मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
- टोलप्रकरणी हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांनी भूमिका स्पष्ट करण्याची मागणी
- सोलापूर विद्यापीठाच्या नामांतरावरून राजकारण रंगू लागले
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
- जमिनीच्या वादातून बिल्डरवर गोळीबार; प्रकृती चिंताजनक
- ताडोबाच्या बफरझोनमध्ये वनभ्रमंतीला चालना देण्याची मागणी
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
पालिकेच्या घाटकोपर विभाग कार्यालयात दुय्यम अभियंत्याला मारहाण झाल्यामुळे अभियंत्यांमध्ये असंतोष धगधगू लागला असून त्यांना शांत करताना पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांची त्रेधातिरपीट उडाली आहे. प्रसंगी मनसे आमदार राम कदम यांच्याविरुद्ध मुख्यमंत्र्यांकडे तक्रर करू असे आश्वासन देऊन अशी पालिका आयुक्तांनी तूर्तास अभियंत्यांना शांत केल्याचे समजते.
अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त करणाऱ्या पालिकेच्या दुय्यम अभियंत्याला गुरुवारी घाटकोपर येथील त्याच्या कार्यालयात काही अज्ञात महिलांनी मारहाण केली होती. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या अभियंत्यांनी घाटकोपर विभाग कार्यालयात 'काम बंद' आदोलन केले.
पूर्व उपनगरातील पालिकेच्या विभाग कार्यालयांमधील काही अभियंते या आंदोलनात सहभागी झाले होते. त्याच वेळी पालिका आयुक्त चेंबूर येथील पालिका कार्यलयात बैठकीत व्यग्र होते. मात्र या बैठकीलाही अभियंत्याची उपस्थिती तुरळकच होती. अखेर रात्री सीताराम कुंटे मारहाण केलेल्या दुय्यम अभियंत्याला पाहण्यासाठी राजावाडी रुग्णालयात गेले. त्यातच आमदार राम कदम यांनी पालिका अधिकाऱ्यांविरुद्ध पालिकेच्या घाटकोपर विभाग कार्यालयाबाहेर फलकबाजी केल्यामुळे कर्मचारी अधिकच संतप्त झाले.
आपल्याला संरक्षण मिळावे यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून अभियंते मागणी करीत आहेत. परंतु त्यादृष्टीने प्रशासन कोणतीच पावले टाकत नसल्यामुळे अभियंते कमालीचे चिडले आहेत. 'तुम्ही या, आपण चर्चेतून मार्ग काढूया', असे त्यांची समजूत आयुक्तांकडून काढण्यात आली.
मात्र अभियंते ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्यामुळे अखेर सीताराम कुंटे यांनी, वेळ पडली तर आमदार राम कदम यांची मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे तक्रार करू, असे आश्वासन देऊन आपले हात झटकले.
- प्रतिक्रिया
- प्रतिक्रिया येथे नोंदवा



















