मुसळधार पावसाने झोडपल्याने मुंबईतील अनेक रस्ते खड्डेमय होऊ लागले असून नागरिक हैराण झाले आहेत. खड्डय़ांवरुन ओरड होवू नये म्हणून आता नागरिकांनी खड्डय़ांची छायाचित्रे संकेतस्थळावर टाकण्याचे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे. गेल्या आठवडय़ात मुसळधार पावसाने मुंबईला झोडपल्यानंतर रस्त्यांची दुर्दशा होऊ लागली आहे. ठिकठिकाणी खड्डे पडून वाहतुकीवर परिणाम होऊ लागला आहे. या पाश्र्वभूमीवर नागरिकांनी ६६६.५्रूीऋ्रू३्र९ील्ल.ूे या संकेतस्थळावर खड्डय़ांची छायाचित्रे टाकावीत असे आवाहन पालिकेने केले आहे. दरम्यान, आपण केलेल्या तक्रारी संदर्भात कोणती कारवाई करण्यात आली याची माहितीही या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे. नागरिकांनी या संकेतस्थळाबरोबरच टोल फ्री क्रमांक १९१६ वर संपर्क साधून आपली तक्रार करावी, असेही आवाहन पालिकेने केले आहे.