• वर्धा जिल्ह्य़ातील पुलगाव येथील दारुगोळा आगार देशातील सर्वात मोठे आणि आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचे
  • आगीमुळे संपूर्ण देशाचे लक्ष
  • मोठय़ा प्रमाणात प्राणहानी, शस्त्रसाठाही नष्ट झाला
  • देशातील विविध दारुगोळा कारखान्यांमधून तयार करण्यात आलेल्या बंदुकींच्या गोळ्यांपासून क्षेपणास्त्रापर्यंतच्या दारुगोळ्याचा पुलगाव येथे साठा
  • शस्त्रास्त्रांची ९ साठवणूक केंद्रे, त्यापैकी फक्त एका साठवणूक केंद्राला आग
  •  सुमारे ५ हजार एकर परिसरात आगार
  •  सुरक्षेची जबाबदारी डिफेन्स सिक्युरिटी कोअर (डीएससी) च्या जवानांकडे, अत्यंत अत्याधुनिक आणि सुरक्षित अशी सुरक्षा यंत्रणा

दारुगोळा आगाराला लागलेल्या आगी

यापूर्वी २००७ मध्ये जम्मू येथील दारुगोळा भांडाराला आग लागली होती. ही आग प्रचंड मोठी होती. त्यात १७ जण जळून खाक झाले होते. यात आजूबाजूच्या गावांतील काही लोकांचाही समावेश होता. कोलकाता येथील दारुगोळा भांडाराला २०१० मध्ये आग लागली होती. यात कुणाही दगावला नव्हता, परंतु १५० टन दारुगोळा नष्ट झाला होता. यापूर्वी पुलगाव दारुगोळा भांडाराला दोनदा आग लागली होती.

अतिशय सुरक्षित रचना

  • अतिशय संवेदनशील असलेला दारुगोळा साठा ठेवताना अतिशय काळजी
  • शस्त्रांत्रांचे सुटे भाग वेगवेगळ्या ठिकाणी ठेवले जातात, यासाठी परिसरात ७० ते ८० ‘एक्स्प्लोसिव्ह स्टोर हाऊस’ (ईएसएच)
  • एका ईएसएचचे बांधकाम एक ते दीड हजार चौरस फूटाचे,  प्रत्येक ईएसएचमध्ये सुरक्षित अंतर
  • कुठल्या प्रकारचे स्फोटक कोणत्या स्फोटकाच्या शेजारी ठेवण्यात येऊ नये, याचे काटेकोर पालन
  • बहुतांश ईएसएच जमिनीवर बांधण्यात येतात, तर काही भूमिगत असतात. हवाई टप्प्यात येऊ नये म्हणून त्यावर गवत लावण्यात येते.
  • कोणत्या दारुगोळ्याला किती तापमानाची आवश्यकता आहे त्यानुसार वातानुकूलित यंत्रणा बसवण्यात
  • देशातील विविध कारखान्यातून येथे दारुगोळा रेल्वेने आणला जातो आणि रेल्वेनेच सुरक्षित ठिकाणी व आवश्यक ठिकाणी हलविला जातो. त्यासाठी भांडारात रेल्वेचे जाळे
  • आगाराला आग लागण्यामागे सर्वसाधारणपणे शार्टसर्किट, स्फोटकातील सल्फरचे घर्षण आणि किंवा बाहेरील आग, ही प्रमुख कारणे
  • कालबाह्य़ झालेला दारुगोळा दरवर्षी नष्ट केला जातो. ही प्रक्रिया करताना देखील आग लागण्याची शक्यता

संकलन : राजेश्वर ठाकरे, नागपूर</strong>