– रांजण येतोय १७ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला
– यश आणि गौरी या नव्या जोडीचं पदार्पण

प्रेमाला कोणतंही बंधन नसतं असा विचार मांडणारा बहुचर्चित ‘रांजण’ हा चित्रपट १७ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटातील ‘लागीर झालं रं’ या गाण्याचा सोशल मीडियात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, यश आणि गौरी ही नवी आणि फ्रेश जोडी चित्रपटसृष्टीत दाखल झाली आहे.

आताच्या घडीला मराठी चित्रपटसृष्टीत प्रेमकथा असलेले अनेक चित्रपट होत आहेत. शहरी, ग्रामीण पार्श्वभूमीवरच्या वैविध्यपूर्ण कथा पडद्यावर येत आहेत. ‘रांजण’मध्येही एका शाळकरी मुलगा आणि मुलगी यांच्यातील प्रेमकथा आहे. मात्र, ही कथा प्रेम, आकर्षण या भावनांच्या पलीकडे जाऊन एक सामाजिक विचार मांडते. मुलभूत गोष्टींवर भाष्य करते. मुलांचा समाजाकडे पाहण्याचा दृष्टीकोनही त्यातून व्यक्त होतो. ‘लागीर झालं रं’ या गाण्यातून यश आणि गौरी ही नवी आणि फ्रेश जोडी चित्रपटसृष्टीला मिळाली आहे. सोशल मीडियात या गाण्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे. वैभव जोशी यांनी लिहिलेल्या गाण्याला नरेंद्र भिडे यांनी संगीतबद्ध केलं आहे. अजय गोगावले यांनी त्यांच्या खास शैलीत हे गाणं गायलं आहे. गाण्याचे शब्द, संगीत आणि गाण्याचं चित्रीकरण या विषयी सोशल मीडियात चर्चा आहे. श्री महागणपती एंटरटेन्मेंटच्या रवींद्र कैलास हरपळे यांनी ‘रांजण’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाचं कथा-पटकथा लेखन व दिग्दर्शन प्रकाश जनार्दन पवार यांनी केलं आहे. तर, संवादलेखन प्रकाश पवार व नीलेश भोसले यांचं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘रांजण’ या चित्रपटात शाळेच्या पार्श्वभूमीवर फुलणारी प्रेमकथा आहे. मात्र, ती टिपिकल प्रेमकथेसारखी नाही. प्रेमाच्या पलीकडे जाऊन केलेला सामाजिक विचार आहे आणि हेच चित्रपटाचं वेगळेपणही आहे. ‘लागीर झालं रं’च्या मेकिंगचा व्हिडिओ आणि गाण्याला अल्पावधीत मिळालेला प्रतिसाद पाहून प्रेक्षक या वेगळ्या कथानकाचं नक्कीच कौतुक करतील,’ असं लेखक दिग्दर्शक प्रकाश पवार यांनी सांगितलं.