कोल्हापूरची सांस्कृतिक प्रतिमा चांगली आहे. ती जोपासण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक व्यसनमुक्त असावी, असे प्रतिपादन गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी केले. ‘लाईव्ह गणेश अ‍ॅवॉर्ड २०१३’च्या वितरण सोहळय़ात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.
सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीतच व्यसनाची गरज का लागते, असा सवाल करत गणेश विसर्जन मिरवणूक व्यसनापासून अलिप्त असावी, असे आवाहन केले. जलसंपदामंत्री हसन मुश्रीफ, सतेज पाटील, अमोल पाटील यांच्या हस्ते अ‍ॅवॉर्डचे मानकरी छत्रपती संभाजीनगर तरुण मंडळाला प्रथम क्रमांकाचा ५५ हजार रुपयांचा धनादेश, चषक, प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. ‘गणपती बाप्पा मोरया’च्या गजराने सारे सभागृह दणाणून गेले.
पोलीस अधीक्षक मनोजकुमार शर्मा यांनी कोल्हापूर सांस्कृतिक नगरी आहे. त्याला साजेशी गणेश विसर्जन मिरवणूक काढा. डॉल्बी टाळा. व्यसन करू नका असे आवाहन केले. खासदार धनंजय महाडिक, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार चंद्रदीप नरके, महापौर सुनीता राऊत, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, निवासी उपजिल्हा अधिकारी संजय पवार, जगदीश पाटील,  अर्जुन धस्के, मोहन मेस्त्री यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
स्पध्रेतील प्रथम क्रमांक मानकरी- घरगुती गौरी सजावट- लता मानसिंग जगताप, सजीव देखावा- मित्रप्रेम तरुण मंडळ, आकर्षक गणेशमूर्ती- मराठा योद्धा फ्रेंड्स सर्कल, उत्कृष्ट मूíतकार- उदय कुंभार, लक्षवेधी मिरवणूक- निवृत्ती तरुण मंडळ, पर्यावरणपूरक गणेशोत्सव- डांगे गल्ली मित्रमंडळ (बुधवार पेठ).