इंग्रजी, मराठी, हिंदीखेरीज अन्य भाषा विभागांत विद्यार्थ्यांचीच वानवा; काही विभाग बंद होण्याच्या मार्गावर

corruption in academic research
संशोधन कमी आणि बाजार जास्त!
Even after eight months engineering students are still waiting for mark sheets
मुंबई : आठ महिन्यांनंतरही अभियांत्रिकीचे विद्यार्थी गुणपत्रिकेच्या प्रतीक्षेत
mumbai university , law students
पुनर्मूल्यांकन अर्जांचा गोंधळ: मुंबई विद्यापीठाच्या विधि शाखेच्या नवव्या सत्राचे विद्यार्थी संभ्रमात
Pune University Cancels Professor s Guideship for Demanding Bribe
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून ‘त्या’ लाचखोर प्राध्यापिकेवर कारवाई

देशविदेशातील भाषांचे सौष्ठव साहित्याच्या माध्यमातून अभ्यासण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून मुंबई विद्यापीठात पदव्युत्तर स्तरावर सुरू असलेल्या विविध देशी-परदेशी भाषांच्या विभागांना सध्या विद्यार्थ्यांअभावी मरगळ आली आहे. हिंदी, मराठी, इंग्रजी अशा मोजक्या भाषावगळता बहुतांश विभागांमध्ये एकतर पुरेसे विद्यार्थी तरी नाहीत किंवा जे आहेत त्यांना साहित्यातील अभ्यासात रस तरी नाही. त्यामुळे विद्यापीठाच्या भाषा विभागांची सध्या दयनीय अवस्था आहे.

विद्यापीठात मराठी, हिंदूी, कन्नड, गुजराती, सिंधी अशा देशी भाषांबरोबरच अनेक परदेशी भाषांचेही विभाग आहेत. परंतु, यापैकी काही ठरावीक भाषावगळता इतर भाषांमध्ये उच्च शिक्षण घेण्यात विद्यार्थ्यांमध्ये अनास्था दिसून येत आहे. त्यामुळे अनेक विभागात विद्यार्थ्यांची संख्या रोडावली आहे. मराठी, इंग्रजी, हिंदी या भाषांव्यतिरिक्त इतर विभागात पुरेसे विद्यार्थीच नाहीत. काही विभाग तर विद्यार्थ्यांअभावी बंद होण्याच्या मार्गावर आहेत. जे आहेत त्यांना संबंधित भाषेच्या साहित्य शिक्षणात रस नाही. आखाती राष्ट्रांमध्ये नोकरी किंवा रोजगाराकरिता जाऊ इच्छिणाऱ्यांचा कल तर बोली भाषा शिकण्याकडेच दिसून येत असल्याचे येथील एका प्राध्यापकांनी सांगितले.

विद्यापीठाच्या फ्रेंच विभागात एमए-१ आणि एमए-२ करिता मिळून ५० इतकी प्रवेशक्षमता आहे. पण विभागात पहिल्या वर्षांत चार आणि दोन असे विद्यार्थी सध्या शिकत आहेत; तर जर्मनला ५, रशियनला ४ अशी विद्यार्थी संख्या आहे. तुलनेत अरबीची संख्या चांगली आहे. मात्र येथील विद्यार्थ्यांना आखाती राष्ट्रांमध्ये नोकरीकरिता जायचे आहे. त्यामुळे त्यांना केवळ बोली भाषा शिकण्यातच रस आहे, तर काहींना इस्लाम धर्म समजून घ्यावयाचा आहे. म्हणून या विभागात शिकणाऱ्या ४०पैकी वयाच्या तिशीच्या जवळपास असणारे ३० विद्यार्थी आहेत.

mu-chart

गुजराती विभागात एमएच्या दोन्ही वर्षांमध्ये सध्या एकही विद्यार्थी नाही, तर सिंधी विभागात विद्यार्थी संख्या दहा इतकी रोडावली आहे. गेल्या वर्षी ४० प्रवेशक्षमतेपैकी २६ जागा भरल्या होत्या. कन्नडमध्ये तुलनेत बरी परिस्थिती म्हणजे १७ विद्यार्थी आहेत. अर्थात या दोन्ही विभागांमध्ये तरुण विद्यार्थ्यांऐवजी बहुतांश

विद्यार्थी तिशीच्या वरचे आहेत. विद्यापीठांचे भाषा विभाग हे अशाच विद्यार्थ्यांच्या जिवावर तगले आहेत, असे म्हटले तरी वागवे ठरू नये. तुलनेत संस्कृती आणि पाली या प्राचीन भाषांमध्ये अनुक्रमे ७२ आणि ८७ असे विद्यार्थी आहेत. परंतु,येथेही बहुतांश विद्यार्थी तिशीच्या वरचे आहेत.