राज्यातील जास्तीत जास्त महापालिकांवर वर्चस्व सिद्ध करण्यासाठी २१ फेब्रुवारीला बऱ्याच राजकिय पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागल्याचे पाहायला मिळाले. या निमित्तानं मुंबई, ठाणे, नाशिकसह दहा महापालिकांमध्ये राजकीय पक्षांचा कलगीतुरा गेला महिनाभर दिसला. पण, आता निर्णयाचा क्षण जवळ आला आहे. महत्त्वाच्या १० महापालिकांमधील एक असलेल्या नागपूर महापालिकेकडेही अनेकांच्या नजरा लागल्या आहेत. या महापालिकेत भारतीय जनता पक्ष पुन्हा सत्तेवर येणार का, हाच कळीचा प्रश्न आहे. एक्झिट पोलनुसार या महापालिकेत भाजप पुन्हा स्पष्ट बहुमतासह सत्तेवर येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे भाजपसाठी तर तो शुभसंकेत मानण्यात येतो आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी भाजपच नागपूरमध्ये सर्वांत मोठा पक्ष ठरला होता. भाजपला ६२ जागांवर यश मिळाले होते. त्या खालोखाल काँग्रेस ४१ जागांवर विजयी झाला होता. यंदाच्या निवडणुकीत भाजपच्या जागा वाढणार का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Zilla Parishad Election Results 2017 Live Updates

नागपूर महापालिकेसाठी दोन दिवसांपूर्वी ५३ टक्के मतदान झाले होते. १५१ सदस्यसंख्या असलेल्या नागपूर महापालिकेत यंदा पहिल्यांदाच ४ सदस्यांच्या प्रभाग पद्धतीने मतदान झाले. ही पद्धत भाजपसाठी फायदेशीर ठरणार का, हे बघावे लागणार आहे. गेल्या दहा वर्षांपासून नागपूरमध्ये काँग्रेस सत्तेबाहेर आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी ही निवडणूक जिंकणेही महत्त्वाची असणार आहे. नागपूरमध्ये काँग्रेसने सत्ता पुन्हा हस्तगत करण्यासाठी मोठा जोर लावला होता. २०१२ च्या निवडणुकीत भाजपला बहुमत नव्हते. छोटे पक्ष आणि अपक्षांची मदत घेऊन भाजपने पाच वर्षे सत्ता भोगली, त्यामुळे यंदाच्या निकालांमध्ये बहुमत सिद्ध करण्यात भाजप यशस्वी होते का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

BMC Election Results 2017 Live Updates 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे दोघेही नागपूरचे आहेत. त्यामुळे नागपूरमधील लढाई भाजपसाठी प्रतिष्ठेची ठरली आहे. महापालिकेच्या प्रचारासाठी फडणवीस आणि गडकरी या दोघांनीही नागपूरमध्ये प्रचारसभा घेतल्या होत्या. नागपूरमध्ये गेल्या पाच वर्षांत झालेल्या विकासकामांचा पाढा वाचून दाखवत या दोघांनीही मतदारांना भाजपला साथ देण्याचे आवाहन केले होते.

nagpur

Live Updates:

०६.१३:  ‘केंद्र, राज्य आणि महानगरपालिकेने केलेल्या कामामुळे नागपुरात यश मिळालं’-नितीन गडकरी

0६.०८: भाजपचे विजयी उमेदवार आज रात्री नितीन गडकरींची भेट घेणार

0५.५७: महाराष्ट्रातल्या विजयाबद्दल भाजप अध्यक्ष अमित शहांनी ट्वीट करत मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंना दिल्या शुभेच्छा

०५.४५: ‘नागपुरात भाजपची मोठ्या विजयाच्या दिशेने वाटचाल’: मुख्यमंत्री

०५.४३: काही वेळातच भाजपचे विजयी उमेदवार गडकरी वाड्यावर येणार

०५.४१: नागपुरात भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष

०५.३१: प्रभाग क्रमांक ३७ : काँग्रेच्या विकास ठाकरेंचा पराभव करणारे भाजपचे दिलीप दिवे २९२९ मतांनी विजयी

५.१८ : नागपूरमध्ये बसवर दगडफेक

५.१७: प्रभाग १७ विजयी उमेदवार – विजय चुटेले, लाता काटगाये, प्रमोद चिकले   काँग्रेस- हर्षला साबले

४.३२: काँग्रेसच्या वाट्याला आणखी एक विजय, युवा काँग्रेस अध्यक्ष बंटी शेळके विजयी

४.३१: प्रविण दाटके यांचा विजय

४.३०: गडकरी गटाला धक्का, स्थायी समिती अध्यक्ष बंडू राऊत यांचा पराभव

४.१०: सहा वाजण्याच्या सुमारास भाजपचे सर्व विजयी उमेदवार गडकरी वाड्यावर एकत्र येणार

४.०७: ५८ जागांसह भाजपकडे आघाडी कायम तर, काँग्रेसकडे १९ जागांची आघाडी

४.०० एका जागेसह राष्ट्रवादी आणि चार जागांसह इतर पक्षांची सरप्राइज एण्ट्री

३.५८: प्रभाग २३मध्ये भाजपला तीन तर, राष्ट्रवादीला एक जागा

३.५६: राष्ट्रवादीला एक जागा मिळवण्यात यश

३.५०: सत्ता कायम ठेवण्यासाठी भाजपची सरशी

३.३६:  काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे पराभूत

३.२३: भाजपची चांगली कामगिरी

३.०८: भाजपच्या विजयी उमेदवारांचा जल्लोष सुरु

२.३६: भाजपकडे ४८ जागांची आघाडी

२.३१: प्रभाग २३मध्ये भाजपचा तीन जागांवर विजय

२.२९: प्रभाग १४मध्ये काँग्रेसचे सर्व उमेदवार आघाडीवर

१.४९: भाजपच्या कोट्यधीश उमेदवारांपैकी विक्की कुकरेजा एक. विक्की कुकरेजा यांची चल आणि अचल संपत्ती १० कोटी ३६ लाख रुपयांची आहे.

१.४६: प्रभाग एकमध्ये भाजपचे कमळ फुलले. महेंद्र धनविजय, सुषमा चौधरी, प्रमिला मथरानी आणि विक्की कुकरेजा विजयी

१.४३: प्रभाग दोनमध्ये काँग्रेसच्या भावना लोणारे, दिनेश यादव, नेहा निकोसे आणि मनोज सांगोळे विजयी

१.४०: भाजपचे लखन येरावार, वनिता दांडेकर, लक्ष्मी यादव आणि संदीप जोशी विजयी

१.३८: प्रभाग ३६ मध्ये सरासरी ८०० च्या वर ‘नोटा’

१.३५: भाजप आणि काँग्रेस वगळता इतर कोणत्याही पक्षाला आघाडीचा सूर गवसलेला नाही

१.२२: १४ जागांवर काँग्रेसची आघाडी

१.१९: प्रभाग ३६ मधून भाजपच्या मिनाक्षी तेलगोटे, पल्लवी शामकुळे, प्रकाश भोयर, लहू बेहते विजयी

१.०३: आतापर्यंत १५१ पैकी ५४ जागांचे कल हाती

१२.५८: भाजपकडे ४४ जागांची आघाडी

१२.४९: भाजपला ४० जागांवर आघाडी

१२.४०: प्रभाग एकमधील भाजपचे चारही उमेदवार विजयी

१२.३१: ३६ जागांवर भाजपला तर, दहा जागांवर काँग्रेसला आघाडी

१२.२४: सतरंजीपुरा- प्रभाग चारमध्ये पहिल्या फेरीत भाजपचे चारही उमेदवार आघाडीवर

१२.२१: भाजपची २८ जागांवर आघाडी

१२.११: नागपूर महापालिकेवर भाजपचे वर्चस्व

१२.०६: नागपूरमध्ये भाजपचे चार उमेदवार विजयी

११.५४: भाजपची २४ जागांवर आघाडी

११.५०: भाजपकडे २० तर, काँग्रेसकडे नऊ जागांची आघाडी

११.४६: प्रभाग एकमध्ये चारही जागांवर काँग्रेसला आघाडी

११.४३: नागपूर महापालिकेच्या निवडणुकीतील कोट्यधीश उमेदवारांकडे अनेकांचे लक्ष

११.३४: काँग्रेसला आठ जागांवर आघाडी

११.३२: नागपूरसह नाशिक, पुण्यातही भाजपची मुसंडी

११.२९: मतमोजणीनंतरच्या दीड तासापर्यंतचे चित्र, भाजपला १९ तर काँग्रेसला चार जागांवर आघाडी

११.२४: काँग्रेसची ४ जागांवर आघाडी

११.२२: भाजपची मुसंडी, १९ जागांवर आघाडी

११.१९: भाजप आणि काँग्रेस वगळता इतर कोणत्याही पक्षाकडे आघाडी नाही

११.१४: भाजपकडे आघाडी कायम

११.१२: भाजपला १५ जागांवर आघाडी, काँग्रेसला गटबाजीच्या राजकारणाचा फटका

११.०६: भाजपला ११ तर, काँग्रेसला एका जागेवर आघाडी

११.००: प्रभाग ३६मध्ये भाजप आघाडीवर

१०.५८: भारतीय जनता पक्षाची सत्ता कायम राहते की काँग्रेस सत्तेत परत येते याकडे अनेकांचे लक्ष

१०.५४: भाजपला सात जागांवर आघाडी

१०.४८: भाजपला दोन जागांवर आघाडी

१०.४३: प्रभाग क्रमांक १०मध्ये रमेश चोपडे यांना आघाडी

१०.३८: दक्षिण पश्चिम नागपुरातील प्रभाग क्रमांक ३६ चा निकाल अल्पावधीत घोषित होण्याची शक्यता

१०.३३: प्रभाग क्रमांक ३६ मधील ‘ब’ प्रवर्गात केवळ दोन उमेदवार असून दोन मावळत्या नगरसेवकांमध्ये थेट लढत

१०.३०: भाजपला एका जागेवर आघाडी

१०.२४: उत्तर नागपुरातील प्रभाग क्रमांक पाच मधील ‘ड’ प्रवर्गासाठी तब्बल २० उमेदवार आहेत.

१०.१८: प्रभाग क्रमांक २ च्या निकालास विलंब होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

१०.११: उत्तर नागपुरातील प्रभाग क्रमांक दोन मध्ये सर्वाधिक ५१ उमेदवार आहेत.

१०.०५: बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने होत असलेल्या निवडणुकीत ३८ प्रभाग आणि १५१ जागांसाठी १ हजार १३५ उमेदवार रिंगणात आहेत.

९.५९: पोस्टल मतांच्या मोजणीस सुरुवात

९.५७: प्रत्येक पथकात तीन अधिकारी राहतील.

९.५०: प्रत्येक मतदान केंद्राकरिता कर्मचाऱ्यांची १६ पथके तयार करण्यात आली आहेत.

९.४०: मतमोजणीकरिता प्रत्येक मतदान केंद्रावर १४ टेबल

९.३०: मुख्यमंत्र्यांचे शहर असल्याने भाजपसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची समजली जात आहे.

९.२०: सकाळी १० वाजल्यापासून १२ ठिकाणी एकाचवेळी मतमोजणीला सुरुवात होणार आहे.

९.१०: प्रारंभी टपालाद्वारे करण्यात आलेल्या मतांची मोजणी होईल.

९.००: महापालिका प्रशासनाने मतमोजणीसाठी जय्यत तयारी केली आहे .

८.४१: नागपूर महापालिकेची निवडणूक भाजप आणि कॉंग्रेससाठी प्रतिष्ठेची; निकालाकडे सर्वांचे लक्ष

८.४०: १५१ उमेदवारांचा फैसला थोड्याच वेळात