नव्या ‘उपग्रह टर्मिनस’चा आराखडा तयार; १२५० कोटी रुपयांचा प्रस्तावित प्रकल्प

रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात घोषणा केलेल्या सॅटेलाइट टर्मिनसबाबत (उपग्रह टर्मिनस) मध्य रेल्वेने प्रत्यक्षात काम सुरू केले आहे. पनवेल येथे एक टर्मिनस तयार होत असताना आता मध्य रेल्वेने ठाकुर्ली येथील प्रस्तावित टर्मिनससाठीही हालचाली सुरू केल्या आहेत. १२५० कोटी रुपयांच्या या प्रस्तावित प्रकल्पाचा आराखडा मध्य रेल्वेने तयार केला असून आता हा आराखडा सल्लागारांकडे पाठवण्यात येणार आहे.
सध्या मध्य रेल्वेवरील कुर्ला ते सीएसटी पाचव्या-सहाव्या मार्गिकेच्या प्रकल्पाची उत्सुकता प्रवाशांना आहे. मात्र या प्रकल्पात अनेक अडचणी येत असताना ठाकुर्ली येथील हे टर्मिनस त्यावरील उपाय असल्याचे बोलले जात आहे. मुंबईत छत्रपती शिवाजी टर्मिनसपर्यंत येणाऱ्या गाडय़ांमुळे उपनगरीय मार्गावरील गाडय़ांची संख्या वाढवणे कठीण झाले आहे. मात्र ठाकुर्ली टर्मिनसचा पर्याय उपलब्ध झाल्यास या गाडय़ांपैकी बहुतांश गाडय़ा त्या टर्मिनसकडे वळवता येतील आणि कल्याणपुढील मार्ग उपनगरीय गाडय़ांसाठी राखीव ठेवता येईल.
या प्रस्तावित टर्मिनससाठी डोंबिवली-ठाकुर्ली आणि कल्याण या स्थानकांकडील पश्चिमेची बाजू राखून ठेवण्यात आली आहे. येथे उभारण्यात येणारे टर्मिनस उन्नत असून त्यात पाच प्लॅटफॉर्मचा समावेश असेल. या प्लॅटफॉर्मखाली पार्किंगची सोय असेल. तसेच गाडय़ांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी नऊ पीट लाइन्स असतील. हे टर्मिनस तयार झाल्यानंतर २५ अप आणि तेवढय़ाच डाऊन अशा ५० मेल, एक्स्प्रेस गाडय़ांची वाहतूक वाढेल. या टर्मिनसपर्यंत पोहोचण्यासाठी सध्या रस्त्यावाटे कोणताही मार्ग नाही. मात्र त्यावरही उपाय केला जाणार आहे.
सध्या रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी या प्रस्तावित टर्मिनसचा आराखडा तयार केला आहे. या आराखडय़ानुसार हे टर्मिनस उभे राहण्यासाठी १२५२ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. हा आराखडा आता सल्लागारांकडे पाठवण्यात येईल. त्यानंतर हा आराखडा रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात येईल.

14 hour megablock of railway between Ballarpur Gondia
बल्लारपूर- गोंदिया दरम्यान रेल्वेचा १४ तासांचा मेगाब्लॉक,दोन मेमू पॅसेंजर रद्द, दरभंगा, कोरबा एक्स्प्रेसच्या मार्गात बदल
second tunnel of the Sagari Kinara Road project is open for passenger service
मुंबई : सागरी किनारा रस्ता प्रकल्पातील दुसरा बोगदा प्रवाशांच्या सेवेत खुला
Pune Metro, Swargate,
पुणे मेट्रो सुसाट…! स्वारगेटपर्यंत धावण्याचा मुहूर्त अखेर ठरला
Residents of MIDC distressed by overnight digging of Metro on Shilphata Road in Dombivli
डोंबिवलीतील शिळफाटा रस्त्यावरील मेट्रोच्या रात्रभराच्या खोदाईने एमआयडीसीतील रहिवासी त्रस्त
Thane, Railway traffic, platform,
ठाणे : फलाट क्रमांक पाचवरून रेल्वे वाहतूक सुरू, लोकलला फुलांच्या माळा घालत मोटरमन आणि प्रवाशांचे स्वागत
Jumbo Block There is no decision yet on extending the metro trips Mumbai print news
जम्बो ब्लॉक :मेट्रोच्या फेऱ्या वाढविण्याबाबत अद्याप निर्णय नाही
Maharashtra State Road Development Corporation Limited, MSRDC, Revas Reddi Coastal Road, konkan coastal Road, konkan highway, maharashtra government, highway in konkan,
आता कोकणातही कोस्टल रोड…९३ पर्यटनस्थळे जोडणारा रेवस – रेड्डी सागरी किनारा मार्ग प्रकल्प कसा असेल?
Due to block of CSMT people travel to konkan are suffered cancellation of train stops increased struggle of passengers
सीएसएमटीच्या ब्लॉकमुळे कोकणवासीय हैराण, रेल्वेगाड्यांचे थांबे रद्द केल्याने प्रवाशांची दमछाक वाढली