‘नमाज हा योगाचाच एक प्रकार आहे,’ असे खळबळजनक प्रतिपादन करीत अल्पसंख्याक खात्याचे मंत्री एकनाथ खडसे यांनी योग दिनाचे समर्थन केले. ‘सूर्याला नमस्कार करायचा नसेल, तर अल्लाला करावा. आमची कोणावरही सक्ती नाही,’ असे खडसे यांनी स्पष्ट केले.
शाळेत ‘योग दिन’ आयोजित करण्याला मुस्लिम धर्मीयांनी आक्षेप घेतला आहे. रमजान सुरू होत असून मुस्लिम धर्मीयांना सूर्यनमस्कार घालता येणार नाही, अशी भूमिका घेण्यात आल्यावर योगाची सक्ती नसल्याचे सरकारनेही स्पष्ट केले आहे.
यासंदर्भात बोलताना खडसे यांनी ‘नमाज आणि योग’ हा एकच असल्याचे मत व्यक्त केले. योग दिन साजरा करण्यास कोणताही हिंदूुत्ववादी विचार नाही. धर्माच्या नावावर पोळी भाजणारे असले राजकारण करीत असल्याचे खडसे यांनी सांगितले.