लातूरच्या महापौरपदी भाजपचे सुरेश पवार आणि उपमहापौरपदी देविदास काळे यांची आज निवड झाली. केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाने आता लातूर महापालिकेवरही वर्चस्व मिळवले आहे.

लातूर महानगरपालिकेत भाजपचे ३६ आणि क़ॉंग्रेसचे ३३ नगरसेवक आहेत. दोन्ही पक्षांच्या सदस्यसंख्येत केवळ तीन जागांचा फरक असल्याने महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीत कोण बाजी मारेल, याबाबत तर्क लढवले जात होते. भाजप आणि काँग्रेसच्या गोटातही धास्तीचे वातावरण होते. भाजपने या दोन्ही पदांसाठी चार उमेदवारांचे अर्ज भरले होते. त्यामुळेही नेमकी कोणाची वर्णी लागणार, अशी चर्चा लातूरमध्ये रंगली होती. तर दुसरीकडे कॉंग्रेसने महापौर आणि उपमहापौर या दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज भरला होता.

Narayan Rane, Vinayak Raut,
रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये ‘कडवट’ माजी-आजी शिवसैनिकांमध्ये लढत
Hasan Mushriff on shahu maharaj
“महाराज अजूनही वेळ गेलेली नाही…”, हसन मुश्रीफ यांचा छत्रपती शाहूंना इशारा
narayan rane
शिंदेंची रत्नागिरीत ताकद नाही; राणेंचा दावा
Leaders of Mahayuti gathered in Kolhapur Determination of sanjay Mandaliks victory
कोल्हापुरात महायुतीचे नेते एकवटले; मंडलिक यांच्या विजयाचा निर्धार

महापौरपदासाठी भारतीय जनता पक्षाने शोभा पाटील, सुरेश पवार, देविदास काळे, शैलेश गोजमगुंडे या चौघांचेही उमेदवारी अर्ज दाखल केले होते. उपमहापौरपदासाठीही याच चौघांचे उमेदवारी अर्ज दाखल केले होते. अखेर सुरेश पवार यांची महापौरपदी, तर देविदास काळे यांची उपमहापौरपदी निवड झाली. जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी त्यांच्या निवडीची घोषणा केली.

यंदा मोदीलाटेमुळे कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या लातूरमध्ये भाजपने बाजी मारल्याने कॉंग्रेसला धक्का बसला होता. लातूर पालिकेच्या स्थापनेपासून १९९५ चा अपवाद वगळता काँग्रेसचेच वर्चस्व होते. लातूर म्हटल्यावर विलासराव देशमुख असे समीकरण होते. मात्र राज्यात सत्ता असलेल्या भाजपने अखेर लातूरमध्येही सत्ता मिळवली.