सोशल मिडीयाच्या जगात आता सेलिबेटींची कोणतीच माहिती वैयक्तिक राहत नाही. त्यांच्या खासगी आयुष्यातील घडामोडी ते स्वतः तरी चाहत्यांसाठी सोशल मिडीयावर शेअर करतात किंवा त्यांचे चाहते तरी त्यांच्याबाबत काहीनाकाही माहिती देतच असतात. पण याचा फटका कधी कधी त्यांच्या घरच्यांनाही पडतो. असाच काहीसा अनुभव मल्हार पाटेकर यालाही आला. सुप्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांचा मुलगा मल्हार पाटेकर सध्या खूपच हैराण झाला आहे.  नाना पाटेकर यांचा फोन नंबर म्हणून लोक मल्हारला फोन करु लागले आहेत. त्यामुळेच शेवटी मल्हारने कंटाळून आपण नानासाहेब नसल्याचा खुलासा फेसबुकवर केला.
मल्हारने एक फेसबुक पोस्ट केले असून त्यात म्हटलेय की, मी नानासाहेब नसून त्यांचा मुलगा आहे. एक मोबाइल क्रमांक व्हायरल झाला आहे. पण हरकत नाही. तुम्ही सर्व आमचे कुटुंब आहात. मल्हार हा नाना आणि निलकांती पाटेकर यांचा मुलगा आहे.

(छाया सौजन्यः फेसबुक)