मराठी बद्दल आक्षेपार्ह मजकूर असलेला बॅनर लावल्याच्या आरोप करत मनसे कार्यकर्त्यांनी माजी शेरिफ नाना चुम्डासमा यांच्या नरिमन पॉईंट येथील निवासाबाहेर लावलेल्या बॅनरची मोडतोड केली. मरीन ड्राईव्ह पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून काही मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.
 मल्टिप्लेक्स मधील मराठी चित्रपटांना प्राईम टाईम मिळाल्यानंतर लेखिका शोभा डे यांनी ट्विट करून रोष ओढवून घेतला होता. मुंबईचे माजी शेरिफ नाना चुडासमा यांनी देखील या विरोधात मरिन ड्राईव्ह येथे बॅनर लावल्याने मनसे संतप्त झाली आहे. बुधवारी संध्याकाळी सव्वा चाच्या सुमारास नरिमन पॉईंट येथील चायना महल इमारतीजवळ चुडासमा यांनी लावलेला बॅनर फाडून टाकला. यावेळी त्यांनी चुडासमा यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. त्यांच्या कन्या शायना एनसी यांनी याप्रकरणी मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांविरोधात दंगलीचा गुन्हा दाखल करून काही जणांना ताब्यात घेतले आहे. मराठीचे स्वागत आहे मात्र हुकूमशाही नको अशा आशयाचा बॅनर त्यांनी लावले होते.