वज्ञान- ५४ निबंधांपैकी- युगधर्म आणि नारदीय परंपरा, श्रीमाद्देवि भागवतातील श्रीविद्या, काश्मीर शैवदर्शनातील नाद संकल्पना.
(३)    अभिजात साहित्य- एकूण ६९ निबंधांपैकी -गाथा सप्तशतीचा अर्थ टीकांच्या साहाय्याने लावताना येणाऱ्या अडचणी, ‘नळ ओ दमन’ हे फारसीतील नळ-दमयंती आख्यान, चातुर्दन्डी प्रकाशिकेतील राग ही संकल्पना.
(४)    व्याकरण आणि भाषाशास्त्र -एकूण १७ पैकी- संस्कृतमध्ये स्पोकन टय़ुटोरिअल आणि ध्वनिसंबद्ध संशोधन, सांख्यिकीच्या साहाय्याने हस्तलिखितातील भाषेचा तसेच लेखनिकाच्या गुणविशेषांचा अंदाज.
(५)    इतिहास आणि पुरातत्त्व- एकूण ३० निबंधांपैकी- मराठी लेख असणारी काही प्राचीन नाणी, हिंगणी बेरडी ताम्रपटाच्या अभ्यासाची नव्याने आवश्यकता, तमिळ आणि रोमन मुळाक्षराच्या नावांचा मागोवा.
(६)    विज्ञान आणि तंत्रज्ञान- एकूण ३० निबंधांपैकी- गर्भाची मासिक वाढ- एक अध्ययन, पाय या वैशिष्टय़पूर्ण संख्येच्या संशोधनातील भारतीय गणितज्ञांचे योगदान, हंस एक प्राथमिक संशोधन, प्राचीन भारतातील रातान्धळेपणावरील औषधांचा शोध.
(७)    पश्चिम महाराष्ट्र- एकूण ८ निबंधांपैकी- Estimated time for pre-painting work of Ajanta Caves on basis of labour constraints प्राचीन करपद्धतीचा तौलनिक अभ्यास, मनुस्मृती आणि याज्ञवल्क्य स्मृतीतील करप्रणाली.