बॉलिवूड कलाकार आणि त्यांच्या कामाला मिळणारी दाद म्हणजेच पुरस्कार. प्रेक्षकांच्या उडंद प्रतिसादासोबतच चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या आणि आपल्या कलेचं योगदान देणाऱ्या या कलाकारांच्या दृष्टीने पुरस्कारांचे अनन्यसाधारण महत्त्व असते. असाच एक मानाचा पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. चित्रपटसृष्टीतील कलाकार आणि तंत्रज्ञांचा गौरव करत ‘स्टार स्क्रिन पुरस्कार २०१६’ हा दिमाखदार सोहळा नुकताच पार पडला. बी टाऊनमधील विविध कलाकार आणि त्यांचे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहेत. पुरस्कार सोहळ्यांची रंगत आणि कलाकारांचे दम्माल परफॉर्मन्सेस यांच्या जोडीनेच प्रेक्षकांनी उत्सुकता आहे ती म्हणजे कोणत्या कलाकाराच्या वाट्याला कोणता पुरस्कार आला याबबतची.

‘अॅण्ड अवॉर्ड गोज टू..’ असे शब्द कानावर पडताच सर्वांचेच कान पुरस्कारासाठी कोणाचे नाव पुकारले जाणार यासाठी टवकारलेले असतात. अशाच उस्ताहाच्या वातावरणात स्टार स्क्रिन पुरस्कार सोहळा पार पडला. यंदाच्या वर्षी बॉलिवूडमध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटांकडे पाहता या पुरस्कारांसाठी कलाकारांमध्येही चांगलीच स्पर्धा रंगल्याचे पाहायला मिळाले. शूजित सरकारच्या ‘पिंक’ या चित्रपटाचा स्टार स्क्रिन पुरस्कार सोहळ्यांवर दबदबा पाहायला मिळाला. सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या पुरस्कारासह या चित्रपटाच्या वाट्याला चार पुरस्कार आले आहेत. या चित्रपटातील भूमिकेसाठी बिग बी अमिताभ बच्चन यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि रितेश शाहला सर्वोत्कृष्ट संवाद लेखनाच्या पुरस्कारांनी गौरविण्यात आले.

img_5029

अवघ्या काही वर्षांमध्येच अभिनय क्षेत्रामध्ये प्रगती करणाऱ्या अभिनेत्री आलिया भट्टने सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्कारांवर कब्जा केला. या पुरस्कार सोहळ्यांमध्ये सर्वात जास्त लक्षवेधी ठरले ते म्हणजे किंग खान आणि सलमान खानचे सूत्रसंचालन. सलमान आणि शाहरुखच्या सूत्रसंचालनासोबतच या पुरस्कार सोहळ्याचा काही भाग निर्माता-दिग्दर्श करण जोहर आणि करणसिंग ग्रोवर यांनी सूत्रसंचालित केला. एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा यांना या सोहळ्यामध्ये चित्रपटसृष्टीला दिलेल्या योगदानाबद्दल जीनवगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी रेखा यांना मानवंदना देण्यासाठी अभिनेत्री सोनम कपूरने एक खास परफॉर्मन्सही सादर केला. रेखा यांनीही त्यांच्या अवघ्या काही मिनिटांच्या नृत्याने प्रेक्षकांना घायाळ केले असेच म्हणावे लागेल. स्टार स्क्रिन पुरस्कार सोहळ्यातील समीक्षकांतर्फे देण्यात येणारा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार अभिनेता सुशांत सिंग राजपूत याला प्रदान करण्यात आला. ‘एम.एस.धोनी- द अनडोल्ड स्टोरी’ या चित्रपटासाठी त्याला हा पुरस्कार देण्यात आला आहे. समीक्षकांतर्फे देण्यात येणाऱ्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्कारावर ‘निल बटे सन्नाटा’ या चित्रपटासाठी अभिनेत्री स्वरा भास्करचे नाव कोरले गेले.

varun

‘स्टार स्क्रिन पुरस्कार’ सोहळ्याचा हा कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल. तुर्तास ‘स्टार स्क्रिन पुरस्कार २०१६’ च्या विजेत्यांची यादी-

सर्वोत्कृष्ट चित्रपट- पिंक
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- राम माधवानी (नीरजा)
सर्वोत्कृष्ट अभिनेता- अमिताभ बच्चन (पिंक)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- आलिया भट्ट (उडता पंजाब)
सर्वोत्कृष्ट अभिनेता (समीक्षक पसंती)- सुशांत सिंग राजपूत (एम.एस.धोनी- द अनटोल्ड स्टोरी)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (समीक्षक पसंती)- स्वरा भास्कर (निल बटे सन्नाटा)
सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेता- टिनू सुरेश देसाई (रुस्तम)
सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता- वरुण धवन (ढिशूम)
सर्वोत्कृष्ट बालकलाकार- रिया शुक्ला (निल बटे सन्नाटा)
सर्वोत्कृष्ट न्युकमर (पुरुष)- जिम सारभ (नीरजा), हर्षवर्धन कपूर (मिर्झ्या)
सर्वोत्कृष्ट न्युकमर (स्त्री)- दिशा पटानी (एम.एस.धोनी- द अनटोल्ड स्टोरी)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता- ऋषी कपूर (कपूर अॅण्ड सन्स)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री- शबाना आझमी (नीरजा)
सर्वोत्कृष्ट गीतकार- अमिताभ भट्टाचार्या (ऐ दिल है मुश्किल)
सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन- प्रितम चक्रवर्ती (ऐ दिल है मुश्किल)
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक- अमित मिश्रा (बुल्लेया- ऐ दिल है मुश्किल)
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका- पलक मुछाल (कौन तुझे- एम.एस.धोनी- द अनटोल्ड स्टोरी)
सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन- बॉस्को-सीझर (काला चष्मा- बार बार देखो)
सर्वोत्कृष्ट संकलन- आदित्य बॅनर्जी (पिंक)
सर्वोत्कृष्ट छायाचित्रण- अनय गोस्वामी (फितूर)
सर्वोत्कृष्ट थरारदृश्ये- जय सिंग निज्जर (शिवाय)
सर्वोत्कृष्ट पटकथा- सायविन क्वाड्रास (नीरजा)
सर्वोत्कृष्य संवाद- रितेश शाह (पिंक)
स्टार प्लस नई सोच अवॉर्ड- आलिया भट्ट
जीवनगौरव पुरस्कार- रेखा

rishi