नाशिकमधील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान रुग्णाच्या झालेल्या मृत्यूच्या घटनेनंतर व राज्यभरातील विविध घटनांत डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्यांविरोधात शहरातील डॉक्टरांनी बेमुदत संप पुकारला आहे. या संपामुळे रुग्णांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत असून रूग्णांना व त्यांच्या नातेवाईकांनाही नाहक मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.
शहरातील काही खासगी रुग्णालयांत रुग्णांची तपासणी, सर्व प्रकारचे औषधोपचार बंद झाले असून, हा संप तीन दिवस चालणार आहे. तसेच अत्यावश्यक सेवा देखील बंद राहणार असल्याचे इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे माहिती देण्यात आली आहे.
धुळ्यात एका डॉक्टरला झालेल्या मारहाण प्रकरणानंतर नाशिक जिल्हा रुग्णालयात देखील झालेल्या मारहाण प्रकरणामुळे रुग्णालयातील वातावरण तापले होते. गेल्या आठवड्यात जिल्हा रुग्णालयात स्वाइन फ्लूचा रुग्ण दगावल्याने येथील प्रशिक्षणार्थी डॉक्टरला रुग्णाच्या नातेवाइकांनी बेदम मारहाण केली. अशा प्रकारच्या घटना सतत वाढू लागल्याने राज्यभरातील डॉक्टरांनी या हल्यांविरोधात आवाज उठवल्यानंतर इंडियन मेडिकल असोसिएशनच्या नाशिक शाखेसह जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय संस्थांनी बेमुदत संप पुकारला आहे.

या संपामुळे जिल्ह्यातील सर्व खासगी रुग्णालयांतील बाह्णरुग्ण विभाग, आंतररुग्ण सेवा थांबवण्यात आल्या आहेत. पुढील तीन दिवसांकरिता सर्व अत्यावश्यक वैद्यकीय सेवा बंद राहणार असल्याचे आयएमएचे अध्यक्ष डॉ. अनिरुद्ध भांडारकर यांनी सांगितले आहे. संस्थेचे सचिव डॉ. प्रशांत देवरे, डॉ. निवेदिता पवार, डॉ. राजश्री पाटील, डॉ. आवेश पलोड यांसह जिल्ह्यातील विविध रुग्णालयांतील डॉक्टर यावेळी उपस्थित होते. या कालावधीत रुग्णांना शासकीय रुग्णालयांमध्ये उपचार घेण्याचे आवाहन आयएमएतर्फे करण्यात आले आहे.
सहनशीलतेचा अंत झाल्यामुळे नाईलाजास्तव अशाप्रकारचे कठोर पाऊल उचलावे लागत आहे. दडपणाखाली सतत काम करणे अशक्य झाल्याने स्वतःच्या सुरक्षिततेकरिता हा संप पुकारावा लागत असल्याचे डॉक्टरांनी यावेळी स्पष्ट केले आहे. निकोप सामाजिक व्यवस्थेसाठी सुजाण नागरिकांनीही या संपास पाठिंबा द्यावा असे आवाहन असोसिएशनने केले आहे.
डॉक्टरांना संरक्षण मिळालेच पाहिजे या मागणीसह अन्य मागण्यांसाठी आयएमएने हा संप पुकारला आहे. या संपास पाठिंबा देण्यासाठी गुरुवारपासून राज्यभरातील ४० हजार डॉक्टर बेमुदत बंद ठेवणार आहेत. राज्यातील खासगी दवाखाने, पॅथॉलॉजी लॅब, एक्सरे सेंटर, सोनोग्राफी सेंटर या संपामुळे बंद आहेत. त्यामुळे राज्यातील आरोग्यसेवा ठप्प झाली असून यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे.
आयएमएने पुकारलेल्या या संपामुळे रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयातील यंत्रणा तयार असून रुग्णालयामधील बाह्ण रुग्ण विभाग, अतिदक्षता व इमर्जन्सी विभागात वैद्यकीय अधिकारी २४ तास कार्यरत असल्याचे येथील अधिकार्यांनी सांगितले. यंत्रणेवर कोणताही ताण येणार नाही; मात्र इतर खासगी वैद्यकीय सेवा बंद राहणार असल्यामुळे या कालावधीत दक्ष राहण्याच्या सूचना येथील डॉक्टरांना देण्यात आलेल्या असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. महापालिका रुग्णालयांत सर्व यंत्रणा सज्ज असून याठिकाणी सर्वप्रकारच्या सुविधा उपलब्ध असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे कोणत्याही इमर्जन्सीसाठी पालिकेचे डॉक्टर्स तयार असून तत्काळ उपाययोजनांसाठी रुग्णालयाला सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र या संपामुळे रूग्णांचे हाल वाढले असून जिल्हा शासकीय रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढत आहे.
आरोग्य पथकाची मदत
संपामुळे रुग्ण संख्येत वाढ होईल याची कल्पना असल्याने पूर्वनियोजन केले. वैद्यकीय अधिकारी, प्रशिक्षणार्थी यांची बैठक घेत कामाच्या वेळेत वाढ, मुबलक स्वरुपात औषधसाठा, वेळोवेळी शाळांमध्ये तपासणी करणारे आरोग्यपथक यांची मदत घेण्यात आली आहे. सोनोग्राफी, सिटी स्कॅनसाठी कुशल मनुष्यबळ देण्यात आले आहे. सकाळपासून २० टक्के रुग्णवाढ झाली आहे.
डॉ. सुरेश जगदाळे, जिल्हा शल्यचिकित्सक
आपत्कालीन सेवा देण्यास तत्पर
डॉक्टरांवर सतत होणारे हल्ले, असुरक्षित वातावरण यामध्ये सुरक्षितता मिळावी यासाठी आम्ही हा संप पुकारला आहे. कुठल्याही रुग्णाचे हाल व्हावे किंवा त्याला त्रास व्हावा अशी आमची इच्छा नाही. त्यामुळे आपत्कालीन सेवा देण्यास आम्ही तत्पर आहोत.
डॉ निवेदिता पवार, इंडियन मेडिकल असोसिएशन, नाशिक शाखा

nashik, Unseasonal Rain, Damages Crops, 107 Villages, Nashik District, farmers, nashik Unseasonal Rain, 729 hecters, surgana, trimbakseshwar, baglan, peth, nashik, nashik news, unseasonal rain nashik
अवकाळीचा नाशिक जिल्ह्यातील ७२९ हेक्टरवरील पिकांना फटका
Damage to crops on 82 thousand hectares due to hailstorm
गारपिटीमुळे ८२ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान, जाणून घ्या, जिल्हा, पिकनिहाय नुकसान
nashik water crisis marathi news,
नाशिक जिल्ह्यात तहानलेल्या गावांच्या संख्येत वाढ, आठवडाभरात ५७ गावे-वाड्यांची भर; धरणसाठा २८ टक्क्यांवर
nashik water crisis marathi news, nashik water dam marathi news,
नाशिक जिल्ह्यातील धरणसाठा ३१ टक्क्यांवर